वाचनाची ‘अनुभूती’ घ्या

सीमा नितीन
Friday, 20 November 2020

पुस्तकं विकत घेऊन ती वाचण्याचा आनंद काही औरच असतो, हे खरंच; पण वाचनालयांत जाण्यामुळे वाचनप्रेमी भेटतात, पुस्तकं चाळायला मिळतात, चर्चा होते. त्यातून खूप चांगलं मोटिव्हेशन मिळतं.

अवांतर पुस्तकांचं वाचन करताना त्या लेखकाच्या मानसिकतेप्रमाणं वाचन करता येतं का ते बघा. असं करणं म्हणजे एक प्रकारे ट्रान्समध्ये जाणं असतं. लेखक ज्या स्थळाचं वर्णन करतो आहे, तिथं मानसिकदृष्ट्या आपण उपस्थित आहोत, अशी अनुभूती घेणं. असं जमायला लागलं, की वाचनाशी आपण एकरूप झालो, असं समजायचं. समजा तुम्ही व्यंकटेश माडगूळकर यांचं ‘बनगरवाडी’ वाचताय, तर अशा वेळी अगदी सुरुवातीच्या वर्णनापासून तुम्ही मानसिकदृष्ट्या तिथं पोचला पाहिजे. त्या प्रतिमा तुमच्या अंतःचक्षूंपर्यंत पोचल्या पाहिजेत. हे असं झालं, की मग नंतरही तुम्हाला पुस्तकातले शब्द सतत स्मरणात राहतील किंवा किमान तो अनुभव तरी तुमच्या मेंदूच्या एखाद्या कोपऱ्यात बंदिस्त होऊन राहील. वाचताना मनात दृश्यप्रतिमांचा हा समांतर ट्रॅक तयार होत नसेल, तर मात्र काही तरी चुकतंय, असं नक्की समजा. मनाची कवाडं उघडी ठेवून वाचणं म्हणजे काय, हे अशा वेळी लक्षात येतं.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नुसती शब्दांवरून झरझर नजर फिरवणं म्हणजे वाचन नाहीच. ते हृदयापर्यंत पोचतंय का ते बघा. यंत्रवत वाचन व्हायला लागलं की थांबावं. हा क्षण प्रत्येकालाच जाणवतो. थोडा वेळ किंवा अगदी थोडे दिवसही थांबायचं. या ‘ब्रेक’नंतर केलेलं वाचन ताजंतवानं करणारं असतं.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वाचनाबाबत कानमंत्र 
वाचनाचा उत्साह वाढण्यासाठी एक गोष्ट आपण करू शकतो; ते म्हणजे वाचनालय लावणं. पुस्तकं विकत घेऊन ती वाचण्याचा आनंद काही औरच असतो, हे खरंच; पण वाचनालयांत जाण्यामुळे वाचनप्रेमी भेटतात, पुस्तकं चाळायला मिळतात, चर्चा होते. त्यातून खूप चांगलं मोटिव्हेशन मिळतं.

Sakal Video Gallery पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पुस्तक वाचल्यानंतर कुणा वाचनप्रेमीशी चर्चा नक्की करा. पुस्तकं वाचल्यानंतर केलं जाणारं आदानप्रदान हा अतिशय आनंदाचा भाग असतो. त्यातून आपणच वाचलेल्या अनेक गोष्टींचे नवे पैलू कळतात.

 एखाद्या लेखकाचं किंवा एखाद्या जॉनरचं वाचन करत असाल, तर ते पुस्तक संपल्यानंतर तोच लेखक किंवा जॉनर कंटिन्यू करा.  

 आवडलेलं पुस्तक काही काळानंतर परत वाचून बघा. 

पालकांनी हे लक्षात घ्यावं
मुलांना पुस्तकं वाचून दाखवत असताना, इतर कलांचीही तोंडओळख करून द्या. त्यातून त्यांना अधिक चांगला आस्वाद घेता येईल.

एखादी कलाकृती बघितल्यावर तिच्याशी संबंधित पुस्तक मुलांना नक्की सुचवा. उदाहरणार्थ ः ‘फास्टर फेणे’ चित्रपट बघितल्यावर लेखक भा. रा. भागवत यांची पुस्तकं वाचायला मुलांना नक्की सुचवा.

घरात एखादा रीडिंग कॉर्नर तयार करता येतो का, त्याचा नक्की विचार करा.
पुस्तकांतली चटकदार वाक्यं, एखादा सुविचार मुलांच्या अभ्यासाच्या टेबलजवळ किंवा दाराच्या मागे वगैरे ठिकाणी छान अक्षरांत लिहून काढा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seema nitin write article about reading tips

Tags
टॉपिकस
Topic Tags: