आईशी संवाद  : भावंडांमधलं वैर 

डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ
Saturday, 21 November 2020

घरात नव्या बाळाचं आगमन झाल्यावर व त्यानंतर दोन अपत्यांमध्ये असलेली भांडणे व द्वेषभावना प्रमाणाबाहेर वाढल्यास या  वैराला ‘सिबलिंग रायवलरी’ म्हणतात.

घरात भावंडांमध्ये थोड्या प्रमाणात वाद - भांडणं नॉर्मल असतात. घरात नव्या बाळाचं आगमन झाल्यावर व त्यानंतर दोन अपत्यांमध्ये असलेली भांडणे व द्वेषभावना प्रमाणाबाहेर वाढल्यास या  वैराला ‘सिबलिंग रायवलरी’ म्हणतात. याच्याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर याचे प्रमाण वाढत जात त्याचे शारीरिक व मानसिक परिणाम होऊ शकतात.

लहान वयातील वैर पुढीलप्रमाणे व्यक्त होते :
आईने एकाला जवळ घेतल्यास दुसऱ्याने त्रागा करणे, आरडाओरड करणे. 
रागापोटी शारीरिक इजा करणे; इतर गोष्टींबद्दल प्रमाणाबाहेर चिडचिड करणे. 
हट्टीपणात वाढ होणे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सिबलिंग रायवलरीची कारणे
सहसा भावंडांमधील द्वेषभावना ही दुसऱ्या अपत्याचा जन्म झाल्यावर पहिल्या अपत्यामध्ये म्हणजे मोठ्या भावात/ बहिणीत जास्त असते. याचा अर्थ ती धाकट्यात नसते असे नाही; पण याचे प्रमाण पहिल्या अपत्यात जास्त असते. जन्म झाल्यापासून घरातील पहिले मूल हे सर्वांचे लाडके असते. त्यातच पाच वर्षांखाली वय असताना दुसऱ्या बाळाचा जन्म झाला, तर ही समस्या तीव्र होते- कारण पाचव्या वर्षानंतर आई-वडील व कुटुंब सोडून त्या परीघापलीकडे स्वतःची जागा बनवण्यास मुलाची सुरुवात झालेली असते. पाच वर्षांखाली या सर्व आत्मसन्मानाचा स्त्रोत कुटुंबात असतो. त्यातच बाळाचा जन्म झाला, की एका दिवसात ही जागा व घरातली ओळख व मान्यतेची दोघांमध्ये विभागणी होते. या मानसिक आघातामुळे लहान भावंडाबद्दल राग निर्माण होतो. याशिवाय पालकांनी मोठे झाल्यावर दोघांमध्ये तुलना केली, ती जाहीरपणे बोलून दाखवली, तर भावंडांच्या नात्यावर त्याचा दुष्परिणाम होतो. तसेच मोठ्या भावाला/ बहिणीला सतत जबाबदारीची जाणीव करून देणे, ‘तू मोठी आहेस, तू त्याला सांभाळून घ्यायला हवं’ वगैरे भावनांचाही मुलावर ताण येतो. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सिबलिंग रायवलरीचा प्रतिबंध
दुसऱ्या अपत्याचे नियोजन करताना पहिल्या मुलाशी सतत चर्चा करणे. नवे बाळ घरात आल्यास त्याविषयी पहिल्या मुलाला काय वाटते आहे याविषयी खेळत खेळत बोलणे. हा सकारात्मक बदल असेल याविषयी मुलाला समजावून सांगणे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुसऱ्या बाळाचा जन्म झाल्यावर
    दुसऱ्या बाळाचा जन्म झाल्याझाल्या पहिल्या दिवशी लगेच पहिल्या मुलाला दूर करू नये.
    त्याला पहिल्या आठवड्यातच सोबत ठेवून, त्याच्याशी सतत बोलून, जवळ घेऊन याची जाणीव करून द्यावी, की त्याची जागा कुटुंबात अबाधित आहे. 
    पहिला आठवडा दुसऱ्या मुलाला लगेचच दुसऱ्या खोलीत झोपायला लावू नये. आईच्याच खोलीत कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने झोपू द्यावे. 
    हात धुवून बाळाला हात लावून दोन्ही अपत्यांचा स्पर्शसंबंध प्रस्थापित करावा. 

मूल मोठे होत असताना
    शारीरिक इजा करण्यापासून रोखण्याव्यतिरिक्त इतर वाद मुलांना त्यांचे त्यांना मिटवू द्यावेत. सातत्याने एकाचीच बाजू घेऊ नये. 
    दोन्ही अपत्यांचे व्यक्तिमत्व वेगळे असल्याने त्यांच्याशी वागताना वेगळ्या पद्धतीने वागावे. तुलना करू नये. 
    पहिले अपत्य झाल्यावर दुसऱ्याला जवळ घेणे, त्याला महत्त्व देणे, प्रेमाचे दृश्यसंकेत कमी/ बंद करू नयेत. 
    लहान भावंडाच्या संदर्भातील छोटी मदत करायला प्रेरित करून ते केल्यास मोठ्याचे कौतुक करावे व त्यासाठी बक्षीस द्यावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr-amol-annadate-article article about Sibling Rivalry

Tags
टॉपिकस
Topic Tags: