फॅशन टशन : घरात प्रेझेंटेबल दिसण्यासाठी...

माधुरी सरवणकर-तेलवणे
Wednesday, 20 May 2020

लॉकडाउननुळे आपण सर्वच जण घरात ‘लॉक’ झालेलो असलो, तरी घरातून सर्वांचे काम सुरू आहे. वर्क फ्रॉम होम करताना अनेकदा विविध क्षेत्रातील नोकरदारांना क्लाएंटशी व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलावे लागते. त्यावेळी तुम्ही वेल ड्रेसअप असणे खूप गरजेचे आहे. अनेकदा व्हिडिओ कॉलशिवाय पर्याय नसतो. आता तर बहुतांश मिटिंग्ज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारेच घेण्याकडे कल वाढला आहे.

लॉकडाउननुळे आपण सर्वच जण घरात ‘लॉक’ झालेलो असलो, तरी घरातून सर्वांचे काम सुरू आहे. वर्क फ्रॉम होम करताना अनेकदा विविध क्षेत्रातील नोकरदारांना क्लाएंटशी व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलावे लागते. त्यावेळी तुम्ही वेल ड्रेसअप असणे खूप गरजेचे आहे. अनेकदा व्हिडिओ कॉलशिवाय पर्याय नसतो. आता तर बहुतांश मिटिंग्ज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारेच घेण्याकडे कल वाढला आहे. केवळ ऑफिसच्या मिटिंग्ज व्हिडिओद्वारे होत नाहीत तर, अनेक ठिकाणी ऑनलाइन क्लासही घेतले जातात. अशावेळी अचानक एखादा कॉल शेड्युल झाला, तर तुमची पळापळ होऊ नये यासाठी काही टिप्स तुम्हाला देत आहोत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपल्या सर्वांचे गेल्या काही दिवसांपासून घरातूनच काम सुरू आहे. घरातून काम करताना येणाऱ्या विविध अडचणींचा सामना करताना तुमच्या बॉसने एखादा व्हिडिओ कॉल क्लाइंटसोबत लायनअप केला किंवा ऑफिशअल मिटिंगचे आयोजन केले तर कपडे काय घालायचे असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. 

  • शक्यतो मुलींना याबाबत मोठी चिंता सतावते. त्यामुळे व्हिडिओ कॉलच्या स्वरूपाप्रमाणे कपडे ठरवा. 
  • क्लाइंटशी बोलताना कॅज्युअल वेअरच असू द्या. मग यात कुर्ता- पायजमा, शर्ट, फॉर्मल वन पीसचा समावेश असुद्या. 
  • मुलांनी शक्यतो टी-शर्टचा वापर न करता शर्टचा वापर करावा. यात रंग निवडतानाही जास्त गडद न निवडता सॉफ्ट रंगांना प्राधान्य दिले तर उत्तमच. 
  • व्हिडिओ कॉलमध्ये सर्वप्रथम आपला चेहरा समोरच्या व्यक्तीला दिसत असतो. त्यामुळे प्रेझेंटेबल दिसण्यासाठी हेअरस्टाईलसह हलका मेकअप करणे देखील आवश्यक आहे. 
  • तुमच्याकडे जास्त वेळ नसेल्यास फक्त डोळ्यांत हलके काजळ भरा. तसेच, आयलायनर, लिपस्टिक लावून ही मेकअप पाच मिनिटांत पूर्ण करू शकता. 
  • हेअरस्टाईलमध्ये हाय पोनी किंवा मोकळे केस तुमचा कॅज्युअल लुक पूर्ण करेल. 
  • मुलांनी शक्यतो वेळच्या वेळी शेव्हिंग करावी. त्यामुळे ऐनवेळी अडचण होणार नाही.  
  • घरी मिळालेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करून ऑफिससाठी लागणाऱ्या कपड्यांना इस्त्री करून ठेवायला विसरू नका बरं का! कारण, अचानक तुमचा व्हिडिओ कॉल शेड्युल झाल्यास कपड्यांना इस्त्री करायला वेळ मिळत नाही. 
  • मंडळी, व्हिडिओ कॉलमध्ये आपण प्रेझेंटेबल दिसलोच पाहिजे, याचा विचार नक्की करा बरं का!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article madhuri sarvankar