Pune News: सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयात अलॅक्रिटीचा उत्साह शिगेला. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

All India Shree Shivaji Memorial Society'

Pune News: ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयात अलॅक्रिटीचा उत्साह शिगेला

Pune News: अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या कॉलेज फेस्टमध्ये अग्रगण्य नाव आहे ते इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या अलॅक्रिटीचे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व या बरोबर त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण,संघकार्य हे गुण वाढीस लागण्यासाठी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासा सोबतच सामाजिक भान जागृत करण्यासाठी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोरमेशन टेक्नॉलॉजीमहाविद्यालयात “अलॅक्रिटी” या राष्ट्रस्तरीय फेस्टचे २० ते २२ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

अलॅक्रिटीचे हे १४वे वर्ष असून यामध्ये कला ,क्रीडा,सांस्कृतिक,मनोरंजन व टेकनिकल हे सर्व मिळून ५० हून अधिक स्पर्धांचा समावेश आहे.

सांस्कृतिक विभागात व्हॉईस ऑफ पुणे,पुणेज गॉट टॅलेंट,सेटअप (नृत्य स्पर्धा), इन्स्ट्रुमेंट मॅनिया, बॉलीवूड क्विझ,अंताक्षरी, कला प्रदर्शन अश्या अनेक मनोरंजनात्मक स्पर्धा तर तांत्रिक विभागात शार्क टँक,अल्टीमेट कोडर, रेट बुल,रोबोट्रिक्स, रिफ', लाइन ट्रेसर, ड्रोन चॅलेंज, अंतरीक्ष क्लब क्विझ,पेपर प्रेझेंटेशन,पोस्टर प्रेझेंटेशन इ.समाविष्ट आहे.

क्रीडा स्पर्धांमध्ये 5-अ साइड फुटबॉल,बॅडमिंटन,बुद्धिबळ,व्हॉलीबॉल,कबड्डी,योगा,टेबलटेनिस इ.खेळ समाविष्ट आहेत.

अश्या ह्या बहुआयामी फेस्टमध्ये फूड-फेस्टिवल,फनफेयर,एग्झिबिश हे ही कॉलेजियन्सचे खास आकर्षण असणार आहे.या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थांनी सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.पी.बी .माने यांनी केले आहे.