esakal | अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च आणि अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांनी आयोजित केलेली विशेष श्रम संस्कार शिबीर.
sakal

बोलून बातमी शोधा

अनंतराव पवार कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रम संस्कार शिबीर आंबेड या गावी  संपन्न.

अनंतराव पवार कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रम संस्कार शिबीर आंबेड या गावी संपन्न.

sakal_logo
By
टीम YIN युवा

यावर्षी प्रथमच अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पुणे यांना महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना सुरू करण्याची संधी प्राप्त झाली. राष्ट्रीय सेवा योजनेचे भाग होणारे हे पहिलेच आर्किटेक्चरचे महाविद्यालय आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे पहिलेच वर्ष असुनही ५० स्वयंसेवकांनी उत्स्फुर्तपणे यामध्ये नावनोंदणी करुन वर्षभर राबविल्या गेलेल्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन यशस्वी केले. सुरूवातीला वृक्षारोपन, सावित्रीबाई फुले यांची जयंती असे उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवण्यात आले. यानंतर आम्हाला आंबेड येथे होणऱ्या शिबीराबद्दल माहिती देण्यात आली.

आंबेड या गावाबददल विद्यार्थ्यानी केलेली कल्पना ही खूप वेगळी होती. परंतु जेव्हा गावाला प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा तेथील दृश्ये आणि विद्यार्थ्यानी कल्पना यामध्ये खुप असं अतंर होत. गावाच्या लोकसंख्येमध्ये तरुण वर्गाचे प्रमाण खुपच कमी होते. सारक्षरतेचे प्रमाण सुदधा कमी होते. गावामध्ये सोईसुविधा खूप कमी प्रमाणात उपलब्ध होत्या. सर्व तरुणवर्ग कामाच्या निमीत्ताने शहराकडे गेल्यामुळे गावाचा जास्त विकास होऊ शकला नाही असे सर्वांना वाटत होते. गावाला पाणी टंचाई तसेच सांडपाण्याचे व्यवस्थापन अशा अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत होते. या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करून आमच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे व अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पुणे महाविदयालयाच्या राष्ट्रीय स्वंयसेवा योजनेच्या पदाधीकाऱ्यांनी विद्यापिठाच्या मान्यतेतून हे गाव राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरासाठी दत्तक घेतले.

या शिबीरामध्ये आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्याना भित्तीचित्रे काढण्याचे प्रमुख कार्य दिले गेले होते. विद्यार्थ्याना महाविद्यालयाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिबीरासाठी आवश्यक सामग्री व भित्तीचित्रांसाठी लागणाऱ्या रंगकामाच्या साहित्याची व्यवस्था केली. सर्व समस्यांना समोर ठेवून या शिबीराची रुपरेखा तयार केली गेली. स्वच्छता अभियान, लोकसाक्षरता, भित्तीचित्रे, मनोरंजनातून प्रबोधन अशा अनेक उपक्रमातून समाजसेवेचा एक छोटा प्रयत्न केला गेला. शिबीरस्थळी पोहोचल्यावर सर्व प्रथम राहण्याच्या जागा आणि आसपासचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यानंतर शिबीराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पुणे याचे प्राचार्य माननीय डॉ. राजेंद्र कोळी सर व अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे यांचे प्राचार्य माननीय डॉ. सुनिल ठाकरे सर तसेच कार्यक्रम अधिकारी वैभव घोडके सर, अनिल लोहार सर व गावातील मान्यवर लोकांच्या उपस्थीतीत पार पडला. रात्री सर्व स्वयंसेवकांचे गट करण्यात आले आणि सर्वांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी पहाटे योगाभ्यास व प्राणायामाचा माध्यमातून दिवसाची प्रसन्न सुरूवात करण्यात येत होती. आर्किटेक्चर कॉलेजचे आपटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व योगाभ्यास उत्तम रित्या करून घतला जायचा. त्यानंतर स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गावातील परीसर स्वच्छ केला गेला. गावाजवळील मंदिराचा परिसर स्वच्छ करण्याचे कार्य देण्यात आल होते. मंदिराच्या ‍आसपासच्या परिसरामध्ये खूप प्रमाणमध्ये पालापाचोळा व झाडेझुडपांमुळे खुप अडचण निर्माण झाली होती. परिसर स्वच्छ केल्यावर दुसऱ्या दिवशी त्यावरती मुरूम टाकण्याचे काम करण्यात आले व त्यानंतर सर्व स्वयंसेवकांसोबत गिरीयारोहण करण्यात आले.

