माय फॅशन : ‘साधेपणातही सैंदर्य शोधा’

माझा फंडा आहे ‘लेस इज मोअर.’ मला सिंपल फॅशन आवडते- जी एलिगंट वाटते. मला विंटेज फॅशनदेखील आवडते. सिंप्लिसिटी जास्त क्लासी वाटते, त्यामुळे मी तशीच फॅशन फॉलो करते.
rachana parulkar
rachana parulkarsakal
Summary

माझा फंडा आहे ‘लेस इज मोअर.’ मला सिंपल फॅशन आवडते- जी एलिगंट वाटते. मला विंटेज फॅशनदेखील आवडते. सिंप्लिसिटी जास्त क्लासी वाटते, त्यामुळे मी तशीच फॅशन फॉलो करते.

- रचना पारुलकर

माझा फंडा आहे ‘लेस इज मोअर.’ मला सिंपल फॅशन आवडते- जी एलिगंट वाटते. मला विंटेज फॅशनदेखील आवडते. सिंप्लिसिटी जास्त क्लासी वाटते, त्यामुळे मी तशीच फॅशन फॉलो करते. ‘सोनी सब’ वाहिनीवरील ‘मॅडम सर’ या मालिकेत मी शिवानीची भूमिका साकारत आहे आणि शिवानी ही नेहमी प्रेक्षकांना एका लाल रंगाच्या साडीमध्ये दिसते; कारण ती साडी ‘चिंगारी गॅंग’चा ‘युनिफॉर्म’ आहे. मात्र, त्या लाल साडीसोबत ज्या प्रकारे माझी स्टायलिंग केली जाते, ती खूप साधी असते. त्यामुळे माझं सौंदर्य अजून खुलून दिसतं. त्यामुळे मी अशीच फॅशन फॉलो करते- जी साधी; पण क्लासी असते.

मी नेसलेली साडी खूप हेवी असेल, तर मी माझा मेकअप आणि ज्वेलरी साधी आणि लाइट परिधान करते आणि साडी साधी असेल, तर मी त्यावर छान मोठे कानातले आणि टिकली लावते. मला धारी काठाच्या साड्या खूप आवडतात. त्यामुळे मी खूप जास्त कलाकुसर केलेले कपडे टाळते. ‘मॅडम सर’मधील मी साकारत असलेली शिवानीची व्यक्तिरेखादेखील फक्त साडीच नसते. ती साडीदेखील साधी आहे. त्यामुळे त्याच्यावर उत्तम मेकअप आणि साध्या ज्वेलरीमुळे माझं व्यक्तिमत्त्व उठावदार दिसतं.

माझ्यासाठी फॅशन फंडा म्हणजे जे मला आवडेल तसे कपडे परिधान करायचे. मी कोणाकडूनही कपड्यांबाबत सल्ला घेत नाही. मी स्वतःसाठी कपडे परिधान करते, दुसऱ्यांसाठी नाही. त्यामुळे फॅशनबद्दल सांगायचं झालं, तर माझा कंफर्ट माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.

मला रंगांसोबत प्रयोग करायला आवडतं. एखाद्या प्रसंगासाठी अमुक रंग चांगला वाटत असेल, तर मी त्या रंगाचे कपडे परिधान करते. रंगांची निवड करताना मी त्या रंगामध्ये कशी दिसेल याची कल्पना करते.

ऑड्री हेपबर्न ही ब्रिटिश अभिनेत्री माझी फॅशन आयकॉन आहे. मला त्यांचा साधेपणा आणि एलिगन्स खूप आवडतो. ती जे पोशाख परिधान करते, ते खूप क्लासी आणि कंफर्टेबल असतात.

फॅशन टिप्स....

  • एक साधी जीन्स आणि सफेद रंगाचा टी-शर्ट हा एक बेस्ट आऊटफिट आहे- जो तुमच्याकडे असला पाहिजे. लेस इज मोर.

  • तुमच्यात आत्मविश्वास असेल, तर तुम्ही कुठल्याही पोशाखात तुम्ही सुंदर दिसता.

  • एक्स्प्लोअर करत राहा, त्यामुळे तुम्हाला कळेल, की तुम्हाला कुठली फॅशन जास्त सूट करते.

  • कपड्यांसोबत फूटवेअर आणि बॅग या दोन गोष्टींनादेखील तितकंच महत्त्व द्या.

  • वेगवेगळ्या रंगांसोबत प्रयोग करा.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com