लहान मुलांची पोटदुखी 

डॉ. अमोल अन्नदाते 
Saturday, 22 August 2020

पोट कुठे दुखते हे एका बोटाने पोटावर दाखवण्यास मुलाला सांगावे. मूल जितके बेंबीच्या जवळ दाखवतात तितके ते जास्त मानसिक असते व जितके लांब दाखवतात तितके इतर आजारांमुळे पोटदुखी असू शकते. 

लहान मुलांमध्ये पोटदुखी काही आजार असल्यामुळे आहे की, मानसिक कारणांमुळे आहे याचा आधी शोध घ्यावा लागतो. पोट कुठे दुखते हे एका बोटाने पोटावर दाखवण्यास मुलाला सांगावे. मूल जितके बेंबीच्या जवळ दाखवतात तितके ते जास्त मानसिक असते व जितके लांब दाखवतात तितके इतर आजारांमुळे पोटदुखी असू शकते. 

मानसिक कारण आजारांमुळे 
कुठे दुखते विचारल्यास बेंबीमध्ये बोट दाखवतात बेंबी पासून लांब दाखवतात. झोप शांत लागते व पोट दुखल्यामुळे झोप मोड होत नाही. पोट दुखल्यामुळे झोप मोड होते. 

बाल चांगले खेळते आणि पोट दुखते. पोट दुखते म्हणून खेळ थांबवून घरी येते. भूक व तहान चांगली असते. भूक व तहान वर परिणाम होतो. वजन कमी होत नाही. वजन कमी होऊ शकते. 

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

सकाळी शाळेत जाताना होऊ शकते. पोट दुखत शाळेतून परत येते. पोटदुखीच्या दोन अॅटॅकमध्ये मूल नॉर्मल असते पोटदुखीच्या दोन अॅटॅकमध्ये मूल नॉर्मल नसते व अधून मधून पोट दुखणे सुरूच असते. 

पोटदुखीचा काळ अर्ध्या तासापेक्षा जास्त नसतो पोट दुखीचा काळ सहसा अर्ध्या तासापेक्षा जास्त असतो.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पोटदुखीची काही सामान्यपणे आढळून येणारी करणे असतात..
१. जंत  : पोटदुखी सोबत शीच्या जागे भोवती खाज येणे, वळवळल्या सारखे वाटणे अशी लक्षणे दिसतात. काही जंतांमुळे रक्त कमी होऊ शकते. यासाठी अल्बेंडेझोल व आयवमेक्टीन या गोळ्या वर्षातून एकदा मुलांना देण्यास हरकत नाही. यासाठी आपल्या देशात सर्व मुलांना १० फेब्रुवारी व १० ऑगस्ट या दिवशी एक जंताची गोळी दिली जाते. मात्र पोट दुखते म्हणून वारंवार जंताची गोळी देणे चुकीचे आहे. गोड खाल्ल्यामुळे जंत होतात, झोपेत दात खाणे व चेहऱ्यावर पांढरे चट्टे हे जंताची लक्षणे आहेत हा गैरसमज आहे. 

२. बद्धकोष्ठता – 
पोटदुखी असताना मुलाला रोज नियमित मलनिस्सारण होते आहे की नाही हे तपासणे गरजेचे असते. आहार सुधारला की बद्धकोष्ठता कमी होते. 

३. संसर्ग – 
अपेंडीसायटीस आणि हिपॅटायटीस (कावीळ) हे दोन संसर्ग पोटदुखीसाठी कारणीभूत असतात. दोन्ही संसर्गात पोटाच्या उजव्या बाजूला तीव्र वेदना असतात. काविळीत वेदना वरच्या बाजूला तर अपेंडीसायटीसमध्ये खालच्या बाजूला होतात. दोन्ही मध्ये ताप व उलट्यांचा त्रास होतो. 

४. शस्त्रक्रियेसाठीची कारणे - 
आतड्यांमध्ये अडथळा किंवा एकमेकात अडकणे या तातडीने शस्त्रक्रियेसाठी काही कारणे असतात. यात उलट्या व सतत पोट दुखणे, मल विसर्जनासोबत रक्त पडणे अशी लक्षणे दिसतात. 

५. अॅसिडिटी व अपचन -लहान मुलांना ही याचा त्रास होऊ शकतो व यामुळे पोटाच्या वरच्या भागात मध्यावर पोट दुखते. 

६. जुलाब व उलट्या - 
गॅस्ट्रोएनटेरायटीसमध्ये जुलाब आणि उलट्यांसोबत पोटदुखीचा ही त्रास होतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr amol annadate writes article about child stomach pain

Tags
टॉपिकस
Topic Tags: