
यंदाचं वर्ष हे काही कलाकारांसाठी नव्या आयुष्याची सुरुवात करणारं ठरणार आहे. बाॅलिवूडचा चाॅकलेट बाॅय वरुण धवन आणि नताशा दलाल लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. २४ जानेवारी रोजी अलिबाग इथं त्यांचं लग्न होत आहे. त्याच तारखेला टीव्ही इंडस्ट्रीतले दोन प्रसिद्ध कलाकार विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत.
यंदाचं वर्ष हे काही कलाकारांसाठी नव्या आयुष्याची सुरुवात करणारं ठरणार आहे. बाॅलिवूडचा चाॅकलेट बाॅय वरुण धवन आणि नताशा दलाल लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. २४ जानेवारी रोजी अलिबाग इथं त्यांचं लग्न होत आहे. त्याच तारखेला टीव्ही इंडस्ट्रीतले दोन प्रसिद्ध कलाकार विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. करणवीर मेहरा आणि निधी व्ही. सेठ यांचा विवाह होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी काही मित्रमंडळींसाठी डीनर पार्टी आयोजित केली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
करणनं सांगितलं, की आम्ही लग्नसोहळ्याला केवळ तीस लोकांनाच आमंत्रित केलं आहे. आम्ही काही मित्रमंडळीसाठी मुंबईत रिसेप्शन ठेवलं आहे. निधी म्हणते, की गेलं वर्ष सगळ्यांसाठी अत्यंत वाईट गेलं. मात्र, हे वर्ष नव्या उत्साहाचं आणि आनंदाचं आहे. आमच्यासाठी हे वर्ष स्पेशल आहे.
Edited By - Prashant Patil