माय फॅशन : ‘रंगसंगती अतिशय महत्त्वाची’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

My Fashion
माय फॅशन : ‘रंगसंगती अतिशय महत्त्वाची’

माय फॅशन : ‘रंगसंगती अतिशय महत्त्वाची’

फॅशन हा प्रत्येकीचा जिव्हाळ्याचा विषय. फॅशन कशी करावी, रंगांची निवड कशी करावी, कोणती काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टींचा विचार करावा याबाबत सेलिब्रिटींनी सांगितलेल्या टिप्सचे सदर.

कपड्यांमधील माझा आवडता प्रकार म्हणजे सध्यातरी साडी हाच आहे. कारण मला असं वाटतं, की तुम्ही कितीही वेगवेगळ्या प्रकारचे आउटफीट घातले तरी साडीमध्ये मुली खूपच सुंदर दिसतात. साडीचा लूक खूपच वेगळा दिसतो. मुलींनाही साडी शोभून दिसते. यामधून आपलं व्यक्तिमत्त्व छान दिसतं. सध्या ‘स्टार प्लस’ या वाहिनीवर ‘चिकू की मम्मी दूर की’ या मालिकेत कामिनीची भूमिका साकारत आहे. यामध्ये माझा लूक साडीचा आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांना हा लूक खूप आवडतो. त्यातून माझा आत्मविश्वास वाढतो.

फॅशन करताना कुठलाही लूक असो- इंडियन किंवा वेस्टर्न- यामध्ये खूप टाईट कपडे शक्यतो घालू नयेत. कारण, त्यामुळे तुम्हाला कंफर्टेबल वाटणार नाही. तुम्ही त्या लूकमध्ये आणि कपड्यांमध्ये कंफर्टेबल कसे दिसता, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. माझा फॅशनफंडा खूपच साधा आहे. मुलींकडे नॉर्मल कुर्ता असेल, पलाझो असतील तर त्यावर स्टोल खूप छान दिसतो. ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत माझा तोच लूक होता. मला असं वाटतं, की नुसता एक स्टोल जरी वेगळ्या प्रकारचा असेल, तर तुमचा लूक बदलून जातो. हाच माझा फॅशन फंडा आहे. किती सोपी गोष्ट ना?

रंगांची निवड तुमच्या स्किनटोननुसार करा. त्यासाठी खूप अभ्यास वगैरे करण्याची अजिबात गरज नसते. आपण साधं आरशामध्ये पाहिलं, तरी आपल्याला कळतं, की कोणता रंग आपल्याला सूट करतोय. त्यानुसार कपड्यांच्या रंगांची निवड करावी. दीपिका पदुकोण हिचा कोणताही लूक असो- ती खूप सुंदर दिसते. तसंच प्रियांका चोप्रा हिचेही वेगवेगळे लूक मला आवडतात. या दोघीही माझ्या फॅशन आयडॉल आहेत.

फॅशन टिप्स...

  • सध्या मार्केटमध्ये लेटेस्ट फॅशन ट्रेंड कोणता आहे, त्याला फॉलो करणे गरजेचे आहे. एकेकाळी बेल बॉटम होता, त्यानंतर पलाझो व कुर्ती खूप चालत होती. सध्या कोड्स किंवा वेगवेगळे कपड्यांचे प्रकार चालतात.

  • रंगसंगती ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. त्यावरूनच तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, हे ठरतं. ऑरेंज आणि पिंकही छान दिसू शकतो आणि ऑरेंज आणि यलोही छान दिसू शकतो. वेगवेगळ्या प्रकारची रंगसंगती तुम्हाला कळायलाच हवी आणि त्यात प्रयोग करून बघायला हवेत.

  • तुमच्या स्किनटोननुसार कपड्यांची निवड करायला हवी. काही ब्राइट कलर फ्रेश आणि खूप छान लूक देतात.

  • तुम्ही जे कपडे घालता, यामध्ये तुम्ही कंफर्टेबल असणं महत्त्वाचं आहे. जर त्यात तुम्हीच कंफर्टेबल नसाल, तर तुमचं स्वतःचंच समाधान होऊ शकत नाही.

  • तुम्ही कोणताही ड्रेस घातला, तरी तो कॅरी करण्याचा तुमच्यात आत्मविश्वास किती आहे, ही गोष्ट सर्वांत महत्त्वाची आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Fashion
loading image
go to top