माय फॅशन : ‘ॲक्सेसरीजची निवड अतिशय महत्त्वाची’

आपल्या पोशाखानुसार दागिने, ज्वेलरी खूप महत्त्वाची असते. त्यामुळे आपला कॉस्च्युम; तसेच आपली फॅशन यांना पूर्णत्व येते.
pratiksha shivankar
pratiksha shivankarsakal
Updated on
Summary

आपल्या पोशाखानुसार दागिने, ज्वेलरी खूप महत्त्वाची असते. त्यामुळे आपला कॉस्च्युम; तसेच आपली फॅशन यांना पूर्णत्व येते.

- प्रतीक्षा शिवणकर

माझा आवडता ड्रेसचा प्रकार साडी आणि सलवार कुर्ता आहे. पारंपरिक पोशाख मला सर्वांत जास्त आवडतो. त्यात मी कम्फर्टेबल असते. मला ते कॅरी करायलाही सोपे जाते. त्यात मला कोणतेच उगाचच कोणतेही कपडे घातलेत असेही वाटत नाही. कोणतीही फॅशन करताना कम्फर्ट झोन खूप महत्त्वाचा असतो, जेणेकरून आपण दिवसभर कुठेही जाताना अडथळा येत नाही.

आपल्या पोशाखानुसार दागिने, ज्वेलरी खूप महत्त्वाची असते. त्यामुळे आपला कॉस्च्युम; तसेच आपली फॅशन यांना पूर्णत्व येते. साडी नेसल्यानंतर केशभूषासुद्धा खूप महत्त्वाची असते. आपण साडी नीट नेसली आणि आपली ज्वेलरी बदलली, तर आपला लुक चेंज होतो. वेशभूषा आणि केशभूषेबरोबरच मेकअपसुद्धा खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा केव्हा आपण साडी नसतो तेव्हा मेकअप, हेअर सगळे नीट सेट करून बाहेर पडावे, असे मला वाटते.

आपण जे कपडे घालतोय त्यात आपण प्रचंड कम्फर्टेबल असायला हवे. बाहेर फिरायला जाताना, कार्यक्रमाला जाताना, घरात असताना आपण जे कपडे घालू, त्यात कम्फर्टेबल असणे महत्त्वाचे आहे. नाहीतर आपला आत्मविश्वास ढासळतो आणि सुंदरही दिसू शकत नाही. एखादा ड्रेस छान असतो, मेकअप छान असतो; पण तुम्ही त्यात कम्फर्टेबल नसाल तर आपोआप आपल्या चेहऱ्यावर, बॉडी लँग्वेजमध्ये लगेच जाणवते.

काही लोकांना वाटते, की हा रंग माझ्यावर छान दिसतो. हा रंग बरा दिसत नाही. माझ्यासाठी कपड्यांच्या बाबतीत रंगांचे कोणतेही बंधन नाहीये. सगळे रंग इतके सुंदर आहेत, तर आपण सर्व रंगांचे कपडे परिधान करायला पाहिजेत. मग ते साडी असूदे, वनपीस असूदे किंवा टॉप असूदे... मला सगळे रंग खूप आवडतात आणि सगळ्या रंगांचे कपडे वापरायलाही खूप आवडतात.

सध्या मी ‘सोनी मराठी वाहिनी’वर ‘जिवाची होतिया काहिली’ या मालिकेत रेवतीची भूमिका साकारत आहे. अभिनयात असल्याने मला फॅशनबाबत खूप काळजी घ्यावी लागते. खरेतर फॅशन आयकॉन म्हणून कविता मेढेकर ही एकच व्यक्ती माझ्या डोळ्यापुढे येते. एखादा फॅब्रिक जरी पहिले, तरी तिच्या डोक्यात ड्रेस तयार होतो. त्यानंतर ती तिच्या डिझायनरकडून हुबेहूब शिवून घेते आणि त्यानंतर जेव्हा ती घालून येते तेव्हा फॅब्रिक घेताना ज्या पद्धतीने वर्णन केलेले असते ती हुबेहूब तशी दिसत असते. एवढे गणित जमणे हे खरोखरच मिरॅकल आहे, जे मला कधी जमू शकत नाही आणि त्यामुळे कविता मेढेकर ही माझी फॅशन आयकॉन आहे.

फॅशन टिप्स....

  • आपण जे परिधान करतो, त्यात आपण प्रचंड कम्फर्टेबल असायला हवे.

  • आपल्याकडे ॲक्सेसरीजचा सेट असायला हवा. बांगड्या, कानातले या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ पाहिजेत.

  • एखाद्याने आपल्याला कॉम्प्लिमेंट दिली म्हणजे आपण चांगले दिसतो. मात्र, त्याआधीच आपल्याला स्वतःचा अंदाज आला पाहिजे. आपण तयार होतो, तेव्हाच आपल्याला कळते, की आपल्या लिपस्टिकचा शेड चुकला आहे. आपले कानातले बरोबर नाहीयेत वगैरे.

  • आधी आपण ठरवायला पाहिजे, की आपल्याला काय सूट होतेय अन् काय नाही आणि त्यानुसार अंमलबजावणी केली पाहिजे.

  • सर्व रंगांचे कपडे परिधान करायला पाहिजेत.

(शब्दांकन - अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com