Women`s Day:महिलांनो पैसे साठवायला नाही, गुंतवायला शिका!

womens day special feature investment tips for women
womens day special feature investment tips for women

पुरुषांपेक्षा महिला अधिक प्रमाणात पैशाची उधळपट्टी करतात ही समजूत पुर्णतः चुकीची आहे. महिला या कमी रकमेची खरेदी करतात तर पुरुष मात्र सर्रास अव्वाच्या सव्वा खरेदी करतात. पुरुष जरी महिलांच्या तुलनेत कमी वेळा पैसा खर्च करत असले तरी त्यांच्या खरेदीने दीर्घ कालावधीसाठी डोक्यावर कर्जाचा बोजा उभा राहतो. घरखरेदी, वाहन अथवा महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे मासिक हप्त्यांचा बोजा डोक्यावर चढतो.

जागतिक पातळीवर करण्यात आलेल्या विविध संशोधनात पुरुषांपेक्षा महिला या बचतीत आघाडीवर असल्याचे सिध्द झाले आहे. भारतीय परिस्थितीत तर ही बाब तंतोतंत खरी ठरलेली आहे. भारतीय माता आणि आजी त्यांना मिळालेल्या पैशातील काही भाग हा आप्तकालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी नेहमी आपल्या बटव्यात साठवत आलेल्या आहेत. घरगुती बचत ही कुटूंब त्याचबरोबर देशाच्या प्रगतीसाठी अतिशय महत्वपुर्ण घटक आहे. परंतु कुटूबांची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी केवळ पैसे साठविणेच पुरेसे नाही तर ते तुम्ही गुंतविले पाहिजे.

महिलांविषयीचे आणखी विषय वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

  • केवळ बचत का पुरेशी नाही ?
  • महागाई नेहमी पैशाचे खरेदी मुल्य दीर्घ कालावधीत घटवत असते. आज साठविलेल्या एक लाख रुपयांचे खरेदी मुल्य हे येत्या तीन वर्षात कमी झालेले असेल आणि नंतर ते सातत्याने घटत जाणार आहे. एक लाख रुपयाचे खरेदी मुल्य पाच वर्षांनंतर हे 78 हजार रुपये, दहा वर्षांनंतर 61 हजार तर 20 वर्षांनंतर अवघे 38 हजार रुपये राहणार आहे.
  • चलनवाढ दरापेक्षा तुमचे पैसे जोपर्यंत अधिक दराने वाढत नाही तोपर्यंत तुमच्या पैशाचे नक्त मुल्य हे सतत घटत जाते आणि त्यामुळे तुमच्या दीर्घकालीन वित्तीय व्यवस्थापन आणि उद्दीष्टांना तडा जातो. उदाहरणादाखल बोलायचे झाल्यास मुलांच्या उच्च शिक्षणासाठी बचतीचे उद्दीष्ट अपुरे राहू शकते.
  • जर तुम्ही तुमचे पैसे हे बचत खात्यात अथवा बँकेच्या मुदत ठेवीत अडकविले तरी कर वजावटीनंतर तुमची गुंतवणूक ही महागाईला तोंड देऊ शकणार नाही. उदाहरणार्थ, जर तुम्हाला बँकेच्या मुदत ठेवीवर 6.5 ते 7 टक्के व्याज मिळत असले तरी करआकारणीनंतर व्याजदर प्रतिवर्षी 4.2 ते 4.5 टक्के एवढाच ठरतो. ( तुम्ही कराच्या सर्वोच्च पातळीत येतात, असे येथे गृहित धरलेले आहे.) हा व्याजदर हा तुमच्या वित्तीय उद्दीष्टांच्या चलनवाढ दराच्या तुलनेत कितीतरी कमी ठरतो. त्यामुळेच केवळ बचत करणे हे पुरेसे नाही.
  • महिलांचे आयुष्यमान हे पुरुषांपेक्षा अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, महिलांचे आयुष्यमान हे 70.3 वर्ष तर पुरषांचे आयुष्यमान हे 67.4 वर्ष एवढे आहे. त्यामुळे आपल्या दीर्घ जीवनासाठी पुरेसा निधी जवळ राहण्यासाठी महिलांनी नियमित गुंतवणूक करणे अतिशय गरजेचे आहे.

