Video : थॉट ऑफ द वीक : माझ्या भावनिक गरजा

सुप्रिया पुजारी, लाइफ कोच
Saturday, 29 February 2020

आपल्याकडे हवे असलेले सर्व काही असूनही समाधान नाही. एकच प्रश्न त्याला त्रास देत होता, ‘सर्वकाही असूनही मी आनंदी का नाही?’

एक माणूस होता, जो आपल्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा भागविण्यासाठी खूप प्रयत्न करीत होता. त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यावर त्याने उत्तम कपडे, उत्तम मोटार अशा गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक परिश्रम घेतले व त्या पूर्ण केल्याही! कालांतराने त्याला जाणवले, आपल्याकडे हवे असलेले सर्व काही असूनही समाधान नाही. एकच प्रश्न त्याला त्रास देत होता, ‘सर्वकाही असूनही मी आनंदी का नाही?’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मानवी उत्क्रांतीपासूनच आपण सर्व मूलभूत आणि लक्झरी गरजा पूर्ण करण्याबाबत बोलत आहोत, परंतु या सर्व बाह्य गरजा आहेत. भावनिक गरजांचे काय? आपल्याला बाह्य गरजा माहीत आहेत, पण अंतर्गत असलेल्यांचे काय? त्याला आपण ‘ब्लाइंड स्पॉट’ असे म्हणू शकतो. आपल्याला कळत नसले, तरीही या भावनिक गरजा नेहमीच आपल्यावर प्रभाव पाडत असतात. या गरजा केवळ आपल्या भावनांवरच नव्हे, तर आपल्या कृती आणि प्रतिक्रियांवरदेखील प्रभाव पाडतात. आपल्या भावनिक गरजा जाणून घेणे हा स्वत:ला शोधण्याचा एक उत्तम मार्ग आहे. 

एक मुलगी काही मित्र मैत्रिणींसोबत कपडे खरेदी करण्यासाठी बाहेर गेली. ती मॉलमध्ये गेली आणि तिने एक पूर्ण दिवस घालवला. दिवसअखेरीस तिने आवश्यक नसलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक ऊर्जा, पैसा आणि वेळ खर्च केला. ती घरी आली तेव्हा तिला समजले की, तिची खरेदी पूर्णपणे व्यर्थ आहे. अशाच छोट्या छोट्या उदाहरणांमध्ये आपण आपल्या गरजा लक्षात घेत नसल्यास आपले जीवन, वेळ आणि ऊर्जा किती वाया जाते, हे आपण पाहू शकतो. हे केवळ आपल्यावरच नव्हे, तर आपल्या सभोवतालच्या लोकांवरदेखील परिणाम करते. आपण आपल्या भावनिक गरजांबद्दल स्पष्ट नसतो, तेव्हा आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही.

भावनिक गरजा शोधण्याचे फायदे
आपण स्वतःबद्दल अधिक जागरूक राहतो. आपल्याला नक्की कोणती भावनिक गरज आहे, हे उमजते व त्यानुसार आपले वर्तन, निर्णय अवलंबून राहतात.
आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या गोष्टींसाठी ऊर्जा वाचते व आपण अशा गोष्टींवर ऊर्जा वाया घालवणे थांबवतो, ज्या आपल्या भावनिक गरज पूर्ण करीत नाहीत.
आपण आपले ट्रिगर, भूतकाळातील अप्रिय आठवणींमध्ये अडकून न राहता समस्यांवर तोडगा काढण्याची वृत्ती आपल्यात प्रवेश करते व ती आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून भविष्याची वाटचाल स्वतंत्ररीत्या विचार करण्याची ऊर्जा देते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supriya pujari article My emotional needs