Jaundice Disease: त्रासदायक कावीळ 

jaundice disease symptoms and treatment
jaundice disease symptoms and treatment

Jaundice Disease: जन्मानंतर पहिल्या महिन्यात होणारी नवजात बाळाची कावीळ व त्यानंतर होणारी कावीळ यात फरक असतो. जन्मानंतर होणारी कावीळ ही नैसर्गिक असते, तर त्यानंतर होणारी कावीळ हिपॅटायटिस ए, बी, सी, डी, ई या विषाणूंच्या संसर्गामुळे होते.

या विषाणूंचा लिव्हरला संसर्ग झाला, की त्याला हिपॅटायटिस असे म्हणतात. ज्याचे कावीळ हे याचे मुख्य लक्षण असते. 

कारणे : (Jaundice causes)
लहान मुलांमध्ये होणारी कावीळ ही सहसा ए किंवा ई हिपॅटायटिसमुळे होते आणि तिचे मुख्य कारण हे दूषित पिण्याचे पाणी व अन्न हे असते. बी हा मुख्यतः रक्तातून व आईकडून बाळाला जन्माच्या वेळी होतो. सी हा रक्तातून होतो. रक्तपेढीतून घेतलेले रक्त हे हिपॅटायटिस बी व सीसाठी तपासले जाते; पण हा या दोन विषाणूचा स्रोत असू शकतो. 

लक्षणे : (Jaundice Symptoms)
- ए व ई हिपॅटायटिस हे शक्यतो काही काळाने बरे होणारे कावीळ असतात; पण सी व बी हे दीर्घकाळ लिव्हरमध्ये राहून क्रोनिक स्टेजमध्ये रूपांतरीत होऊ शकतात. 
- ए व ई हिपॅटायटिसमध्ये ताप, उलट्या, डोळे पिवळे दिसणे व पोटात वरच्या व उजव्या बाजूला दुखणे ही मुख्य लक्षणे असतात. 
- भूक नाहीशी होणे हे काविळीचे मुख्य लक्षण असते. 
- अंगाला खाज येणे. 
- बी व सी हिपॅटायटिसमध्ये बऱ्याचदा कावीळ असेलच असे नाही. या मुलांना बरीच वर्षे काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. काहींमध्ये खाज येणे व ए व ईसारखी ताप, उलट्या, पोट दुखणे व कावीळ असे असू शकते. 

तपासण्या : 
लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये कावीळ व इतर घटकांवरून लिव्हरवर किती परिणाम झाला आहे व काविळीचे प्रमाण काय आहे याचा अंदाज येऊ शकतो. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उपचार : 
- कावीळ हा अपोआप बरा होणारा आजार आहे. हिपॅटायटिसमध्ये विशेष उपचारांची गरज नसते. ए व ई आठ ते दहा दिवसांत अपोआप बरा होतो. जेवण जात नसल्याने नारळाचे पाणी, मीठ-साखर पाणी अशा गोष्टी देण्यास हरकत नाही.

जेवण जास्त जात नसल्यास आग्रह करू नये. जेवणात फार वाताळू व तूप असलेले पदार्थ टाळावेत.

जास्त दगदग न करता आराम करावा. ताप, उलटी, पोटदुखी व खाज असल्यास ते कमी करणारी अशी लक्षणांवर काम करणारी औषधे सोडून इतर कुठल्याही औषधांची गरज नसते. 
- काही मुलांमध्ये कावीळ वाढून लिव्हर फेल होण्याची शक्यता असल्याने मुलाची झोप, लघवी यावर लक्ष ठेवावे. उपचाराची गरज नसली, तरी डॉक्टरांकडून मॉनिटरिंग आवश्यक असते. 

कावीळ प्रतिबंध : 
- कावीळ ए व बीसाठी लसीकरण उपलब्ध आहे व प्रत्येकाने ते घ्यायलाच हवे. 
- साबणाने हात धुणे, ग्रामीण भागात उघड्यावर शौचास न जाणे व स्वच्छ अन्न सेवन करणे ए व ईसाठी आवश्यक असते . 
- आईकडून बाळाकडे हिपॅटायटिस बीचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येक गर्भवती मातेची हिपॅटायटिस बीसाठी तपासणी आवश्यक असते. 

गैरसमज : 
नाकात औषध टाकल्याने व कुठलेही औषध घेऊन कावीळ बरी होते हा गैरसमज असतो. फक्त बी व सीमध्ये दीर्घकालीन स्टेज निर्माण झाल्यास औषधांची गरज असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com