वर्क फ्रॉम होम आणि ॲक्सेसरीज 

वर्क फ्रॉम होम आणि ॲक्सेसरीज 
Updated on

देशातच नव्हे, तर संपूर्ण जगातच कोरोनाने थैमान घातले आहे. त्याचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची परवानगी दिली. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलले आहे. कोरोनाच्या महासंकटामुळे सामाजिक आणि वैयक्तिक असे खूप बदल झाले आहेत. काम करण्याचे स्वरूप ‘वर्क फ्रॉम होम’मध्ये बदलले. घराघरांमध्ये ऑफिसेस सुरू आहेत. आपण त्याला ‘होम ऑफिस’ म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मग त्यामधला सर्वांत महत्त्वाचा आणि अटळ भाग म्हणजेच या कामासाठी लागणारी उपकरणे अर्थात गॅजेट्स किंवा ॲक्सेसरीज! 

मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्यूटर, वाय-फाय, राऊटर, हेडफोन, माऊस आणि अशी बरीच उपकरणे यानिमित्ताने गरजेची आणि मोलाची ठरली आहेत. आजच्या डिजिटल युगात मोबाईल व कॉप्युटरशिवाय ‘वर्क फ्रॉम होम’ची कल्पनाही करवत नाही. ऑनलाइन मीटिंग्ज, व्हिडिओ कॉन्फरन्स आणि ऑनलाइन क्लासेस यांमुळे लोक आधीपेक्षा अधिक काळ स्क्रीनसमोर घालवत आहेत. परंतु, या उपकरणांना सुरू ठेवण्यासाठीही अनेक जोड-उपकरणे गरजेची असतात. माऊस, केबल, की-बोर्ड, प्रिंटर, सर्च प्रोजेक्टर्स अशा गोष्टीपासून अगदी रॅम, मदरबोर्ड, प्रोसेसर अशा तांत्रिक भागांपर्यंत सर्वकाही हाताच्या बोटावर, ऑनलाइन उपलब्ध आहे. सध्या ऑनलाइन मार्केटची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. घरबसल्या तुम्हाला गरज असलेल्या वस्तूची सर्व माहिती आणि घरपोच सेवा ऑनलाइन साइट्स देतात. एवढच नाही, तर वेगवेगळ्या कंपन्यांच्या उत्पादकांची तुलना करून वस्तू खरेदी करता येते. 

सणांच्या निमित्ताने सध्या ऑनलाइन साइटवर आणि खास करून इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर भलामोठा सेल सुरू आहे. काही उत्पादनांवर सवलत मिळते, त्यासोबत इतर गोष्टी मोफत मिळतात. एवढेच नाही, तर फोन, टॅब्स, लॅपटॉप यांची नवीन मॉडेल्स बाजारात येण्याअगोदरच बुक करण्याचा पर्याय ‘अॅमेझॉन’सारख्या ऑनलाइन साइटवर पाहायला मिळतो. ‘अॅमेझॉन’वर जुन्या उपकरणाच्या बदल्यात काही सवलतही दिल्या जातात. 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एरवी आपण ही उपकरणे विकत घेण्याचा विचार केला, तर त्याची किंमत ही अवाक करणारी असते. मात्र सध्या सुरू असलेल्या सेलमध्ये अनेक पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. वर्क फ्रॉम होम हे फक्त उपकरणांपुरते मर्यादित नाही. ऑफिसमध्ये काम करताना आपल्यासाठी टेबल, खुर्ची, डेस्क अशा गोष्टी उपलब्ध असतात. आता पूर्णवेळ घरातून काम करतानाही अशा गोष्टींची गरज भासते. घरी कामाचा सेटअप तयार करताना माऊसपासून, पेनस्टॅंड, पावरबॅंक, मॅट, लॅपडेस्क अशा लहान सहान गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. या गोष्टी घेत असताना त्या एका वेळेसाठी नसून, भविष्यातही त्याचा वारंवार उपयोग होणार आहे. काही बजेटफ्रेंडली उपकरणे आणि त्यांच्यावर असणारी सूट तपासून पाहाव्यात. सेलची संपूर्ण माहिती घेऊन इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये गुंतवणूक करावी, हे सूत्र मात्र नक्की पाळा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com