नवरात्रीमध्ये हटके लूक हवायं?; ट्राय करा या Saree Draping स्टाईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडी नेसण्याचे हटके पर्याय

Navratri 2021: नवरात्रीमध्ये हटके लूक हवायं?; ट्राय करा या Saree Draping स्टाईल

नवरात्र जवळ आली की ठेवणीतल्या साड्या मुद्दाम बाहेर काढल्या जातात. अनेकजणी त्या त्या दिवसाचे रंग फॉलो करत असल्याचेही पाहायला मिळते. त्यामुळे पैठणी, शालू, कांजीवरम, गढवाल अशा प्रकारच्या साड्या यांच्या खूप व्हरायटी या काळात पाहायला मिळतात. पण नेहमीच पारंपारिक साडी नेसण्यापेक्षा साडी नेसण्याचे विविध प्रकार या नवरात्रीत ट्राय केलेत तर तुमच्या नेहमीच्या साड्यांना एक वेगळा लूक येईल. शिवाय आजकाल कपडे भाड्याने घेण्याचीही फॅशन आहे. तुम्ही एखादी वेगळी साडी भाड्याने घेऊन ती वेगळ्या प्रकारे नेसून तुम्ही हटके लूक करू शकता.

शिल्पा शेट्टी तिच्या हटके साडी स्टाईलसाठी ओळखली जाते.

शिल्पा शेट्टी तिच्या हटके साडी स्टाईलसाठी ओळखली जाते.

क्लासिक बेल्ट स्टाइल

एका डान्स शो साठी चार दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीने नेसलेली पिवळ्या रंगाची साडी तुम्ही या नवरात्रीत पहिल्या दिवशी नेसण्याचा विचार करू शकता. यात तिने कमरेला बेल्ट लावला आहे, त्यानंतर साडी नेसली आहे. पिवळ्या साडीवर सोनेरी रंगाचा बेल्ट एकदम उठून दिसतोय, तुम्हीही असा लूक ट्राय करू शकता.

फ्यूजन, इंडो, वेस्टर्न स्टाइल

पॅन्ट्स आणि साडीचे फ्यूजन करून इंडो वेस्टर्न लूक कॅरी करता येतो. अशा साड्या दिसायला एकदम हटके लूक देतात.

आलीयाची ही साडी

आलीयाची ही साडी

रफ्फल साडी

दोन कॉंम्बिनेशन्स एकत्र करून ही साडी तयार केली जाते. यात तुमच्या साडीची बॉर्डर किंवा पदराला तसा लूक दिलेला असतो. त्यामुळे ति दिसायला एकदम हटके दिसते.

पॅन्ट स्टाईल साडी

परकराएवजी साडीवर मॅच होणारी लॅगिन अथवा पेन्ट घालून त्यावर साडी नेसायची. हा लूक सध्या खूप लोकप्रिय आहे. तुम्हाला जर पेन्ट दिसायला नको असेल तरी हरकत नाही. तुम्ही तशीही साडी कॅरी करू शकता.

शिमर साडी

पार्टी किंवा नाईट पार्टीसाठी एकदम बेस्ट लूक देणारी ही साडी झगम़गीत प्रकारातली असते. यात गोल्डन, ब्लॅक, ब्लू असे वेगवेगळे कलर तुमच्या लूकला एकदम हटके करतात. सिल्वलेस ब्लाऊज या साडीत अधिक आकर्षक दिसतो.

ग्राफिक साडीसाडीवर आपले नाव, अथवा एखादा मजकूर मोठ्या अक्षरात प्रिंट करून तश्या साड्या कॅरी करण्याची फॅशन सध्या इन आहे. रीया कपूर, सोनम कपूर यांच्याबरोबहीने तेजस्विनी पंडीतच्या साडीच्या ब्रॅंडमध्ये तश्या प्रकारच्या साड्या पाहायला मिळतात.

टॅग्स :lifestylesaree