Women's Day 2022 : महिलांना आत्मनिर्भर बनविणाऱ्या कमल कुंभार आहेत कोण?

Women's Day 2022 : महिलांना आत्मनिर्भर बनविणाऱ्या कमल कुंभार आहेत कोण?

उस्मानाबाद सारख्या दुष्काळ प्रदेशात राहणारी कमल कुंभार(Kamal Kumbhar). गरीबीमुळे (Poverty) घरात हालाकीची परिस्थिती...लग्नानंतर चार पैसे कमविण्यासाठी त्या रोजगाराच्या ( Employment) शोधात घराबाहेर पडल्या...त्यातही सासरच्यां लोकांचा विरोध...पण त्या थांबल्या नाही, त्या पुढे जात राहिल्या. सासरच्या विरोध जुगारून, स्वावलंबी(Self-reliant) आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम (Financially capable) होण्यासाठी त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. आज कमल (Kamal) यांच्याकडे सहा वेगवेगळ्या वेगवेगळ्या सुक्ष्म उद्योगांची मालकी आहे. जागतिक महिला दिनानिमित्त 2021 च्या उद्योजक म्हणून कमल कुंभार यांना नारी शक्ती (Naree Shakti Award) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (International Women's Day Kamal Kumbhar was honored with Nari Shakti Award as the Entrepreneur of 2021)

जागतिक महिला दिनानिमित्त (International Womens Day) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांच्या हस्ते सन 2020 आणि 2021 साठी उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या 29 महिलांना राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार जाहीर करण्यात आला असून. दरम्यान महाराष्ट्रातून सन्मानित होणाऱ्या तीन महिलांमध्ये डाऊन सिंड्रोम ग्रस्त कथ्थक नृत्यांगना सायली आगवणे आणि पहिली महिला सर्पमित्र विनिता बोराडे यांना 2020 आणि उद्योजक कमल कुंभार यांना 2021 या वर्षासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Women's Day 2022 : महिलांना आत्मनिर्भर बनविणाऱ्या कमल कुंभार आहेत कोण?
नारी शक्ती पुरस्कार! 51 हजार साप पकडणाऱ्या महाराष्ट्रीय महिलेचा सन्मान

कोण आहे कमल कुंभार ?

कमल पोल्ट्री आणि एकता प्रोड्युसर कंपनीच्या त्या संस्थापक आहेत. कमल कुंभार यांचा जन्म महाराष्ट्रातील उस्मानाबाद येथे एका रोजंदारी मजुराच्या पोटी झाला. कमल या लहानपासूनच गरिबीत जगल्या आणि शिक्षणाशिवाय मोठ्या झाल्या. १९९८ मध्ये उस्मानाबादमधील एका ग्रामीण कुटुंबातील एका शेतकऱ्यासोबत लहान वयातच त्यांचे लग्न झाले.

रोजगाराच्या शोधात लग्न ठरले अपयशी

उदरनिर्वाहासाठी घराबाहेर पडण्याची वेळ आली नसती तर कमल कुंभार यांचे आज जीवन नित्याचे झाले असते. पण, घराच्या चार भिंतींच्या बाहेर पाऊल ठेवण्याचा निर्णय त्यांच्या वैवाहिक जीवनात अशांतता निर्माण करेल याची तेव्हा त्यांना कल्पना नव्हती. घराची हालाकीची परिस्थीती सुधारावी आणि ४ पैसे हातात पडावे या हेतूने नोकरीच्या शोधात कमल घराबाहेर पडल्या. नोकरीच्या शोधात दिवसभर बाहेर पडल्यानंतर त्यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. नोकरीच्या शोधात असलेल्या त्यांच्यावर सासरचे लोक कामाच्या बहाण्याने फक्त बाहेर फिरत आहे असा आरोप करत असे. कमल यांना सासरच्या लोकांच्या या वागणूकीचा त्रास होत असे, अखेर त्याच वर्षी त्यांचे लग्न तुटले, परंतु त्यांनतरही त्या उस्मानाबादमध्ये राहत होत्या.

Women's Day 2022 : महिलांना आत्मनिर्भर बनविणाऱ्या कमल कुंभार आहेत कोण?
Womens Day 2022: बलात्कारासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये कोणत्या शिक्षा?

2,000 भांडवलातून उभारला व्यवसाय

लग्न अपयशी ठरल्यानंतर आर्थिकदृष्ट्या असुरक्षित असल्याचे त्यांना जाणवले. त्यानंतर त्यांनी काही दिवस बांगड्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरूवातीला त्या पाच गावांमध्ये पायी चालत फिरून त्या बांगड्या विकत. कमलसाठी हा सर्व काळी खूप कठीण होता. किफायतशीर व्यवसाय न मिळाल्याने नंतर कमल यांनी त्याच वर्षी वैयक्तिक बचत म्हणून साठवलेले 2,000 रुपये भांडवलामध्ये गुंतवून त्यांनी पोल्ट्री-कम-हॅचरी व्यवसाय सुरू केला.

कमल पोल्ट्री आणि एकता सखी प्रोड्यूसर या कंपनी उभारून 2007 पर्यंत त्यांनी या व्यवसायाचे रूपांतर सूक्ष्म-उद्योग उपक्रमात झाले. महिला उद्योजक कुंभार यांच्याकडे आज हॅचरीपासून मायक्रो-फायनान्स आउटफिट्सपर्यंत सहा वेगवेगळ्या व्यवसायांची मालकी आहे. आणि 2017 मध्ये, त्यांनी मायक्रो-एंटरप्राइझ श्रेणीमध्ये CII फाउंडेशन वुमन एक्झम्प्लर पुरस्कार देखील जिंकला.

Women's Day 2022 : महिलांना आत्मनिर्भर बनविणाऱ्या कमल कुंभार आहेत कोण?
International Women’s Day : बॉलीवूडची पहिली स्टंटवुमन माहितीये?

3,000 महिलांना आर्थिकदृष्ट्या बनवले स्वावलंबी

कमल कुंभार यांना त्यांच्या जिद्दीने त्यांना खूप पुढे नेले आहे. आज आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत पण, त्यांच्यासारख्या इतर अनेक महिलांना स्वावलंबी बनवण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रोजगार आणि लघुउद्योग चालवण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण देऊन त्यांनी दुष्काळग्रस्त भागातील सुमारे 3,000 महिलांना प्रोत्साहन दिले आहे. उस्मानाबाद सारख्या प्रदेशात यशस्वीरित्या पोल्ट्री फार्म चालवून त्यांचे घरगुती उत्पन्न दुप्पट केले आहे. याबाबत फायनेशिअल एक्सप्रेससोबत संवाद साधताना कमल म्हणाल्या की, “पूर्वी, मी फक्त स्वत:बद्दलच विचार केला. पण जेव्हा मी इतर महिलांशी संवाद साधायला सुरुवात केली तेव्हा मला जाणवलं की, स्वतःपेक्षा इतरांकडे लक्ष वळवण्याची गरज आहे कारण त्यांनाही मदतीची गरज आहे,”

आपल्या यशाचा मंत्र सांगताना कुंभार यांनी सांगितले की, “एखाद्याने समोर आलेल्या आव्हानांमुळे खचून जाऊ नये. तुम्हाला पुढे जाण्याची आणि काहीतरी नवीन करण्याची गरज आहे. आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी, एकापेक्षा जास्त व्यवसायांमध्ये विविधता आणावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com