माय फॅशन : ‘नवीन ट्रेंड्सची माहिती घेत राहा’

फॅशन करताना तुम्ही कुठल्या लूकमध्ये छान दिसता, तुमचं सौंदर्य कुठल्या प्रकारामध्ये जास्त खुलून येते, हे महत्त्वाचं आहे.
Suvarna Kale
Suvarna KaleSakal
Summary

फॅशन करताना तुम्ही कुठल्या लूकमध्ये छान दिसता, तुमचं सौंदर्य कुठल्या प्रकारामध्ये जास्त खुलून येते, हे महत्त्वाचं आहे.

फॅशन करताना तुम्ही कुठल्या लूकमध्ये छान दिसता, तुमचं सौंदर्य कुठल्या प्रकारामध्ये जास्त खुलून येते, हे महत्त्वाचं आहे. मग, ती सहावारी साडी आहे, की शॉर्ट्‌स आहे, की वेगळी फॅशन आहे, या गोष्टींचा बारकाईने विचार करायला हवा. हल्ली खूप प्रकारच्या साड्या आल्या आहेत. त्यामुळे तरुण मुलींनाही त्या सहज नेसता येतात. निऱ्या घालण्याची गरज नसते. कारण, या साड्या आधीपासूनच स्टिच केलेल्या, डिझायनर असतात. स्कर्टसारखी परिधान करून फक्त पदर घ्यायचा असतो. फक्त त्या निऱ्या हाय हिल्समध्ये अडकून न पडण्याची काळजी घ्यावी लागते. त्या साडीला अनुसरून ॲक्सेसरीज, हलकासा मेकअप आणि सँडल घालावेत.

आपण कोणत्या कार्यक्रमाला चाललो आहोत, त्याप्रमाणे आपण आपली वेशभूषा व मेकअप असावावा. दिवसा एखादा पार्टीला जात असाल, तर चमकीचे, ग्लिटरचे कपडे टाळावेत. ते रात्री छान दिसतात. आपल्याला साजेसे असतील असे रंग प्रत्येकाला माहीत असतात. त्या त्या कार्यक्रमानुसार रंगांची निवड करावी. फॅशनच्या बाबतीत अपडेट राहावे. दर तीन ते सहा महिन्यांत फॅशन बदलत राहते. कधीकधी फंकी लूक आणि भडक रंगांची फॅशन येते, तर कधीकधी साधेसुधेपणाची फॅशन येते. यामध्ये जे ट्रेंडमध्ये असते, त्याचा अवलंब करावा.

मला सगळ्याच प्रकारचे ड्रेस आवडतात. सहावारी साध्या साडीपासून ते महाराष्ट्रीयन काष्ट्यापासून शॉर्ट्‌स ते क्रॉपटॉपपर्यत सर्व कॉस्चुम आवडतात. मला एका साच्यात किंवा एका विशिष्ट लूकमध्ये राहायला नाही आवडत. मी सतत वेगळी दिसायला हवी, असे मला वाटते. वेगवेगळ्या लूकमध्ये मला स्वतःला बघायला आवडते. सगळेच प्रकार मी छानपैकी कॅरी करते. चित्रपटात काम करताना किंवा स्टेजवर नृत्य करताना माझी ही हौस पूर्ण होते. कलाकारांनी प्रत्येक भूमिकेनुसार आपला कपड्यांचा प्रकार ठेवावा. त्यावरूनच तुमचे पात्र फुलत असते.

तुम्हाला फॅशनेबल राहायचे असेल, तर तुम्ही फिट असणे खूप गरजेचे आहे. तुमचे व्यक्तिमत्त्व, देहबोली, कपडे कसे कॅरी करता या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही फिट असाल, तर तुम्हाला प्रत्येक प्रकार शोभून दिसेल. ‘ऑल्वेज स्टाईल मे रहनेका,’ हा माझा फॅशन फंडा आहे.

मला प्रियांका चोप्रा आणि हृतिक रोशन यांच्यापासून नेहमीच प्रेरणा मिळते. ते प्रत्येक वेळी वेगवेगळ्या लूकमध्ये राहतात. हे दोघेही माझे फॅशन आयकॉन आहेत.

फॅशन टिप्स

  • स्वतःला अपडेट ठेवा. फॅशन ट्रेंड्सची माहिती घेत राहा. आपण घातलेल्या कपड्यांना साजेशी पादत्राणे, अॅक्सेसरीज यांचा वापर करा.

  • कोणत्याही प्रकारचे कपडे घातलेत, तरी त्यात कम्फर्टेबल असले पाहिजे हे महत्त्वाचे.

  • दुसऱ्याचे कपडे पाहण्यापेक्षा स्वतःच्या कपड्यांकडे जास्त लक्ष देऊन छान पद्धतीने तो दिवस जगून घ्यावा.

  • सतत वेगवेगळे लूक्स ट्राय करावेत. एकाच साच्यात राहू नये. प्रत्येक मुलीने प्रत्येक लूकमध्ये स्वतःला पाहावे, असे मला वाटते.

  • स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या प्रेमात राहा आणि आरशात पाहून स्माईल देत म्हणा, ‘येस, आय एम लुकिंग गुड.’

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com