नखे खाण्याची सवय कशी घालवाल?

Nail
Nail

दहा टक्के  मुलांना अंगठा चोखण्याची व नखे खाण्याची सवय असते. पाच वर्षांनंतर ही सवय तशीच राहत असेल व उपचार केले नाहीत, तर मोठे झाल्यावर ती तशीच राहते.

कारणे 
थोड्याफार प्रमाणात वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत अंगठा चोखणे नॉर्मल समजले जाते. अंगठा चोखण्याच्या सवयीचा लहान मुलाच्या मानसिकतेशी आणि त्याच्या दूध पिण्याशी आणि खाण्या-पिण्याच्या सवयीशी असतो. त्यामुळे ही सवय कुठेतरी काहीतरी चुकते आहे, याची खूण असू शकते. बऱ्याचदा झोपताना अंगठा चोखत झोपण्याची सवय लागते. नखे खाण्याची सवय मानसिक तणाव दर्शविते. अशा वेळी मुलांशी व पालकांशी बोलून नेमक्या भीतीचा शोध घ्यावा लागतो. मुलांच्या मानसिक व भावनिक गरजांकडे दुर्लक्ष हे एक कारण असू शकते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दुष्परिणाम 
 अंगठा चोखणे व नखे खाणे, यामुळे दातांच्या वाढीवर परिणाम होतो; नखांचे संसर्ग होतात. 
 नखे खाण्याच्या सवयीमुळे पोटाचा व श्वसनमार्गाचा संसर्ग होतो. सार्वजनिक ठिकाणी नखे खाण्याच्या सवयीमुळे आत्मविश्वासावर परिणाम होतो. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उपचार 
 पहिल्या दोन वर्षांत नखे व दातांच्या वाढीवर परिणाम होत नसेल, तर अंगठा चोखण्याच्या सवयीकडे दुर्लक्ष करण्यास हरकत नाही. यात मुलाला रागावण्यापेक्षा झोपेत अंगठा बाहेर काढणे व अधूनमधून अंगठा चोखत असताना तो बाहेर काढणे करावे. 
 बालरोगतज्ज्ञांकडून मुलाच्या आहारात काही चूक होते आहे का, याची चाचपणी करावी. 
 मुलाच्या मनातील भीतीविषयी त्याच्याशी चर्चा करावी व ती घालवण्यासाठी बालमानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी. 
 या सवयीसाठी सार्वजनिक ठिकाणी व लोकांसमोर मुलाला रागवू नये व याविषयी बोलून त्याचा अपमान करू नये. 
 अंगठ्याला कडू पदार्थ लावून सवय घालवण्याचा प्रयत्न करणे टाळावे. 
 नखे खाण्याची सवय घालवताना मूल मोठे असल्यास त्यासाठी बिहेविअरल थेरपी, प्ले थेरपी वापरता येते. यात नखे खाण्याची इच्छा झाल्यास इतर कुठली तरी गोष्ट करण्याची सवय लावता येते.

पालकांचे समुपदेशन 
ही कृती मूल मुद्दामहून करत नसून, ते मनात खोलवर रुजलेल्या भावनांचे सवयीच्या स्वरूपात बाहेर 
दिसणारे रूप आहे, हे पालकांनी समजून घ्यायला हवे. मुलाला न रागवता पालक जितके प्रेमाने व समजूतदारपणे सहभागी होतील, तितके मूल उपचारास लवकर प्रतिसाद देईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com