दिलखुलास : तुमचा मार्गदर्शक कोण?

जेव्हा आपण एखाद्या प्रॉब्लेममध्ये असतो, तेव्हा आपले आप्तेष्ट, मित्र, हितचिंतक (ज्यांना आपल्या हिताची जरा जास्तच चिंता असते.) आपल्याला नानाविध सल्ले देतात.
Guide
GuideSakal
Updated on
Summary

जेव्हा आपण एखाद्या प्रॉब्लेममध्ये असतो, तेव्हा आपले आप्तेष्ट, मित्र, हितचिंतक (ज्यांना आपल्या हिताची जरा जास्तच चिंता असते.) आपल्याला नानाविध सल्ले देतात.

- कांचन अधिकारी

मंडळी, जेव्हा आपण एखाद्या प्रॉब्लेममध्ये असतो, तेव्हा आपले आप्तेष्ट, मित्र, हितचिंतक (ज्यांना आपल्या हिताची जरा जास्तच चिंता असते.) आपल्याला नानाविध सल्ले देतात. अर्थात आपणसुद्धा ‘ऐकावे जनाचे परी करावे मनाचे’ या न्यायानेच वागतो. तरीपण आपल्या मनात आपला असा एक Go person असतो- ज्याला आपण आपल्यापेक्षाही जास्त महत्त्व देतो व त्याच्या सल्ल्यानुसार चालतो. काही सल्ला देणारे आपल्या मनातील मळभ दूर करतात, तर काही ते अधिक गडद. काहींना आपल्या हिताची खरंच चिंता असते, तर काही जण तर आतून आपले हितशत्रूही असू शकतात. काही जणांना जीवनाचा जास्त अनुभव असतो; पण काळानुसार त्यांचे सल्ले आऊटडेटेड असू असतात. वकीलांच्याकडे गेलात, तर कुठलाही वकील प्रथम आपला स्वतःचा खिसा कसा भरता येईल, याचाच विचार करतो. काहींना तुमचे विचार वरकरणी पटले असतील; पण अंतर्मनात काही वेगळंच असतं आणि तुमच्या विचारांपेक्षाही त्यांचे विचार हे कसे एक पाऊल पुढे आहेत, हेच तुम्हाला ते सांगतील. काहींना तुमचा प्रॉब्लेम हा फार मोठा आहे, असं वाटणारच नाही- कारण त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात त्यांनी यापेक्षाही मोठी संकटं झेललेली असतील.

थोडक्यात काय, तर दुनियेत तुम्ही जर गाढव विकायला गेलात, तर लोक तुम्हाला तुमचं गाढव हे कसं कुत्रं आहे, हे समजावून सांगतील व तुम्ही खूप कमी किंमतीला ते विकून येऊ शकता आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यातील Go to the person कोण आहे, याला महत्त्व आहे.

दुर्योधनाला पांडवांना सुईच्या अग्रावरही राहील, एवढी जमीनसुद्धा द्यायची नव्हती आणि म्हणूनच त्यांनी आपला Go person भीष्माचार्य किंवा विदुराला न निवडता जो कुणी आपल्या ‘हो’ला ‘हो’ करेल, असा शकुनीमामा निवडला- कारण त्याला माहीत होतं, की मामा त्याच्या विचारांच्या बरोबर चालणारा आहे, जेणे करून तो एकटा पडणार नाही व भीष्माचार्य आणि विदुर दोघेही पांडवांनाच साथ देणार, हेही दुर्योधनाला माहीत होतं. दुर्योधनाच्या कपटी प्रवृत्तीला साथ मिळाली ती त्याहूनही कपटी शकुनीमामाची आणि त्यामुळेच विष अधिकच हलाहल बनलं.

अर्जुनालाही करायचं की नाही, असा न अगदी ऐन रणांगणावरच पडला, तेव्हा त्याचा Go person can make you or break you. आणि त्यामुळेच त्याला आपल्या आयुष्यात आपले चांगले मित्र असणं ही खूप आवश्यक बाब आहे- कारण कित्येकदा तेच आयुष्य घडवूही शकतात आणि बिघडवूही शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com