ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : आंबट-गोड मार्मालेड

लहान-थोरांपर्यंत सगळ्यांना अतिशय आवडणारा नाश्त्याचा पदार्थ म्हणजे जॅम, ब्रेड बटर. त्यातही लहान मुलांना जॅम अगदी नुसता खायलादेखील अतिशय आवडतो.
marmalade
marmaladesakal
Summary

लहान-थोरांपर्यंत सगळ्यांना अतिशय आवडणारा नाश्त्याचा पदार्थ म्हणजे जॅम, ब्रेड बटर. त्यातही लहान मुलांना जॅम अगदी नुसता खायलादेखील अतिशय आवडतो.

लहान-थोरांपर्यंत सगळ्यांना अतिशय आवडणारा नाश्त्याचा पदार्थ म्हणजे जॅम, ब्रेड बटर. त्यातही लहान मुलांना जॅम अगदी नुसता खायलादेखील अतिशय आवडतो. परंतु गंमत म्हणजे हा पदार्थ पूर्वी ब्रेडसोबत नाही, तर जेवणानंतर तोंड गोड करावं म्हणून नुसता खाल्ला जाई.

जॅमचा शोध लागण्याआधी मार्मालेड तयार केला गेला. मार्मालेड म्हणजे मुख्यतः संत्र्याची साल, रस आणि कमी प्रमाणात साखर यानं तयार केलेला जॅम. हा थोडा कडसर असतो; परंतु संत्र्याची साल वापरल्याने चव अतिशय छान लागते.

जॅम आणि मार्मालेडची कथा काहीशी अशी सांगितली जाते. मेरी, स्कॉट्सची राणी, समुद्री आजारानं ग्रस्त होती. फ्रान्समध्ये तिच्या डॉक्टरांनी तिला बरे वाटावं म्हणून साखरयुक्त संत्र्याचं मिश्रण तयार केलं आणि मार्मालेड जन्माला आलं. कथेत, मार्मालेड हे नाव मेरी एस्ट मॅलेडवरून आलं आहे, ज्याचा अनुवाद मेरी आजारी आहे. (Marie est malade) तीन वेळा जलद म्हणण्याचा प्रयत्न करा आणि ते मार्मालेडसारखे ऐकू येईल. कथा गमतिशीर असली, तरी ही एक मिथक आहे.

मग खरं काय आहे? मुरंबा जसा भारतात प्राचीन काळापासून तयार केला जातो- तसाच ग्रीक आणि रोमनदेखील तयार करत असत. न जाणो कदाचित भारताशी असलेल्या व्यापारी संबंधातून ही कला तिथं गेली असावी. तर रोमन, ग्रीक फळांचा रस आणि मध एकत्र शिजवून घट्ट वडीसारखा गोड पदार्थ तयार करत असत आणि या वड्या जेवणाच्या शेवटी खाल्ली जात असे. त्या काळातील वैद्यदेखील सांगत असत, की उत्तम पचनाकरता ही जेलीसारखी फळांची वडी जेवणानंतर खावी. यात ते कधी मिरपूड, सुंठ, गुलाबजल, कस्तुरी, लवंग, ओवा यासारखे सुगंधी मसाले टाकत असत.

खरंतर मार्मालेड, जॅम म्हणजे फ्रूट जेली किंवा मुरंबे. परंतु प्रत्येक देशात त्यांचे वेगवेगळे पदार्थ तयार झाले. सुरुवातीला घट्ट वडीसारखा असणारा हा पदार्थ थोडा बदलत जाऊन घट्ट मुरंबा, पुढे थोडा बदल होऊन ब्रेडवर सहज पसरता येऊ शकणारा जॅम तयार झाला. परंतु यातील सर्वच पदार्थ आजही प्रचलित आहेत. आपल्याकडेसुद्धा तऱ्हेतऱ्हेचे मुरंबे तयार होतात, तसाच यातीलच एक वेगळा प्रकार म्हणजे गोव्यातील मूळ पोर्तुगीज पदार्थ ‘ग्वावा चीज.’ खरं तर हे चीज नव्हे; परंतु पेरूचा रस आटवून त्यापासून तयार होणारा वडीसारखा पदार्थ म्हणून त्याला ‘चीज’ म्हणतात.

मार्मालेड, जॅम, अमेरिकन जेली, आपला मुरंबा, आंबा पोळी, ग्वावा चीज, फ्रूट लेदर आणि आजकालच्या मुलांना आवडणारी फलेरोसारखी जेली कँडी असो- सारे एकच पदार्थाचे निरनिराळे प्रकार. देशोदेशी मिळणाऱ्या वेगवेगळ्या फळांचा आस्वाद वर्षभर घेता यावा, म्हणून तयार होणारे हे पदार्थ जेवणाची रुची वाढवतात. थंडी सुरू झाली आहे आणि बाजारात संत्री भरपूर येतील. तेव्हा वर्षभर टिकेल असं संत्र्याचं मार्मालेड कसं तयार करायचं ते पाहुयात. या सदरातील हा समारोपाचा लेख आणि सोबत तोंड गोड करायला गोड रेसिपी, जरूर करून पहा.

वर्षभर या सदराच्या माध्यमातून माझ्या वाचकांपर्यंत पोचता आलं याचं मोठं समाधान आहे. या निमित्तानं अनेक विषयांवर अधिक सखोल अभ्यास करता आला, अनेक गोष्टी सांगता आल्या, माहिती शेअर करता आली, रेसिपी सांगता आल्या, हा आनंद ‘पोटभर’ आहे. लोभ असावा.

साहित्य - १ किलो संत्री, ८०० ग्रॅम साखर, एका लिंबाचा रस, अर्धा टीस्पून सैंधव मीठ, ५ कप पाणी.

कृती -

  • पिकलेली संत्री सोलून त्यांच्या सालीचे बारीक काप करून घ्या. संत्र्याचा रस काढून घ्या.

  • एका जाड बुडाच्या पातेल्यात संत्र्याचा रस, पाणी, संत्र्याची साल, साखर, मीठ, लिंबू रस एकत्र करून मध्यम आचेवर उकळण्यासाठी ठेवून द्या.

  • मिश्रण अर्ध्यावर आले असता थंड पाण्यात त्याचा एक थेंब टाकून त्याचा गोळा होत आहे का ते बघा. असे झाल्यास गॅस बंद करा अथवा थोडे अजून शिजवा.

  • थोडे गरम असतानाच काचेच्या बरणीत भरून ठेवा. हे मार्मालेड किंवा संत्र्याच्या सालीचा जॅम ब्रेड बटरसोबत छान लागतो. यापासून संत्र्याच्या चवीचे गोड पदार्थदेखील करता येतात.

(हे सदर आता समाप्त होत आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com