तुम्ही बोलायला लागलात,तर ऐकणाऱ्यांचा उत्साह कमी होतो असं तुम्हाला वाटतं का?

सीमा नितीन 
Friday, 11 December 2020

तुमचा आवाज तुम्ही बदलू शकत नाही. ती दैवदत्त देणगी असते. प्रत्येकीला काही उत्तम गळा दिलेला नसतो. मात्र, तुम्ही तुमच्या आवाजाची पातळी, टोन, स्पष्टता यांच्यावर नक्की काम करू शकता.

आपलं बोलणं सगळ्यांनी ऐकावं, असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं; पण अनेकदा तुमच्या बोलण्याकडं लोक लक्ष देत नाहीत, तुम्ही बोलायला लागलात, तर ऐकणाऱ्यांचा उत्साह कमी होतो असं तुम्हाला वाटतं का? तर मग मैत्रिणींनो, तुम्ही त्यासाठी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तुमचा आवाज तुम्ही बदलू शकत नाही. ती दैवदत्त देणगी असते. प्रत्येकीला काही उत्तम गळा दिलेला नसतो. मात्र, तुम्ही तुमच्या आवाजाची पातळी, टोन, स्पष्टता यांच्यावर नक्की काम करू शकता. अनेक मैत्रिणींना खूप हळू बोलायची सवय असते. ती लेव्हल किंचित वाढवता येते का ते बघा. त्यासाठी मोबाईलवर नेहमीच्या आवाजात एखादी कविता रेकॉर्ड करायची आणि नंतर किंचित मोठ्या आवाजात रेकॉर्ड करायची, असं करून बघा. म्हणजे समजा कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता असेल, तर ती नेहमीच्या आवाजात रेकॉर्ड करा. त्यानंतर ती थोड्या मोठ्या आवाजात रेकॉर्ड करा. दोन्हींची तुलना करा आणि आवाजाची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करा. ही सवय तुम्हाला अनेक गोष्टींसाठी उपयोगी पडेल. काहींना उलट सवय असते. खूप किंचाळत बोलणं ऐकणाऱ्याला त्रासदायक वाटतं. त्यामुळं त्यावरही काम करा. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आवाजाचा पिच किंवा पट्टी ही गोष्ट अतिशय महत्त्वाची. खूप वरच्या पट्टीत किंवा खूप खालच्या पट्टीत बोलणं असेल, तर ऐकणारा दुर्लक्ष करण्याची शक्यता असते. विशेषतः खूप वरच्या पट्टीत बोलण्याची सवय असेल, तर ऐकण्याच्या कानांना खूप त्रास होतो. त्यामुळं आवाजाची पट्टी नक्की तपासून बघा आणि तिच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. बोलताना काही आवाज करायची काहींना सवय असते. तेही टाळण्याचा प्रयत्न करा. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याचा विचार करा 
- तुमचं बोलणं खूप हळू आवाजात नको आणि खूप मोठ्याही आवाजात नको. आपल्या आवाजाचं स्वतःच विश्लेषण करा आणि त्याची पातळी योग्य राखण्याचा प्रयत्न करा. 
- बोलताना काही विचित्र आवाज करणं, ओठांचे, जिभेचे अयोग्य वापर करणं टाळा. 
- खूप वरच्या स्वरात बोलणं समोरच्याला त्रासदायक ठरतं. त्यामुळे ती 
- ळ, श, र ही किंवा काही अक्षरं अनेकदा पुरेशी उच्चारली जात नाहीत. त्यासाठी जिभेला, ओठांना योग्य वळण लावलं पाहिजे. आरशासमोर बोलून पाहणं ही गोष्ट खूप उपयुक्त ठरते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पालकांसाठी श्रवणमंत्र 
- मुलांना अनेकदा खूप वेगात बोलण्याची सवय असते. ती गती योग्य राखण्यासाठी त्यांना सांगत राहा. मात्र, हे सांगणं ओरडून किंवा सगळ्यांदेखत नको. ते अतिशय खुबीनं, मुलांना अपमान वाटणार नाही अशा पद्धतीनं सांगा. चुकीच्या पद्धतीनं सांगितलं, तर मुलांचा बोलण्याचा आत्मविश्वास कमी होण्याची भीती असते. 
- बोलताना शर्टच्या बटणांशी, ओढणीशी खेळणं अशा सवयी मुलांना असतील, तर त्या गोड बोलून कमी करायचा प्रयत्न करा. 
- शाळेत सांगितलं असो किंवा नसो- मुलांना कविता, गाणी, पाढे यांचं मोठ्या आवाजात उच्चारण करण्याची सवय लावा. अनेक गोष्टी पाठ करून घ्या. यातून आवाजाचा पोत सुधारण्यास मदत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seema nitin write article about speech

Tags
टॉपिकस
Topic Tags: