
सोनी टीव्हीवरचा द कपिल शर्मा शो काही काळासाठी ब्रेक घेणार आहे. हा कार्यक्रम खूप लोकप्रिय असला, तरी त्यामध्ये काहीसा तोचतोचपणा आल्यामुळे तो नवीन रूपात सादर केला जाण्याची शक्यता आहे.
सोनी टीव्हीवरचा द कपिल शर्मा शो काही काळासाठी ब्रेक घेणार आहे. हा कार्यक्रम खूप लोकप्रिय असला, तरी त्यामध्ये काहीसा तोचतोचपणा आल्यामुळे तो नवीन रूपात सादर केला जाण्याची शक्यता आहे. कलाकारांपासून सादरीकरणापर्यंत अनेक गोष्टी बदलल्या जातील, अशी चर्चा आहे. खुद्द कपिल शर्मा वैयक्तिक जीवनात व्यग्र आहे. त्याच्या घरी दुसरा पाहुणा येऊ घातल्याचीही चर्चा आहे. त्यामुळेच कपिलनं तूर्त या शोमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतं.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सेटवर प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर येऊ शकत नसल्यानं नेहमीची ऊर्जाही कलाकारांना अनुभवायला मिळत नाही, अशी त्यांची तक्रार आहे. त्यामुळे एकूणच तूर्त तरी कपिलच्या चाहत्यांना नवीन रूपातल्या कार्यक्रमासाठी काही काळ वाट बघावी लागणार आहे.
Edited By - Prashant Patil