महिलांविषयीचे आणखी विषय वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वित्तीय उद्दीष्ट साध्य करण्यासाठी गुंतवणुकीची गरज

  • गुंतविलेल्या रकमेवर अधिक परतावा मिळविण्यासाठी विशिष्ट कालावधीसाठी अडकविलेला पैसा म्हणजेच गुंतवणूक होय. परतावा आणि जोखीम हे एकमेकांशी संबंधित आहेत. अधिक परतावा मिळविण्यासाठी तुम्हाला अधिक जोखीम उचलावी लागते. जोखीमेचे प्रमाण हे तुमची जोखीम स्वीकारण्याची क्षमता आणि गुंतवणुकीची गरज यावर ठरते. अल्प मुदतीतील उद्दीष्टांसाठी तुम्ही एकदम मोठी जोखीम घेऊ शकत नाही, परंतु मध्यम ते दीर्घ कालावधीतील उद्दीष्टांसाठी तुमची जोखीम क्षमता ही अधिक पाहिजे. कारण दीर्घ मुदतीतील उद्दीष्टांच्या कालावधीत तुमच्या गुंतवणुकीला अल्प कालावधीतील शेअरबाजारातील अस्थिरतेतुन बाहेर पडण्यास पुरेसा वेळ आणि संधी मिळते.
  • समजा, एक लाख रुपयांच्या बचतीवर सहा टक्के व्याजदराने तुम्हाला वीस वर्षांनंतर तीन लाख 27 हजार रुपये मिळतात. परंतु तेच एक लाख रुपये गुंतविल्यास दहा टक्के परताव्याच्या दराने इतक्याच कालावधीत सहा लाख 79 हजार रुपये मिळतात. जर परताव्याचा दर 15 टक्के धरला तर वीस वर्षांत 16 लाख 37 हजार रुपये उत्पन्न मिळते. जितक्या लवकर तुम्ही निधी गुंतवाल, तितकी अधिक तुमची संपत्ती वृध्दींगत होण्याची क्षमताही वाढते.
  • विविध प्रकारच्या गुंतवणुकीशी संबंधित जोखीमही विविध प्रकारची असते. त्यामुळे गुंतवणुकीची गरज, गुंतवणुकीचा एकुण कालावधी, तुमची उद्दीष्टे आणि जोखीम स्वीकारण्याची क्षमता यांचा विचार करुन तुम्ही नेहमी गुंतवणुकीबाबत पाऊल उचलले पाहिजे.

महिलांविषयीचे आणखी विषय वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वित्तीय सल्लागाराची मदत घ्या
संपूर्ण लेखाचा सार काढल्यास महिला या पुरुषांपेक्षा चांगल्या बचत करणाऱ्या असल्या तरी तुमची वैयक्तित आणि कुटूंबाची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी केवळ बचत पुरेशी नाही. महागाई आणि कर हे नियमित कालावधीत तुमच्या बचतीचा काही भाग गिळंकृत करु शकतात. त्यामुळे वित्तीय उद्दीष्ट तुमच्या ठरलेल्या कालावधीत पूर्ण करण्यासाठी जोखीम क्षमता आणि उद्दीष्टाचा एकूण कालावधी याचा विचार करत गुंतवणुक केली पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांबाबत साक्षर झाले पाहिजे. एवढेच नव्हे, त्याच्याशी संबंधित जोखीमही समजून घेतली पाहिजे. त्यासाठी महिलांनी वित्तीय सल्लागाराची मदत घेत संपत्ती निर्मितीच्या वाटेवर आपला प्रवास आत्ताच सुरू केला पाहिजे.

महिलांसाठीच्या विविध कोर्सेसची माहिती घेण्यासाठी येथे ► क्लिक करा

International Womens Day

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com