गॉसिप गप्पा : अस्ताद असणार ‘साक्षी’ला!

राजसी वैद्य
Friday, 22 January 2021

कलर्स मराठीवरची ‘चंद्र आहे साक्षीला’ मालिका आता रंजक वळणावर आली आहे. श्रीधरनं स्वातीसोबत पळून जाऊन लग्न केलं. त्यानं रचलेल्या जाळ्यात स्वाती पुरेपूर अडकली आहे. श्रीधरवर जिवापाड प्रेम करणारी स्वाती श्रीधर आणि सुमनचं  खरं नातं सामोरं आल्याने एकटी पडली आहे. या सगळ्याला ती कशी सामोरी जाणार? आलेल्या संकटाला ती कशी उत्तर देणार?

कलर्स मराठीवरची ‘चंद्र आहे साक्षीला’ मालिका आता रंजक वळणावर आली आहे. श्रीधरनं स्वातीसोबत पळून जाऊन लग्न केलं. त्यानं रचलेल्या जाळ्यात स्वाती पुरेपूर अडकली आहे. श्रीधरवर जिवापाड प्रेम करणारी स्वाती श्रीधर आणि सुमनचं  खरं नातं सामोरं आल्याने एकटी पडली आहे. या सगळ्याला ती कशी सामोरी जाणार? आलेल्या संकटाला ती कशी उत्तर देणार? श्रीधरला शिक्षा मिळवून देणार?... असे अनेक प्रश्न समोर आले आहेत. मात्र, या सगळ्यामध्ये आता मालिकेमध्ये एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अस्ताद काळे या प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री होणार आहे. आता मालिकेमध्ये त्याची नक्की काय भूमिका असणार आहे? त्याच्या येण्यानं नक्की काय घडेल? श्रीधर- स्वातीच्या आयुष्यात काय उलथापालथ होईल?.. हे सगळं बघणं उत्सुकतेचं असणार आहे. अस्तादच्या भूमिकेचं नाव, त्याची भूमिका काय असेल हे अजून तरी गुलदस्तात आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajsi Vaidya Writes about Astad kale