माय फॅशन : ‘प्रसंगांना साजेसे पोशाख निवडा’

मला सर्व प्रकारचे पोशाख परिधान करायला आवडतात. पारंपरिक, वेस्टर्न, इंडो-वेस्टर्न यांचे सर्व फॅशन ट्रेंड्स मी फॉलो करते.
Prachi Bohra
Prachi BohraSakal
Summary

मला सर्व प्रकारचे पोशाख परिधान करायला आवडतात. पारंपरिक, वेस्टर्न, इंडो-वेस्टर्न यांचे सर्व फॅशन ट्रेंड्स मी फॉलो करते.

- प्राची बोहरा

मला सर्व प्रकारचे पोशाख परिधान करायला आवडतात. पारंपरिक, वेस्टर्न, इंडो-वेस्टर्न यांचे सर्व फॅशन ट्रेंड्स मी फॉलो करते. मुळात मी थोडी टॉमबॉय असल्यामुळे मला बॅगी जीन्स, ओव्हरसाइज्ड टॉप असे कपडे घालायला जास्त आवडतं. ‘सोनी सब’ वाहिनीवरील ‘मॅडम सर’ या मालिकेत मी साकारत असलेली बिन्नी ही व्यक्तिरेखा लाल रंगाच्या साडीमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळते; पण ती साडी एका वेगळ्या प्रकारे नेसलेली असते, जेणेकरून माझी व्यक्तिरेखा इतरांपेक्षा वेगळी दिसेल.

मी कुठलाही पोशाख परिधान करते, तेव्हा मी डोक्यापासून पायापर्यंत सर्व गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देते. जेव्हा मी पारंपरिक पोशाख परिधान करते, तेव्हा माझे हेअर, मेकअप, अॅक्सेसरीज, चप्पल या सगळ्या गोष्टीदेखील अगदी टॉप क्लास असल्या पाहिजेत, याकडे माझा कल असतो. ॲटिट्यूडदेखील खूप महत्त्वाचा असतो. ‘मॅडम सर’ या मालिकेत मी बिन्नीची भूमिका साकारतेय, जी एक हरियानातली मुलगी आहे. मी या मालिकेमध्ये साडी नेसत असले, तरी माझा अॅटिट्यूड माझ्या व्यक्तिरेखेला सगळ्यांपेक्षा वेगळं बनवतो.

माझा विशिष्ट असा काही फॅशन फंडा नाही; पण मी कुठेही जाताना त्या ठिकाणी किंवा त्या प्रसंगाला काय कपडे घातले पाहिजेत, याचा दृश्यरूपाने विचार करते- जेणेकरून माझ्यासाठी पोशाख आणि त्यासोबत बाकीच्या गोष्टी निवडणं सोपं जातं. मला रंगांचे मिश्रण असलेले पोशाख परिधान करायला आवडतं किंवा कधीकधी सिंगल टोन कपडेदेखील परिधान करायला आवडतात. मला लाईट कलर्स खूप आवडतात; कारण ते क्लासी वाटतात.

माझी फॅशन आयकॉन मी स्वतःच आहे. मी उत्तराखंडची आहे आणि तिथे कोणी जास्त फॅशन ट्रेंड्स फॉलो करत नाही. मी स्वतः आधीपासूनच खूप फॅशनेबल आहे. एक असतं मेकअप करून छान दिसणं आणि दुसरं असतं स्वतःचा अॅटीट्युड कॅरी करून फॅशनेबल राहणं. मी दुसऱ्या प्रकारात मोडते आणि म्हणून मी स्वतःलाच स्वतःची फॅशन आयकॉन मानते.

फॅशन टिप्स

  • कॉन्फिडन्ट राहा, म्हणजे तुम्ही आपोआप सुंदर दिसता.

  • कपड्यांसोबत मेकअप, हेअर हे सगळंदेखील व्यवस्थित असलं पाहिजे.

  • फूटवेअरला देखील तेवढंच महत्त्व द्यावं. कपड्यांच्या स्टाइलनुसार फूटवेअरची निवड करावी.

  • अपल्या देहबोलीकडे लक्ष द्या.

  • कपड्यांची निवड विचार करून करा.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com