'आजादी का अमृत महोत्सव'; पुण्यात ७८वा क्रांती दिन उत्साहात साजरा

'आजादी का अमृत महोत्सव'; पुण्यात ७८वा क्रांती दिन उत्साहात साजरा

भारतावर इंग्रजांनी दिडशे वर्षे राज्य केले. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी केलेली 'छोडो भारत'ची गर्जना पूर्ण भारतामध्ये पसरली होती. 'करेंगे या मरेंगे' या मंत्रामुळे क्रांतीची ज्योतच जणू पेटली. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले, त्या क्रांतिकारकांना आठवण्याचा दिवस म्हणजेच ९ ऑगस्ट, अर्थात क्रांती दिन !

आज क्रांती दिनाला ७८ वर्ष पूर्ण होत आहेत. दिनांक ९ ऑगस्ट या दिवशी पुण्यातील नौरोसजी वाडिया महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना तसेच विद्यार्थी विकास मंडळ आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्ताने 'आजादी का अमृत महोत्सव' हा क्रांती दिवस साजरा केला. या ठिकाणी प्राचार्य पि. के भदाणे, उप प्राचार्य मुंडे सर ,रजिस्ट्रार तागडे सर त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सोमनाथ वाघमारे, विद्यार्थी विकास मंडळाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विठ्ठल बोरकर, सांस्कृतिक मंडळाचे कार्यक्रम अधिकारी लोखंडे सर हे मान्यवर तसेच स्वयंसेवक आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

'आजादी का अमृत महोत्सव'; पुण्यात ७८वा क्रांती दिन उत्साहात साजरा
पुणे तिथे काय उणे! MIT च्या पोरांनी तयार केली ड्रायव्हरलेस कार

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर प्राचार्य पि. के. भदाणे सरांनी आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून कोरोनाच्या या महामारीमध्ये काळजी घेण्यासाठीचा सल्ला दिला. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी देशभक्तीपर गीत सादर करून कार्यक्रमांची शोभा वाढवली.

स्वयंसेविका सोनिका वाघमारे यांनी क्रांती दिनाचे महत्त्व समजावून सांगणारे भाषण केले. "क्रांतिवीरांनी जी आपली प्राणाची आहुती दिली ती आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि त्याचा आदर करून आपण या समाजाला काय देऊ शकतो आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण लोकांची कशी सेवा करू शकतो" असं म्हणत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सोमनाथ वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थी विकास मंडळाचे कार्यक्रम अधिकारी बोरकर सर यांनी "क्रांती" ही कविता सादर केली.

'आजादी का अमृत महोत्सव'; पुण्यात ७८वा क्रांती दिन उत्साहात साजरा
होर्डिंगमधून राजकीय ‘एन्ट्री’चे संकेत

स्वयंसेविका सुप्रिया बक्षी यांनी " ए मेरे वतन के लोगो" गीत सादर केले.या वेळी वेदिका इंचुरे यांनी सुत्रसंचालन केले. साक्षी शिंगटे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यश देवधर व मृणाल नाईक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पुण्यातील नौरोसजी वाडिया कॉले, राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्ताने ९ ऑगस्ट २०२१ रोजी 'स्वच्छ पंधरवडा' साजरा करण्यात आला. स्वयंसेवकांनी महाविद्यालयामध्ये स्वच्छता अभियान राबवले. त्याअंतर्गत त्यांनी प्लॅस्टिकचा कचरा गोळा करून आणि परिसर झाडून महाविद्यालयाचे आवार स्वच्छ केले. कार्यक्रमातून त्यांनी स्वच्छतेची गरज व महत्त्व सर्वांना पटवून दिले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.सोमनाथ वाघमारे आणि विद्यार्थी विकास मंडळचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विठ्ठल बोरकर यांनी त्याबद्दल योग्य मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com