esakal | महिला पायात जोडवी का घालतात, त्याची ‘ही’ कारणे माहिती आहेत का?
sakal

बोलून बातमी शोधा

toe rings

लग्न झाले की स्त्रीच्या शृंगारात भर पडते ती सौभाग्य अलंकारांची... मंगळसूत्र, हिरवा चुडा, कपाळावर टिकली, पायात पैंजण, आणि जोडवी. आजकाल मंगळसूत्र गळ्यात घातलं, टिकली लावली, बांगड्या घातल्या म्हणजेच स्त्रीया सौभाग्यवती आहेत हे सिद्ध होते.

महिला पायात जोडवी का घालतात, त्याची ‘ही’ कारणे माहिती आहेत का?

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

सोलापूर : लग्न झाले की स्त्रीच्या शृंगारात भर पडते ती सौभाग्य अलंकारांची... मंगळसूत्र, हिरवा चुडा, कपाळावर टिकली, पायात पैंजण, आणि जोडवी. आजकाल मंगळसूत्र गळ्यात घातलं, टिकली लावली, बांगड्या घातल्या म्हणजेच स्त्रीया सौभाग्यवती आहेत हे सिद्ध होते.
कोणत्याही प्रौढ पुरुषाकडे पाहिले की तो विवाहित असेल किंवा नाही हे खात्रीपूर्वक सांगता येणे, तसे कठीण असते. पण गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पायाच्या बोटामध्ये जोडवी पाहिले की ते धारण करणारी महिला विवाहित असते हेच सर्वांना कळून येते. त्यामुळे जोडवी घालणे ही लग्न झाल्याची निशाणी मानली जाते. एक लग्न झालेली स्त्री गळ्यात मंगळसूत्र, केसांच्या भांगेत शेंदूर, हातात बांगड्या हे सर्व घालतेच. आपण लहानपणापासून आपल्या आईला व आजूबाजूच्या काकूंना हे सर्व अलंकार घालताना पाहिले आहे. या सर्व सुवासिनींच्या निशाणी मानल्या जातात. 

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नववधूच्या अंगावर मंगळसूत्र नंतर पहिला दागिना चढतो तो पायातील जोडवे. पायातील जोडवी हा सौभाग्यालंकार असला तरी आजची फॅशनही तितकीच लोकप्रिय आहे. स्त्रियांप्रमाणेच आधुनिक युगातील मुलींनाही जोडवी घालायला आवडते. आज अनेक जणी फॅशन म्हणून सौभाग्यालंकार नाजूक का होईना आवर्जून वापरतात. लग्नावेळी स्त्रियांच्या पायाच्या बोटावर पहिला अलंकार चढते ते जोडवी. यावेळी या विषयावर बोलताना डॉ. स्नेहा गायकवाड म्हणाले की, स्त्रिया लग्नानंतर पायांच्या बोटात जोडवी घालतात. कारण पायांच्या अंगठ्याशेजारील बोटांमध्ये जी नस असते, तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाला नियंत्रित करते, आणि रक्तदाबही संतुलित ठेवते. त्याचबरोबर जोडवी घातल्याने महिलांना अनेक फायदे होतात.  यावेळी स्वाती जाधव असे म्हणाले की, स्त्रीच्या शृंगारातील महत्त्वाचे भाग म्हणजे जोडवी. चांदी हा धातू ऊर्जा वाहक आहे. त्यामुळे पाय जमिनीला टेकलेले असल्यामुळे जमिनीची ऊर्जा शरीरात प्रवेश करते. त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी या शरीरातील ऊर्जा समतोल राखण्यास मदत करतात. तसेच यावेळी सोनाली दिंडे म्हणाले की, लग्नावेळी स्त्रियांच्या पायाच्या बोटावर पहिला अलंकार चढते ते जोडवी. पायात जोडवी घातल्यावर स्त्रियांना अनेक फायदे होतात. सध्या फॅशनच्या युगात ही पूर्वीसारखे मोठे जोडवी वापरत नसले तरी सध्या नाजुक नक्षीकाम केलेली जोडवी वापरण्याकडे स्त्रिया जास्त प्राधान्य देत आहेत.

सौभाग्य अलंकारांतील नवे बदल
पूर्वी आवर्जून चांदीची जोडवी पायात घातली जात असत, त्यावेळी पायातील बोटात दोन, पाच, सात वेढ्यांची जोडवी पाहायला मिळायची. मात्र आता यात स्टील, मेटलची जोडवी ही बाजारात अगदी ट्रेंडमधील फेरीवाल्यांकडून सहज मिळत आहे. काही नोकरदार महिलांनी तर गुजराती महिलांच्या नक्षीकाम जोडवींना पसंती देत असलेले चित्र पहावयास मिळत आहे. आता कमी वजनाची नाजूक जोडवी विविध आकाराची मणी, घुंगरू, नक्षीकाम अशा अनेक आकारातील वजनात जोडवी बाजारात उपलब्ध आहेत. वीस रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत या जोडव्यांची किंमती असून सर्वसामान्यांना ती परवडण्यासारखी आहे. नववधू पासून ते वृद्ध महिलांपर्यंत सर्वजण जोडवी आवर्जून वापरतात.

पायात जोडवी घालण्याचे फायदे

  1. - शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते.
  2. - हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त.
  3. - जोडवी घातल्याने थायरॉइडचा धोका कमी असतो.
  4. - जोडवी घातल्याने मासिक पाळी मध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात व मासिक पाळी नियमित होते.
  5. - जोडवीमुळे एक विशिष्ट रक्तवाहिनी व दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो.
  6. - गर्भाची संवेदनशीलता वाढते.
  7. - जोडवी घातल्याने शरीरातील सर्व नस आणि मांस पेशी व्यवस्थित काम करतात.
  8. - दोन्ही पायात जोडवे घातल्याने ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते.