वुमन हेल्थ : गरोदरपणाच्या काळातील ब्युटी टिप्स

Pregnent Women
Pregnent Women

गरोदरपणाच्या काळात बऱ्याच महिला आपल्या नेहमीच्या दिनक्रमात मेकअप करावा का, आपल्या सौंदर्याची निगा राखणे कितपत योग्य आहे, असे प्रश्न विचारत असतात. बहुतांश वेळा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ‘व्हॅक्स, फेशिअल, ब्लीच, हेअर कलर करणे योग्य आहे का?’ यासाठी काही कानमंत्र आपण बघूया.

फेशिअल, व्हॅक्सिंग आणि ब्लीच 
फेशिअल आणि ब्लीचिंग करताना अमोनियाचा वापर शक्यतो टाळावा. कारण, अमोनिया त्वचा शोषून घेते. त्यामुळे कोणतेही क्रीम वापरताना रसायनांच्या बाबतीत जागरूक राहावे. कारण, रसायनांचा परिणाम बाळावर होऊ शकतो. तसेच, गरोदरपणाच्या काळात हात आणि पायाला व्हॅक्सिंग करू शकता. पण, पोटाजवळ व्हॅक्सिंग करणे टाळणे आवश्यक आहे. कारण, व्हॅक्सिंगमुळे वेदना होऊ शकतात व वेदनांची जोखीम बळावू शकते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हेअर कलर 
वाढते वय, तिशीनंतर होणारी गर्भधारणा, कामाचा ताण आणि खाण्या-पिण्याच्या बदललेल्या सवयीमुळे केस पांढरे होणे ही आता सामान्य गोष्ट होत चालली आहे. त्यामुळेच गर्भवती महिला ‘विविध कार्यक्रमांकरिता हेअर कलर करणे योग्य आहे का?’ असा प्रश्‍न विचारतात. गरोदरपणाच्या पहिल्या तीन-चार महिन्यांमध्ये ऑर्गनोजेनेसिस म्हणजेच बाळाच्या अवयववाढीला सुरुवात होत असते. या काळात मातेच्या शरीराचा रसायनांशी संपर्क झाल्यास त्याचा परिणाम बाळाच्या अवयववाढीवर होऊ शकतो. त्यामुळे पहिल्या तीन महिन्यांच्या कालावधीत फेशिअल, व्हॅक्स, ब्लीच आणि हेअर कलर, हेअर डाय यांसारख्या सौंदर्य प्रक्रिया करण्याचे शक्यतो टाळावे. उच्चपातळीची रसायने असलेले हेअर कलर वारंवार करू नयेतकिंबहुना पहिल्या तीन महिन्यांत हे टाळावे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गरोदरपणाच्या चौथ्या महिन्यापासून हेअर कलर करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
 हेअर कलर करण्यासाठी वापरण्यात येणारे कलर आणि उत्पादनाची गुणवत्ता चांगली असावी तसेच ते उत्पादन रसायनमुक्त आणि अमोनिया फ्री असावे व त्या उत्पादनाची एक्सपायरी डेट चेक करावी.
 केसांना कलर करायचे झाल्यास हे शक्यतो महिन्यातून एकदाच करावे.
 गरोदर महिलांनी हेअर कलर करताना ग्लोव्हज् आणि मास्कचा वापर अनिवार्यपणे केला पाहिजे.
 त्वचेद्वारे रसायनांचे शोषण कमी होण्यासाठी, केस रंगवताना हेअर कलर ठेवण्याचा कालावधी कमीत कमी असला पाहिजे. तो १५-२० मिनिटांपेक्षा जास्त नसावा.

गर्भवती महिला हेअर सलूनमध्ये काम करत असतील आणि अशा सौंदर्यप्रसाधनांचा वापर करत असतील तर त्यासाठीच्या काही सूचना...
 केसांना रंग देताना आणि डाय करताना वापरण्यात येणाऱ्या अमोनियामुळे शक्यतो सलूनच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात; जेणेकरून वातावरण हवेशीर राहील. हा गॅस त्या आवारात पदार्थांचे सेवन करताना पोटात गेला, तर बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 हानिकारक रसायने श्वसनाद्वारे श्वासोच्छ्‌वासात न जाण्यासाठी आणि त्याचे शोषण टाळण्यासाठी ग्लोव्हज् आणि मास्क वापरणे आवश्यक आहे.
 सलूनमध्ये काम करणाऱ्या गर्भवती महिलांनी हेअर कलरचे काम शक्यतो आपल्या सहयोगींकडे सोपवावे.
   त्यामुळे विविध कार्यक्रमांसाठी सौंदर्यप्रक्रिया करावीशी वाटणे, हे साहजिक असले, तरी योग्य ती काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com