दिलखुलास : एक होती राणी!

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले. आज मी हा लेख यासाठी लिहीत आहे, की कारण मला राणी एलिझाबेथ यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे आणि मला त्या खूपच आवडायच्या.
britain queen elizabeth
britain queen elizabethsakal
Updated on
Summary

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले. आज मी हा लेख यासाठी लिहीत आहे, की कारण मला राणी एलिझाबेथ यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे आणि मला त्या खूपच आवडायच्या.

- कांचन अधिकारी

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले. आज मी हा लेख यासाठी लिहीत आहे, की कारण मला राणी एलिझाबेथ यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे आणि मला त्या खूपच आवडायच्या. कायम रंगबिरंगी कपडे घालणाऱ्या या गोऱ्या राणी, त्यांच्या डोक्यावरच्या हॅट्स, गळ्यातली ती मोत्यांची माळ, तर कधी डायमंडचा नेकलेस, छोट्याशा हिल्सचे बूट, हातात हातमोजे व त्यातल्याच एका हातात एक छोटीशी पर्स घेऊन विविध राष्ट्रांच्या प्रमुखांना भेटण्याची त्यांची ती स्टाईल. वाहवा! मी चक्क भारावून जायची त्यांच्या व्यक्तिमत्त्वानं.

त्यांच्या कार्यकाळात त्यांनी २१ हजार मीटिंग्ज केल्या. ११२ विविध राष्ट्रांना भेटी दिल्या. १८० गार्डन पार्टीज बकिंगहॅम पॅलेसमध्ये दिल्या. खऱ्या अर्थानं त्या एक ‘रॉयल प्रिन्सेस’ होत्या. ब्रिटनच्या प्रमुख चर्चमधील निवडणूक त्यांच्याच सल्ल्याने व हस्तेच होत असे. बकिंगहॅम पॅलेसची ती बाल्कनी आता मात्र सुनी सुनी वाटणार आहे. ती बाल्कनीही आपल्या राणीला आता शोधणार आहे.

आपले पती फिलिप्स यांच्यावर त्यांचे नितांत प्रेम होते. राणी बकिंगहॅम पॅलेस व विंडसर कॅसल या दोन ठिकाणी वास्तव्यास असायच्या. सर्वसामान्य जनतेबदलही त्यांच्या मनात प्रेम होते. ब्रिटनमधल्या ज्या लोकांनी शंभरी पार केली असेल, त्यांच्याबरोबर त्या हायटीचा कार्यक्रम घेत असत. त्यानिमित्ताने तिथल्या सर्वसामान्य जनतेला बकिंगहॅम पॅलेसमधे जायची संधी मिळत असे व कित्येक जणांना आपण शंभरी पार करावी, असा उत्साहही मिळायचा. मोठमोठ्या कलाकारांचा सन्मानही राणी त्यांना बकिंगहॅम पॅलेसमध्ये बोलावून करायच्या. त्यात जेनिफर लोपेझ, लेडी गागा, एलिझाबेथ टेलर अशा व इतर नामवंत व्यक्तींचा समावेश होता. कोरोनाच्या काळात खूप लोक मृत्युमुखी पडले, तेव्हा त्यांना धैर्य देताना केलेल्या भाषणात we will be with our families again असे असे भावपूर्ण उद्‌गार त्यांनी काढले होते.

दुसऱ्या जागतिक युद्धानंतर त्या ब्रिटनच्या राणी झाल्या आणि त्यानंतरची सत्तर वर्षं त्यांनी राणीपद भूषवले. ब्रिटनच्या संस्काराचा संपूर्ण पगडा असलेल्या राणीने आपले संस्कार कधीच सोडले नाहीत. अगदी पुढच्या पिढीने क्रांतिकारी निर्णय घेतले, तरी त्या त्यांच्या संस्कारांना धरूनच वागत होत्या. मला माझ्या आजीची आठवण झाली- जी मला नेहमी सांगायची, ‘हे बघ, तू सिनेमा-नाटकांत काम केलंस तरी आपले आचार, विचार, संस्कार विसरू नकोस आणि सोडूही नकोस.’ आज मला याचा अर्थ समजतो आहे. राणी एलिझाबेथ यांनाही कौटुंबिक संघर्ष, मानसिक संघर्ष यातून जावंच लागलं असेल; पण तरीही त्या कणखरपणे अगदी प्रसन्न मुद्रेने वावरायच्या. ब्रिटनमध्ये लोकशाही अस्तित्वात आली, तरी राणीचा रुबाब, रुतबा, लोकप्रियता कुठेही कमी झाली नाही. she really made & lived the history.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com