esakal | लईभारी! ग्रामीण भागातील अनिकेतचं थेट अमेरिकेतून कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Yin

अनिकेतचा यिन अधिवेशनातील ठराव मांडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला अन् थेट अमेरिकेतून संगीता तोडमल यांनी कौतुक केलं.

लईभारी! ग्रामीण भागातील अनिकेतचं थेट अमेरिकेतून कौतुक

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सकाळ समूहाच्या 'यिन'नं कुणाला काय दिलं, हे मला सांगता येणार नाही. मात्र, विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur District) असणाऱ्या भंगाराम तळोधी (ता. गोंडपिपरी) येथील अतिशय सामान्य कुटुंबातील अनिकेत दुर्गे नावाच्या मुलाचा यिन अधिवेशनातील ठराव मांडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला अन् त्याचं कौतुक थेट अमेरिकेतील (America) केंटकी राज्यात पर्यावरण संबंधित अभ्यास करणाऱ्या संगीता तोडमल यांनी केलं. हे कौतुक अनिकेतला निश्चित प्रेरणा देणारं आहे. हे सगळं शक्य झालं, ते केवळ सकाळच्या यिन समूहामुळेच, असं मत प्रमोद काकडे, श्रीकांत पेशट्टीवार, संदीप रायपुरे यांनी व्यक्त केलं.

मार्गदर्शक संदीप काळे, श्याम सर, कृष्णा शर्मा व यिनच्या पदाधिकाऱ्यांनी मला यिनमध्ये येण्याची संधी दिली, त्यामुळे मला हे यश प्राप्त झाल्याचे अनिकेतने आपले मत मांडताना सांगितले व चंद्रपूर सकाळ टीमचे आभार मानले. अमेरिकेतील केंटकी राज्यात वास्तव्यास असलेल्या संगीता तोडमल यांनी ठराव मांडतानाचा व्हिडिओ पाहून अनिकेतचं कौतुक केलं. सध्या तोडमल या अमेरिकेत पर्यावरण विषयक अभ्यास करत आहेत. त्याला जोड म्हणून अमेरिकेत भारतीय शेतीचा प्रयोग करून पर्यावरणाशी त्याची सांगड घालण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. त्यांनी पर्यावरण विषयात पी.एच.डी केली असून अमेरिकेत त्या पर्यावरणविषयक वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करताहेत. अमेरिकेतील अनेक संस्था त्यांच्याशी जुळून या कार्यात त्यांना सहकार्य करत आहेत.

हेही वाचा: Satara Medical College : खासदार पाटलांनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट

अतिशय मागास म्हणून ओळख असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातून अनिकेत दुर्गेंनी सकाळ समूहाच्या यिन अधिवेशनात विदर्भावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आपलं मत मांडलं होतं. ते सर्व विदर्भातील जनतेसाठी आजघडीला उल्लेखनीय ठरत आहे. खनिजकर्मबाबत मांडलेल्या ठरवाबद्दलची माहिती पुरविण्यासाठी अनिकेतला त्यांचे मित्र ॲड. दीपक चटप, जिओलॉजिस्ट धम्मदीप वाघमारे यांचं सहकार्य लाभलं आहे.

loading image
go to top