esakal | किचन + : व्हेजिटेबल वॉशिंग बाऊल
sakal

बोलून बातमी शोधा

Vegetable-Washing-Bowl

भाज्या व विशेषतः पालेभाज्या धुताना, भातासाठी तांदूळ धुताना आपण मोठ्या भांड्याचा वापर करतो. मात्र, हे पदार्थ सिंकमध्ये धुताना पाण्याबरोबर भाजीची पाने, तांदूळ किंवा दाळ, पास्ता आदी वाहून जाते. केवळ हाताने पाणी गाळून घेण्यात मोठी कसरत करावी लागते आणि घाईच्या वेळी ही काम आणखी कठीण होऊन बसते.

किचन + : व्हेजिटेबल वॉशिंग बाऊल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भाज्या व विशेषतः पालेभाज्या धुताना, भातासाठी तांदूळ धुताना आपण मोठ्या भांड्याचा वापर करतो. मात्र, हे पदार्थ सिंकमध्ये धुताना पाण्याबरोबर भाजीची पाने, तांदूळ किंवा दाळ, पास्ता आदी वाहून जाते. केवळ हाताने पाणी गाळून घेण्यात मोठी कसरत करावी लागते आणि घाईच्या वेळी ही काम आणखी कठीण होऊन बसते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हे पदार्थ धुताना चाळणीचा वापर केला, तरी त्यातून पाणी चटकन वाहून जात असल्याने पदार्थ चोळून धुणे कठीण जाते. या समस्येवर उपाय असलेले व्हेजिटबल वॉशिंग बाऊल बाजारात व ऑनलाइन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

1) हे बाऊल दोन ते तीन आकारांमध्ये उपलब्ध. या अंडाकृती बाऊलच्या समोरील बाजूला वरच्या भागात जाळी बसवलेली असते. 
2) त्यामध्ये धुण्यासाठीचा पदार्थ त्यामध्ये टाकून पाण्याने स्वच्छ धुता येतो व नंतर जाळीतून पाणी बाहेर काढता येते. 
3) यामध्ये तांदुळाचे दाणे किंवा भाजीची पाने सिंकमध्ये पडण्याची शक्यता नाही.  त्यामुळे घाईच्या वेळी वेगाने काम करण्यासाठी या बाऊलचा उपयोग होतो.

loading image
go to top