माय फॅशन : सर्व रंग आवडीचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chinmayi salavi

पारंपरिक पोशाख परिधान करताना, विशेषत: साडी नेसताना काळजी घ्यावी लागते.

माय फॅशन : सर्व रंग आवडीचे

- चिन्मयी साळवी

मी फॉलो करेन अशी विशिष्‍ट प्रकारची कोणतीच फॅशन नाही; पण मी पोशाख परिधान करताना ते आरामदायी असण्‍याची आणि माझ्या व्‍यक्तिमत्त्वाला शोभून दिसतील याची खात्री घेते.

पारंपरिक पोशाख परिधान करताना, विशेषत: साडी नेसताना काळजी घ्यावी लागते. सध्या मी ‘सोनी सब’ वाहिनीवरील ‘वागले की दुनिया’ या मालिकेत माझ्या व्यक्तिरेखेला साजेसे खूप कॅज्युअल कपडे परिधान करते; पण मला खऱ्या आयुष्यात वेस्टर्न आणि ट्रेडिशनल दोन्ही प्रकारचे कपडे परिधान करायला आवडतात. मला साडी नेसायला खूप आवडते. मी साडी नेसते, त्‍यावेळी मी साडीसोबत हाय हिल्‍स घालणे टाळते. कारण स्टिलेटोस किंवा हाय हिल्‍ससोबत साडीवर वावरणे अवघड आहे आणि अडखळून पडण्‍याची नेहमीच भीती असते. मी पारंपरिक पोशाख परिधान करते, तेव्‍हा त्‍यांना साजेशी आभूषणेदेखील परिधान करते, कारण आभूषणे व पोशाख एकमेकांना शोभून दिसले पाहिजेत.

माझा फॅशन फंडा अत्‍यंत सोपा आहे. तुम्ही जे कपडे घालता, त्यात तुम्ही कॉन्फिडन्ट असाल, तर तुम्ही आपोआप सुंदर दिसता. मला सगळे रंग आवडतात; त्यामुळे माझे आऊटफिट हे नेहमी कलरफुल असतात. मला सगळ्या रंगाचे कपडे परिधान करायला आवडतात, त्यातल्या त्यात मला गडद रंग आवडतात, ज्यात आपण अजून उठून दिसतो.

माझी कोणीच फॅशन आयकॉन नाही. प्रामाणिकपणे सांगायचे तर माझी कोणाच्‍याही फॅशन स्‍टाइलचे अनुकरण करण्‍याची इच्‍छा नाही. म्‍हणून माझी कोणीच फॅशन आयकॉन नाही.

फॅशन टिप्स

१) आपल्‍या त्‍वचेला आरामदायी वाटेल अशा फॅशनचा अवलंब करावा.

२) कोणालाही फॉलो न करता तुमची स्वतःची स्टाईल बनवा.

३) पोशाखाच्या फिटिंगकडे लक्ष द्या.

४) तुम्‍ही कोणताही पोशाख परिधान करा, त्‍यामध्‍ये तुम्‍हाला आरामदायी वाटले पाहिजे.

५) तुम्‍हाला आरामदायी वाटत असेल, तर ते आऊटफिट/लुक तुम्‍हाला शोभून दिसेल. हेच खऱ्या फॅशनचे सौंदर्य आहे.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

टॅग्स :Fashiondressclothes