गरोदरपणात जाणवणारा अशक्तपणा 

डॉ. आशा गावडे, स्त्रीरोगतज्ज्ञ 
Saturday, 19 December 2020

गरोदरपणात सामान्यपणे स्त्रीला थकवा, झोपाळूपणा, अशक्तपणा आणि कोणतेही काम करण्यास निरुत्साह जाणवू शकतो. गरोदरपणातील हा थकवा कसा टाळावा, यावरील उपाय काय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 

गरोदरपणादरम्यान प्रोजेस्टेरॉन या हार्मोनची शरीरात निर्मिती होते, ज्यामुळे प्रसूतीही सुरळीत होण्यास व बाळाच्या वाढीसाठी मदत होते. हे हार्मोन शरीराला आराम देणारे असल्यामुळे स्त्रीला आळस वाटणे, झोप पूर्ण होऊनही सतत झोप येणे, हालचाली मंद होणे असे परिणाम जाणवतात. प्रोजेस्टेरॉन हार्मोनमुळे गरोदरपणात जाणवणारे हे सामान्य शारीरिक बदल असून हे तात्पुरते बदल आहेत, जे प्रसूतीनंतर कमी होतात. 

आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा

लघवीला अनेकदा जावे लागणे : गरोदरपणाच्या पहिल्या तीन-चार महिन्यांत हार्मोनची पातळी उच्च असते आणि गरोदरपणाच्या अखेरच्या टप्प्यात बाळाच्या डोक्यामुळे मूत्राशयावर दाब निर्माण होतो. त्यामुळे स्त्रीला नेहमीपेक्षा अधिकवेळा लघवीला जावे लागते. रात्रीच्या वेळा असे घडल्यास विश्रांती पुरेशी न झाल्याने दुसर्‍या दिवशी थकल्यासारखे वाटते. प्रसूतीनंतर ही समस्याही दूर होऊ शकते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मळमळणे व उलट्या : गरोदरपणाच्या पहिल्या ३/४ महिन्यांत स्त्रीला मळमळणे व वारंवार उलट्यांचा त्रास होतो. त्यामुळे भूक कमी लागल्याने पौष्टिक द्रव्ये शरीरात जात नाहीत. तसेच, शरीरातील पाणी कमी होते. परिणामी स्त्रीचा रक्तदाब कमी होऊन अशक्तपणा वाढतो. पहिल्या तीन-चार महिन्यांत ही समस्या सामान्य आहे, असेच वाटते. मात्र, हे टाळण्यासाठी गरोदर स्त्रीने जे आवडेल ते खाल्ले पाहिजे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार घेतलाच पाहिजे, तसेच थोड्या प्रमाणात दर दोन-तीन तासांनी काही खाणे आवश्यक आहे. शिवाय पाणी किंवा द्रव पदार्थ सातत्याने घेतले पाहिजेत. गरोदर स्त्रीने रोज १२ ते १५ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. नुसते पाणी प्यावे वाटत नसेल आणि अशक्तपणा कमी होण्यासाठी नारळाचे पाणी पिणे लाभदायक ठरते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रक्तशर्करेची बदलती पातळी : गरोदरपणात सतत बदलणार्‍या हार्मोनमुळे रक्तातील साखरेची पातळी ही थोड्याफार प्रमाणात बदलते. साखर कमी झाल्यास हायपोग्लायसेमिया या समस्येला तोंड दयावे लागते. अशक्तपणा कमी होण्यासाठी पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. 

गरोदरपणातील थकव्याची आणखी कारणे आणि त्यावरील उपाय यांची माहिती आपण घेऊ पुढच्या भागात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women healht article about Weakness during pregnancy

Tags
टॉपिकस
Topic Tags: