गरजपूर्ती ‘ऑन व्हील्स’ 

गरजपूर्ती ‘ऑन व्हील्स’ 

माणसानं चाकं शोधली आणि त्यानंतर त्याचं आयुष्यच बदललं हे आपल्याला माहीत आहे. चाकं किती तरी अशक्य, अतर्क्य गोष्टी करू शकतात. विशेषतः सायकलींसारख्या तुलनेनं सोप्या वाहनाबाबत जगभरात इतक्या प्रमाणावर संशोधन झालं आहे आणि त्यात इतकं नावीन्य आणणं सुरू आहे, की थक्कच होऊन जावं. चाकं काय कमाल करू शकतात हे त्यातून लक्षात येतं. एखादी सायकल थेट ई-बाईकमध्ये रूपांतरित होते, एखादी सायकल पूर्ण फोल्ड होते, एखादी सायकल ट्रॉली बॅगेत रूपांतरित होते अशा किती तरी करामती होत असतात. अशाच काही धमाल नावीन्यपूर्ण कल्पनांवर आपण एक नजर टाकू. 

कुणी सायकल घ्या, कुणी ट्रॉली घ्या! 
सायकल घेऊन तुम्ही कुठं तरी गेलाय आणि अचानक खूपशा सामानाची ने-आण करायची आहे असं लक्षात आलंय. सायकल तर एवढं सामान, बॅगा वगैरे नेऊ शकणार नाही, हे मान्य... पण सायकललाच ट्रॉली जोडलेली असेल तर? येस! ‘ट्रेगो’ नावाची सायकल यासाठी एकदम बेस्ट उपाय आहे. या सायकलची गंमत अशी, की तिची पुढची चाकं हँडलपासून बाजूला करता येतात आणि ती चक्क ट्रॉली म्हणून वापरता येतात. ही ट्रॉलीसुद्धा इतकी दणकट, की तब्बल २५ किलोंपर्यंत बॅगांची बिनधास्तपणे ने-आण करता येते. तिची किंमत मात्र ९२ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे बरंका! 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बाप भी, बच्चा भी! 
सायकलीची छान चक्कर मारणं अनेकांना आवडत असलं, तरी घरात लहान बाळ असेल, तर त्याचं काय करायचं? बाळाला सीटवर तर बसवता येत नाही. जर्मनीतल्या लिबेल नावाच्या कंपनीनं ‘ड्रॅगनफ्लाय’ नावाच्या सायकलसाठी भारी शक्कल लढवली आहे. त्यांनी चक्क बाळांचा स्ट्रोलरच सायकलला जोडून दिलाय. त्या स्ट्रोलरमध्ये बाळ छान बसेल आणि आई किंवा वडील हळूहळू मस्तपैकी सायकल चालवतील. बरं, बाळराजे किंवा बाळराणी रागावल्या तर आणखी पण एक मस्त सोय आहे. हा स्ट्रोलर काढूनसुद्धा ठेवता येतो. म्हणजे नुसतं स्ट्रोलर म्हणूनही तो वापरता येतो. फिरून झालं, की पुन्हा स्ट्रोलर द्यायचा सायकला जोडून. या सायकलची किंमत मात्र २,७५,५६२ रुपयांपुढे आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सायकल बदला मालगाडीत 
सायकलीचा वापर करताकरता सामानही नेण्याची गरज तुम्हाला वाटली, तर एक धमाल सायकल आहे. तिचं नावच ‘कर्न्व्हसायकल’ आहे. याचा अर्थ बदलणारी सायकल. या सायकलचं मागचं चाक खूप मागे ओढलं, की मध्ये असा भाग तयार होतो, ज्यात तुम्ही सामान ठेवू शकता. हे सामान तब्बल साठ किलोपर्यंत चालू शकतं. जेव्हा सामान नसेल आणि फक्त सायकलीचा उपयोग असेल, तर ते चाक पुन्हा मूळ स्थितीत आणलं, की साधी सायकल तयार! या सायकलची किंमत एक लाख रुपयांच्या पुढे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com