esakal | Video: सावध व्हा, धोका टाळा!
sakal

बोलून बातमी शोधा

Video:  सावध व्हा, धोका टाळा!

चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे नियमितपणा आणि सावधानता! मित आहार, व्यायाम, चांगल्या सवयी याबरोबरच प्रकृतीची काळजी घेणे, दक्ष राहणे आणि मोठ्या आजाराला वेळीच प्रतिबंध करणे ही चांगल्या आरोग्याची त्रिसूत्री आहे.

Video: सावध व्हा, धोका टाळा!

sakal_logo
By
डॉ. ममता दिघे, स्त्रीरोगतज्ज्ञ

वुमन हेल्थ  
चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे नियमितपणा आणि सावधानता! मित आहार, व्यायाम, चांगल्या सवयी याबरोबरच प्रकृतीची काळजी घेणे, दक्ष राहणे आणि मोठ्या आजाराला वेळीच प्रतिबंध करणे ही चांगल्या आरोग्याची त्रिसूत्री आहे. योग्य चाचण्या करून घेऊन प्रतिबंधात्मक उपाय वेळच्या वेळी केल्यास मोठी दुखणी निश्चितपणे टाळता येतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सर्व्हायकल कॅन्सरचे परीक्षण स्त्रियांच्या स्वास्थ्यासाठी अतिशय आवश्यक आहे. पण ते कसे करावे, कुठे करावे यासारखे अनेक प्रश्न मनात पिंगा घालतात. सध्याच्या आरोग्यविषयक मार्गदर्शक तत्त्वांनुसार पहिल्या लैंगिक संबंधापासून किंवा २१ वर्षे वय झाल्यापासून, जे आधी असेल त्याच्या तीन वर्षांच्या आत स्त्रियांनी पॅप स्मियर टेस्ट करून घ्यायला सुरुवात केली पाहिजे. चाचणी नॉर्मल असेल, तर दर तीन वर्षांनी ही चाचणी करत राहावी. ३० वर्षे वयानंतर तुम्ही HPV चाचणीही याच्या बरोबरीने करून घेतल्यास, प्रत्येक ५ वर्षांनी ही चाचणी केली तरी चालते. 
 

या जिवाणूमुळे सर्व्हायकल कॅन्सरची शक्यता वाढते आणि त्याचे परीक्षण केल्याने धोका टाळण्यास खूप मदत होते. पॅप स्मियर परीक्षणामुळे गर्भाशयाचे तोंड, म्हणजेच सर्व्हिक्सवर कॅन्सरच्या आधीचे बदल दिसत असल्यास ते लगेच लक्षात येतात. या बदलांवर उपचार करून त्या बदलांचे कॅन्सरमध्ये होणारे रूपांतर टाळता येते.

पॅप स्मियर म्हणेज काय?
या चाचणीत कोणतीही वेदना होत नाही. सर्व्हिक्सवरून ब्रश किंवा कापसाच्या मदतीने स्वॅब घेतला जातो. त्यात काही अनैसर्गिक नाही ना. हे पाहण्यासाठी हे सँपल पाठवले जाते.

चाचणीचे फायदे
पॅप स्मियर चाचणीमध्ये काही अनैसर्गिक वाढ दिसल्यास डॉक्टरना लगेच त्याचा तपास करून योग्य उपाययोजना करता येतात.

चाचणी किती अंतराने करावी?
२१ ते ६५ वयोगटात दर तीन वर्षांनी ही चाचणी करावी आणि या बरोबरच HPV ची चाचणी करून घेत असाल, तर ही चाचणी दर ५ वर्षांनी केली तरी चालते.

चाचणी अनैसर्गिक आल्यास?
अनैसर्गिक चाचणी म्हणजे तुमच्या सर्व्हिक्सवर अनैसर्गिक वाढ दिसणे. अनैसर्गिक वाढ कोणत्या प्रकारची आहे, हे बघून काही वेळेला डॉक्टर काही काळाने परत टेस्ट करायला सांगतात, त्यावर औषधे देतात किंवा कोल्पोस्कोपी करतात. जेणेकरून अधिक नीट परीक्षण करून, बायोप्सीसाठी सँपल घेता येते. बरेचसे सलग रिपोर्ट नॉर्मल असतील तर ६५ वर्षावरील स्त्रियांनी ही चाचणी करणे बंद करायला हरकत नसते.

ही चाचणी कदाचित थोडी अडचणीची वाटू शकेल. चाचणी करताना अवघडल्यासारखे वाटू शकेल, पण पुढील धोक्यांचा विचार करता, ही चाचणी स्त्रियांसाठी अत्यावश्यक आहे आणि निरामय आयुष्यासाठी त्याचा उपयोग प्रत्येक स्त्रीने आवर्जून केला पाहिजे.

loading image
go to top