दिलखुलास : अशाश्वताच्या पायावर शाश्वताचे इमले!

एकदा आपण आपलं स्टेट्स वाढवलं, की नंतर ते सांभाळण्यासाठी अजून उद्योग करत राहतो आणि आपणच निर्माण केलेल्या चक्रात आपण स्वतः कधी गुंतून गेलो हे माणसाचं माणसाला स्वतःलाच कळत नाही.
दिलखुलास : अशाश्वताच्या पायावर शाश्वताचे इमले!
Summary

एकदा आपण आपलं स्टेट्स वाढवलं, की नंतर ते सांभाळण्यासाठी अजून उद्योग करत राहतो आणि आपणच निर्माण केलेल्या चक्रात आपण स्वतः कधी गुंतून गेलो हे माणसाचं माणसाला स्वतःलाच कळत नाही.

- कांचन अधिकारी

एकदा आपण आपलं स्टेट्स वाढवलं, की नंतर ते सांभाळण्यासाठी अजून उद्योग करत राहतो आणि आपणच निर्माण केलेल्या चक्रात आपण स्वतः कधी गुंतून गेलो हे माणसाचं माणसाला स्वतःलाच कळत नाही.

कोरोनाच्या काळात जवळपास प्रत्येकाच्या घरातील कुणी ना कुणी तरी काळाच्या पडद्याआड गेलं. कोरोना नसता तर जी माणसं अजून १५ ते ३० वर्षं निश्चितपणे जगली असती, अशी माणसंही चटाचट जाताना पाहताना आणि ऐकताना काळीज तुटत होतं. हे सर्व पाहताना माझ्या मनात एक विचार सतत यायचा आणि तो म्हणजे या जगात काहीच शाश्वत नाहीये. जे आज आहे ते कालांतरानं नष्ट होणार आहे. इथं मला रामदास स्वामींच्या ओळी आठवत आहेत. ‘मरे एक त्याचा दुजा शोक वाहे! अकस्मात तोही पुढे जात आहे.’ असो. ही जगरहाटीच आहे, कालचक्रच आहे- ते चालत राहणारच. सृष्टीचा समतोल कदाचित राखला जात असेल अशानं. हे सर्व माहीत असलं, तरी आपली त्या व्यक्तीत भावनिक गुंतवणूक ही झालेलीच असते. मनाला समजावणं एवढंच आपल्या हातात उरतं. म्हणूनच यापुढे तरी प्रत्येकानं प्रत्येक व्यक्तीशी प्रेमानं, द्वेषविरहित भावनेनं वागलं पाहिजे. काय माहीत- कुणाचं स्टेशन कधी येणार आहे ते?

इतक्या अशाश्वत जगण्यावर आपणसुद्धा किती प्रेम करतो नाही. आपल्या मनात आपल्या विचारांबरोबरच आपण आपल्या फॅमिलीचा, नातेवाईकांचा, मित्रांचा सर्वांचा विचार घेऊन चालत असतो. संपत्ती संचय, गाड्या, प्लॉट्स, उंची भारी कपडे, दागदागिने, अगदी उंची मेकअपचं सामान, चपला यांत गुंतवणूक करत असतो. अरे, पण सत्य हे आहे, की तुम्ही स्वतः किती वर्षं जिवंत असणार आहात, हेसुद्धा तुमचं तुम्हाला माहीत नाहीये. म्हणजेच सगळंच अशाश्वत असताना आपल्या सात पिढ्या खाऊ शकतील इतक्या संपत्तीची हाव कशाला? मानवाचा सगळ्याचा पायाच जर अशाश्वत आहे, तर त्या पायावर शाश्वताचे इमले किती बांधायचे, याचा एकदा शांतपणे बसून विचार करायला नको का?

खरंतर माणूस स्वतःच स्वतःचे व्याप इतके वाढवून ठेवतो ना! मग ते सर्व सांभाळण्याकरता तारेवरची कसरत स्वतःलाच करायला लागते आणि या कसरतीमध्ये माणूस स्वतःची तब्येत गमावून बसतो; पण या सर्वाचं ज्ञान माणसाला खूप उशिरा येतं. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. खरंतर माणसाच्या मूलभूत गरजा खूपच कमी असतात; पण आपणच समाजात आपलं वजन जास्त आहे, हे दाखवण्यासाठी सर्व खराटोप करत राहतो. एकदा आपण आपलं स्टेट्स वाढवलं, की नंतर तो- सांभाळण्यासाठी अजून उद्योग करत राहतो आणि आपणच निर्माण केलेल्या चक्रात आपण स्वतः कधी गुंतून गेलो हे माणसाचं माणसाला स्वतःलाच कळत नाही.

तेव्हा थोडक्यात आपल्या खरोखरीच्या गरजा काय आहेत, हे ओळखायला शिका आणि आपल्याबरोबरच गरिबांनाही गरजा भागवण्यासाठी मदत करा. निदान या निमित्ताने ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’मधली दरी थोड्या प्रमाणात का होईना कमी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com