त्यांनतर दुपारचे भोजन करून आर्किटेक्चर च्या मुलांनी भित्तीचित्रे काढण्याचे काम सुरू केले. साक्षरता, झाडे लावा-झाडे जगवा, नारी शक्ती, एक भारत-श्रेष्ठ भारत , स्वच्छ भारत अभियान अशा विषयांना अनुसरूण भित्तीचित्रांची सुरूवात केली. मुलांचे गट तयार करून गावातील दृष्टिक्षेपात येणाऱ्या घरांच्या भिंतींची निवड करण्यात आली. प्रत्येक गटाने भित्तीचित्रांचे विषय निवडून घेतले. गावामध्ये ग्रंथालय आहे परंतु त्याचा काहीच वापर होत नसल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. त्यामळे ग्रंथालयाच्या भिंतीवर वाचन प्रेरक भित्तीचित्र काढण्याचे ठरवले. तसेच शाळेकडे जाण्याऱ्या रस्त्याशेजारील घरांच्या भिंतींवर शैक्षणिक संदेश देणारी भित्‍तीचित्रे काढण्यात आली. सर्व चित्रे ही ऑईल कलर मध्ये काढण्यात आलेली आहेत. चित्रे काढताना गावातील लोकांनी सुध्दा विद्यार्थ्याना सहकार्य केले. रंगकामासाठी लागणारे इतर साहित्य जसे की पाणी, रंग कालवण्यासाठी लागणारी भांडी, उंचावरील रंगकाम करण्यासाठी लागणारी शिडी अशा अनेक गोष्टी ग्रामस्थांनी विद्यार्थ्याना पुरवल्या. श्रमदानाच्या दुपारच्या उपक्रमानंतर रात्रीपर्यंत भित्तीचित्रे काढण्याचे काम सर्वजण करत होते. त्याच वेळी इतर सर्व स्वयंसेवकांचे गट गावातील घरोघरी जाऊन लोकसाक्षरतेचे काम करीत होते. त्यांचे दैनंदिन जीवनातल्या अडचणी लक्षात घेवून त्यांना शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती देत होते.याच दरम्यान आपटे सर, वैभव घोडके सर, अर्चना मॅडम यांनी आर्किटेक्चर व सिविल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसोबत शेजारच्या गावातील पुरातन काळातील वाडा पाहण्यासाठी व त्यामध्ये वापरल्या गेलेल्या पुरातन तंत्रज्ञानाची माहीती घेण्यासाठी भेट दिली. त्याच दिवशी सायंकाळी मनोरंजनातून प्रबोधन या उपक्रमा अंतर्गत ईश्वर नलावडे यांचे व्याख्यान आयोजीत केले गेले. यासाठी सर्व ग्रामस्थांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार सर्वांनी व्याख्यानास भरपूर उपस्थिती दर्शवली.

याच दरम्यान आपटे सर, वैभव घोडके सर, अर्चना मॅडम यांनी आर्किटेक्चर व सिविल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसोबत शेजारच्या गावातील पुरातन काळातील वाडा पाहण्यासाठी व त्यामध्ये वापरल्या गेलेल्या पुरातन तंत्रज्ञानाची माहीती घेण्यासाठी भेट दिली. त्याच दिवशी सायंकाळी मनोरंजनातून प्रबोधन या उपक्रमा अंतर्गत ईश्वर नलावडे यांचे व्याख्यान आयोजीत केले गेले. यासाठी सर्व ग्रामस्थांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार सर्वांनी व्याख्यानास भरपूर उपस्थिती दर्शवली.

गावातून जाणाऱ्या ओढयावर वनराई बंधारा बांधण्यासाठी आल्यावर स्व. आपटे सर यांच्या नेतृत्वाखाली ओढ्यातील माती आणि आसपासच्या परिसरातील छोटेमोठे दगड एकत्र करून बंधाऱ्याचे काम सुरू करण्यात आले. आपटे सर व वैभव घोडके सर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकामाचे काम उत्तम रित्या होत होते. सरांनी आम्हाला दगडांची रचना, बांधकामातील बारकावे, बांधकाम चिरकाळ टिकण्यासाठी बांधकामामध्ये घ्यावायाची काळजी या सगळ्याबाबत ची माहिती प्रत्यक्षात समजावून सांगितली. हे ज्ञान विद्यार्थ्याना त्यांच्या शैक्षणिक तसेच वैयक्तिक जीवनामध्ये खूप मोलाचे ठरले. गावातील मान्यवरांनी या कामामध्ये मदत करत; लागणाऱ्या वाळूच्या गोण्या बांधकाम ठिकाणी आणुन देण्याचे काम केले. सर्व स्वयंसेवकांनी खुप उत्साहाने या कार्यामध्ये आपले श्रमदान केले. विशेष गोष्ट म्हणजे दोन्ही महाविद्यालयाच्या कार्यक्रम अधिकाऱ्यानी सुद्धा पुढाकार घेऊन सर्वासोबत या सेवेमध्ये आपली उपस्थिती नोंदवली.

शिबीरातील काही स्वयंसेवकांनी गावातील शाळकरी मुलांना भेटून त्यांच्यातील कलांचा आढावा घेतला. चित्रकला, वक्तृत्व, खेळ, नृत्य, गायन, वादन अशा अनेक कलांची आवड असलेल्या मुलांना त्याच्या शाळेच्या वेळेनंतर एकत्र बोलावून‍ चित्रकलेची स्पर्धा, बौद्धिक आकलनामध्ये वाढ करणाऱ्या प्रश्नमंजुषा असे अनेक उपक्रम राबवण्यात आले. नृत्य कलेची आवड असणाऱ्या मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांचा नृत्य बसवण्यात आला. शिबीराच्या शेवटी एक कार्यक्रम आयोजित करून त्यामध्ये सर्व गावकऱ्यांसमोर या मुलांना त्यांच्या कला सादर करण्याची संधी देण्यात आली. त्याचबरोबर घेतलेल्या स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या मुलांना गावातील प्रतिष्ठीत मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले. गावातील महिलांसाठी हळदीकुंकू चा कार्यक्रम आयोजित केला गेला. यामध्ये गावातील सर्व महिला वर्गाने उस्फूर्त प्रतिसाद देत आपली उपस्थिती नोंदवली. पारंपारिक खेळ, उखाणे यांच्यामुळे या कार्यक्रमास रंगत आली. शेवटी आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची आणि या शिबीराची सांगता झाली. या शिबीरातील उल्लेखनीय कार्य पहाता याची नोंद घेत राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हासमन्वयक व विभाग समन्वयक यांनी आभार प्रदर्शन करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

loading image
go to top