डोक्याला मार लागणे 

डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ 
Saturday, 19 December 2020

खेळताना लागलेले छोटे मार सोडले, तर इतर वेळी डोक्याला मार लागल्यास सिटी स्कॅन केलेला बरा. क्वचित असे होते, की अजून बाहेरून कुठलीही लक्षणे नसतात; पण तरीही सिटी स्कॅनमध्ये इजा असल्याचे निदर्शनास येते.

लहान मुलांमध्ये खेळताना पडणे, झोपेत बेडवरून खाली पडणे, झोळीतून पडणे, डोक भिंतीवर आदळणे किंवा अपघातात डोक्याला मार लागणे असे प्रकार घडतात. बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष केल्याने पुढे गुंतागुंत निर्माण होऊ शकते. 

क्याला लागलेला कुठला मार गंभीर असतो? 
डोक्याला मार लागल्यावर त्वरित डॉक्टरकडे गेलेच पाहिजे; पण पुढील गोष्टींवरून मार गंभीर असल्याचे लक्षात येते : 
- ५ मिनिटांपेक्षा जास्त बेशुद्ध असणे 
- तीनपेक्षा जास्त उलट्या होणे. 
- मूल झोपेत राहणे. 
- झटके येणे. 
- कानातून रक्त येणे. 
- सिटी स्कॅनमध्ये डोक्याच्या कवटीचे फ्रॅक्चर असणे. 

आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा

सिटी स्कॅन कधी करावा?: 
बरेच पालकांना डोक्याला मार लागल्यावर सिटी स्कॅन करण्याच्या सल्ल्याकडे ते दुर्लक्ष करतात. याची गरज नाही असे अनेकांना वाटते. खेळताना लागलेले छोटे मार सोडले, तर इतर वेळी डोक्याला मार लागल्यास सिटी स्कॅन केलेला बरा. क्वचित असे होते, की अजून बाहेरून कुठलीही लक्षणे नसतात; पण तरीही सिटी स्कॅनमध्ये इजा असल्याचे निदर्शनास येते. अशा वेळी लवकर उपचार सुरू केल्यास पुढची गुंतागुंत टळते. म्हणून लहान मुलांना डोक्याला मार लागल्यास बालरोगतज्ज्ञांनी दिलेला सिटी स्कॅनचा सल्ला गांभीर्याने घ्यावा. 

डॉक्टरकडे नेण्याआधी घरी व घेऊन जाताना काय करावे?: 
- मुलाचे डोके मध्यभागी ठेवून त्याच्या दोन्ही बाजूला उशी ठेवून डोके व मणका हलणार नाही असे पहावे. 
- गाडीमध्ये जास्त हालचाल न करता शक्यतो झोपून घेऊन जावे. 
- उलटी होत असेल तरच मुलाला एका अंगावर झोपवावे. 
- डॉक्टरांनी तपासेपर्यंत शक्यतो अन्न पाणी देऊ नये. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उपचार : 
- मेंदूतील प्रेशर कमी करणे व झटके येऊ नये यासाठी औषधे दिली जातात. 
- गरज भासल्यास ऑक्सिजन व उलटी होत असल्यास तोंडावाटे अन्न बंद करून सलाईन दिले जाते. 
- बहुतांश वेळा कवटीचे फ्रॅक्चर आपोआप बरे होतात; पण जर मेंदूच्या आत रक्त स्त्राव झाला असेल तर शस्त्रक्रिया करावी लागते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रतिबंध : 
- गाडीत प्रवासात मुलांसाठी वेगळे सीट्स मिळतात, त्याचा वापर करावा 
- ३ वर्षांच्या पुढे मुलांनी सीट बेल्टचा वापर करावा 
- सायकलिंग, स्केटिंग करताना किंवा इतर डोक्याला मार लागू शकतो असे खेळ खेळताना ह्ल्मेटचा वापर करावा 
- दुचाकीवर २ जणांसोबत किंवा कडेवर लहान मूल घेऊन प्रवास करणे टाळावे 
- झोळीचा वापर करू नये 
- मुलांना बेडच्या कडेवर झोपवू नये. जर दोन लहान मुले बेडवर झोपत असतील, तर बेडच्या कडेला दुसरी गादी किंवा पडले तरी मार लागणार नाही असे मऊ कपडा ठेवावा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr-amol-annadate-write article Beating the head