
गेल्या आठवड्यात ‘सुंदर मी होणार’ या भागात आपण उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची, याबद्दल जाणून घेतलं.
- कांचन अधिकारी
गेल्या आठवड्यात ‘सुंदर मी होणार’ या भागात आपण उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची, याबद्दल जाणून घेतलं. उन्हाळ्यात कडक उन्हामुळे जास्तीत जास्त घाम येतो. त्यावर बाहेरील धूलीकण बसल्याने मुरुमे जास्त येतात. त्यासाठी दिवसातून दोन-तीन वेळा फेस वॉशनं चेहरा स्वच्छ धुवावा व त्यावर टोनर वापरावा. उन्हात जाण्याआधी सनस्क्रीन जरूर लावावं. कुठलंही सनस्क्रीन चार तासांच्या वर त्वचेला उन्हापासून वाचवू शकत नाही. सतत लॅपटॉपवर काम केल्यामुळेसुद्धा चेहऱ्याच्या त्वचेला (फोटो सेन्सिटिविटी पिगमेंटेशन) हानी पोचू शकते. त्यामुळे जास्तकाळ लॅपटॉपवर कामं करणाऱ्यांनीसुद्धा सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे. सूर्याची तीव्र किरणं जर तुमच्या चेहऱ्यावर रोज पडत असतील, तर चेहऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणात पिगमेंटेशन (चाई) होऊ शकते. अशा वेळेला एखादया त्वचारोगातज्ज्ञाकडे जाणंच योग्य ठरेल व लवकर जा- कारण जास्त पिगमेंटेशन झाल्यास गोळ्याही घ्याव्या लागतील.
लहान मुलांना पावसाळ्याच्या पाण्यात खेळायला खूप आवडतं; पण पावसाळ्याच्या पाण्यात गटाराचं पाणीही मिसळलं जात असतं. ज्याच्यामुळे त्वचेला एक प्रकारची बुरशी (fungus) येते. त्यावर उपाय म्हणून ‘अँटी-फंगल पावडर’ वापरावी. बाहेरून घरात आल्यावर हात-पाय स्वच्छ धुवून काढावेत व शक्य तितक्या वेळा पाय कोरडे ठेवावेत. याचं प्रमाण जास्त वाढल्यास अँटीबायोटिक्सही घ्यावी लागतात. पावसात एकतर भिजू नका आणि जर भिजलातच, तर ओल्या कपड्यात राहू नका. डोकं प्रथम कोरडं करा- नाहीतर सर्दी हमखास होऊ शकते. ओल्या कपड्यातच राहिल्यामुळे ॲलर्जिक इन्फेक्शन्स होऊ शकतात. नोकरीवर जाणाऱ्यांनी एक जोडी कपडे आपल्या ड्रॉवरमध्ये जरूर ठेवावेत.
पावसाळ्यात गृहिणींनी पेडीक्युअर शक्यतो टाळावं- कारण बऱ्याचदा पेडीक्युअरमध्ये नखांच्या बाजूची cuticles खूप आतून काढली जातात व त्यामुळे त्यात पाणी शिरून फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. पावसाळा आहे म्हणून सनस्क्रीन वापरायचं नाही, असं अजिबात करू नका. पावसाळ्यातही मध्येच कडक ऊन पडत असतं.
उतारवयात आपली त्वचा कोरडी होत जाते. अशा वेळेला मॉइश्चरायझर जरूर वापरा. वाढणाऱ्या वयासोबत त्वचेचंही वय वाढत असतं. ज्याला minoposal syndrome असंही म्हणतात- ज्यामुळे त्वचा सतत कोरडी होते. अशा वेळेला घरातील दुधावरील ताजी साय+हळद तोंडाला लावा. दहा मिनिटांनी धुवून काढा.
सुंदर व रसरशीत कांती कुणाचंही लक्ष वेधून घेते. त्यामुळे आपली त्वचा डागरहित (spotless) व रसरशीत ठेवा. त्यासाठी जास्त पाणी प्या. उत्तम सनस्क्रीन त्वचेच्या वर हलका कॉंपॅक्ट (आपल्या त्वचेच्या रंगाचा) फिरवा. एक उत्तम लिपस्टिक, आयलायनर, मस्कारा व शिमरचा एक हलका हात! भुवयांनाही तितकंच महत्त्व आहे. हलकी आय शॅडो, आणि आयब्रो पेन्सिलचा योग्य तो वापर केल्यास आपण शंभर जणींत नक्कीच उठून दिसाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.