आयटीआय औंध पुणे मध्ये आयोजित रक्तदान शिबिरात १५० जणांचे रक्तदान

आयटीआय औंध पुणे मध्ये आयोजित रक्तदान शिबिरात १५० जणांचे रक्तदान
Updated on

छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,औंध पुणे येथे राष्ट्रीय सेवा योजना व रोटरी क्लब बाणेर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ससून रुग्णालय पुणे रक्तकेंद्रा करिता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले . उपसंचालक सचिन धुमाळ व रोटरी क्लबचे सीनियर सदस्य काबरा, अध्यक्ष अनिरुद्ध जोशी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देवून१५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच संस्थेतील निदेशक व इतर कर्मचाऱ्यांनीही रक्तदान केले. उपसंचालक धुमाळ यांनी प्रशिक्षणार्थ्यांना रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचे सांगून प्रशिक्षणार्थ्यांना रक्तदान करणे विषयी प्रोत्साहन दिले. अनिरुद्ध जोशी यांनी रक्तदाते हेच आजच्या रक्तदान शिबिराचे हिरो असल्याचे सांगितले. उपप्राचार्य अशोक साबळे यांनी स्वयं स्फूर्तीने व आनंदाने रक्तदान करण्याविषयी प्रशिक्षणार्थ्यांना आवाहन केले.

कार्यक्रम अधिकारी गटनिदेशिका प्रियंका वाघमारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून प्रशिक्षणार्थ्यांना रक्तदानाचे फायदे सांगितले. समाजसेवाअधीक्षक शरद देसले व त्यांचे ससून रुग्णालयाचे डॉक्टरांचे पथक तसेच एन एस एस.स.का. अधिकारी दिनेश गेंगजे व गणेश भुजबळ ,एन एस एस सदस्य रगतवान , ठाकरे , सौ कळमकर ,छत्रे , गायकवाड , गुरव ,जाधव , पिंगट, भिंताडे ,कासुळे या सर्वांनी एन एस एस स्वयंसेवकांच्या मदतीने अतिशय शिस्तबद्ध व उत्साह पूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन करून रक्तदान शिबिर पार पाडले. संस्थेतील गटनिदेशक ,निदेशक, कार्यालयीन कर्मचारी या सर्वांनी शिबिरास भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांना रक्तदानाकरिता प्रोत्साहन दिले. उपसंचालक धुमाळ, उपप्राचार्य साबळे,सर्व रोटरी क्लबचे सदस्य व ससून रुग्णालयाची टीम यांनी प्रशिक्षणार्थ्यांच्या चांगल्या प्रतिसादाबद्दल कौतुक व अभिनंदन व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com