माय फॅशन : ‘व्यक्तिमत्त्वानुसारच कपडे परिधान करा’

अभिनयात असल्याने मला फॅशन या गोष्टीवर खूप भर द्यावा लागतो. मला एका पॅटर्नचे किंवा एका स्टाइलचे कपडे नाही आवडत. मला नेहमीच ट्रेंडी रहायला आवडते.
Radha Sagar
Radha SagarSakal
Summary

अभिनयात असल्याने मला फॅशन या गोष्टीवर खूप भर द्यावा लागतो. मला एका पॅटर्नचे किंवा एका स्टाइलचे कपडे नाही आवडत. मला नेहमीच ट्रेंडी रहायला आवडते.

गेल्या नऊ वर्षांपासून मी अभिनय क्षेत्रामध्ये काम करत आहे. पुण्याची असली, तरी चित्रीकरणामुळे मला मुंबईत राहावे लागते. मी कथक नृत्यकलाकार असून माझी अभिनयाची सुरुवात थिएटरपासून झाली. सध्या मी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत अभिलाषाची भूमिका साकारत आहे.

अभिनयात असल्याने मला फॅशन या गोष्टीवर खूप भर द्यावा लागतो. मला एका पॅटर्नचे किंवा एका स्टाइलचे कपडे नाही आवडत. मला नेहमीच ट्रेंडी रहायला आवडते. एखादा कार्यक्रम असेल, फेस्टिव्हल असेल वा कुठे जायचे असेल, तर त्यानुसार मला फॅशन करायला आवडते. मला सर्वच प्रकारचे कपडे घालायला आवडतात. स्कर्ट टॉप, भारतीय पेहराव, वेस्टन वनपीसेस, जीन्स, साडीही घालायला आवडते.

प्रत्येकाचा रंग व शरीरयष्टी वेगवेगळी असते. त्यामुळे आपल्याला जे कपडे उठून दिसतात, अशा प्रकारचे कपडे आवर्जून घालावेत. आपल्याला जे सूट होतात, ज्यात आपल्याला आत्मविश्वास येतो, जे कपडे आपण कॅरी करू शकतो, तेच कपडे घालावेत. फॅशन सुरू आहे म्हणून उगीचच त्या प्रकारचे कपडे घालू नयेत.

साडीचा पदर कधी वरती पिनअप केला तरी चालतो किंवा खांद्यांवरून हातावर सोडला तरी चालतो; पण हेवी साडी अन्‌ त्यावर खूप दागिने घातले तर बटबटीत दिसते. त्यासाठी चांगल्या प्रकारचे अन्‌ साडीला शोभतील असे दागिने व कानात रिंग्ज घालाव्यात. त्याचप्रमाणे चप्पल, शूज वा सँडल घालावेत.

ज्यात तुम्ही कम्फर्टेबल असाल व जे कपडे आपल्याला चांगले दिसतात, तेच परिधान करा, हाच माझा फॅशन फंडा आहे. हल्ली फॅशन काहीही असू शकते. त्यामुळे आपल्याला जे आवडते, त्यालाच प्राधान्य द्यावे.

रंगाची निवड करताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण, आपला रंग कसा आहे, त्यावरून रंगांची निवड करावी लागते. मी फेअर आहे, त्यामुळे मला कुठलाही कलर सूट होऊ शकतो. डार्क, पेस्टल कलरही मला खूप सूट करतात. सावळा रंग असेल तर लाइट किंवा विरुद्ध रंगांची निवड करावी.

दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा व कंगना राणावत या माझ्या फॅशन आयकॉन आहेत. यांचा फॅशन सेन्स मला खूप आवडतो. कारण, त्यांना जे सूट होईल, तेच कपडे त्या परिधान करतात.

फॅशन टिप्स

  • जे तुम्ही व्यवस्थित आणि छानपैकी कॅरी करू शकाल असेच कपडे घाला.

  • कुणीचीही कॉपी करण्यापेक्षा तुम्हाला जे सूट होईल असे नवीन काहीतरी करा.

  • सतत मॅचिंग कपडे घालण्यापेक्षा विरुद्ध रंगांचे कपडेही ट्राय करा. कारण, असे कॉम्बिनेशनही खूप छान दिसते.

  • आत्मविश्वास ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. कारण, तुम्ही काहीही घातले, तरी तुमच्या चेहऱ्यावर तेवढाच आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे.

  • तुमचा आउटफिट जसा असेल, त्यानुसार हेअरस्टाइल, मेकअप, अॅक्सेसरीज व फुटवेअर घालावेत. कारण, त्यावरूनच आपले व्यक्तिमत्त्व खुलत असते.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com