झूम... : कारमध्ये सॅनिटायझर वापरताना...

चंद्रकांत दडस
बुधवार, 20 मे 2020

कोरोनासारख्या विषाणूशी लढताना हॅण्ड सॅनिटायझरचा वापर अतिशय आवश्‍यक झाला आहे. प्रत्येक घरामध्ये याचा वापर होताना दिसून येत आहे. बाहेरून घरात येताना आपण आपल्या हातांना सॅनिटायझर लावण्याचे विसरत नाही. अनेक लोक आपल्या कारमध्येही सॅनिटायझर ठेवत आहेत. मात्र यात अगदी छोट्याशा चुकीमुळेही मोठी दुर्घटना होऊ शकते.

कोरोनासारख्या विषाणूशी लढताना हॅण्ड सॅनिटायझरचा वापर अतिशय आवश्‍यक झाला आहे. प्रत्येक घरामध्ये याचा वापर होताना दिसून येत आहे. बाहेरून घरात येताना आपण आपल्या हातांना सॅनिटायझर लावण्याचे विसरत नाही. अनेक लोक आपल्या कारमध्येही सॅनिटायझर ठेवत आहेत. मात्र यात अगदी छोट्याशा चुकीमुळेही मोठी दुर्घटना होऊ शकते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सॅनिटायझर वापरताना काळजी घेणे अत्यावश्‍यक आहे. सॅनिटायझरमध्ये ज्वलनशील अल्कोहोल असते. ते हातावरील जंतूंचा नाश करतो; मात्र गरम वस्तूशी संपर्क आल्यास ते पेट घेते. सॅनिटायझर वापराताना काळजी न घेतल्याने अनेक दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कारमध्ये सॅनिटायझर वापरताना नेमकी काय काळजी घ्यावी, हे समजून घेणे आवश्‍यक ठरते.

 • सॅनिटायझरचा वापर करताना लक्षात ठेवा की, आपल्यासमोर कोणतीही गरम वस्तू नको. 
 • आगीच्या समोर उभे राहून सॅनिटायझरचा वापर करू नका. 
 • आपल्याला कारमध्ये सिगारेट पिण्याची सवय असेल, तर त्या वेळी सॅनिटायझरचा वापर करणे टाळा. 
 • सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असल्याने ते थंड ठिकाणी ठेवावे. 
 • गाडीमध्ये ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान नाही ना, याची काळजी घ्या. तापमान जास्त असल्यास एसी सुरू करून तापमान नियंत्रित ठेवा.
 • कारमध्ये सॅनिटायझर ठेवले असेल, तर ते विंडशील्डच्या समोर नाही ना याची खात्री करून घ्या. 
 • सूर्यप्रकाश थेट सॅनिटायझरच्या बॉटलवर पडणार नाही, अशा ठिकाणी सॅनिटायझरची बॉटल कारमध्ये ठेवा.
 • तुम्हाला कारमध्ये सॅनिटायझर ठेवायचा असेल, तर एखाद्या बॅगमध्ये तो ठेवावा. 
 • कारमध्ये सतत सॅनिटायझरचा वापर करणेही टाळा. यामुळे हातावरील त्वचा खराब होते.
 • अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर तुमच्या गाडीतील लेदर खराब करू शकते. तसेच याचा सर्वांत मोठा फटका स्टेअरिंग व्हीलला बसू शकतो.
 • तुम्हाला गाडीमध्ये हात धुण्यासाठी काही वापरायचे असेल, तर साबणाचे पाणी वापरण्यास हरकत नाही. ते स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही कारमध्ये ठेवू शकता.
 • स्वत:ची गाडी शक्‍यतो इतरांना वापरण्यास देणे टाळा. यामुळे कोरोनाचा फैलाव कमी होण्यास मदत होईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article chandrakant dadas on sanitizer use in car