फॅशन टशन : ठंडी में गरमीका एहसास...

माधुरी सरवणकर
बुधवार, 8 जानेवारी 2020

‘हुडी घेऊ की लॉन्ग जॅकेट..’,  ‘स्वेटर फार आउटडेटेड झालं आहे. मग लॉँग ओव्हर कोट कसा दिसेल..’ अशा गप्पा तुमच्या ग्रुपमध्येदेखील होत असतील ना? तुम्हालाही कळालं असेल, मला नेमकं काय सांगायचंय. आता थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. थंडीतील हुडहुडी कमी करण्यासाठी सध्या विविध मॉल व दुकानांमध्ये ‘विंटर कलेक्‍शन’ पाहायला मिळत आहे. स्वेट शर्ट, हूडी, डेनिम, ज्यूट व लेदर जॅकेट, उलनच्या कॅप सध्या ट्रेन्डमध्ये आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय घालू शकता...
1) टिपिकल स्वेटरची फॅशन आता दिसत नाही. तर आता लॉग्न लाइन ओव्हर कोट, हुडीज, स्वेट शर्ट, पोलो टीशर्टची चलती आहे. 
2) डेनिम, लेदर आणि फर कॉलर जॅकेट, श्रगदेखील उत्तम पर्याय आहे. 
3) पार्टी लुकसाठी वनपीसबरोबर वूलन स्टॉकिंग परिधान करू शकता. 
4) मफलर, स्टोल, क्रोशा स्कार्फमुळे हटके लुक येतो. 
5) विविध लाइट शेडमधील वूलनच्या टोप्या मस्त दिसतात. 
6) कानात गार वारा जाऊ नये म्हणून विविध कार्टूनच्या आकारातील हेड फोन कॅप वापरून बघा. दिसायला क्‍यूट दिसतात आणि उबदारही असतात. 
7) गाडीवरून प्रवास करणाऱ्यांसाठी ग्लोव्हज घालणं मस्ट आहे. यात विविध रंग उपलब्ध आहेत.

ट्राय धिस वन... 
1) विंटर क्‍लॉथ निवडताना जास्त भडक रंग निवडू नका. 
2) सेलिब्रिटींमध्ये ब्राऊन रंगाच्या विविध शेडमधील ओव्हर कोटचा ट्रेंड आहे. 
3) या कपड्यांवर गुडघ्यापर्यंतचे बूट छान दिसतात. 
4) मॉश्‍यूराईज बेस लाइट मेकअप करा. न्यूड रंगाची लिपस्टिक झकास दिसते. 
5) हॅण्ड बॅग निवडताना गडद रंगाची बॅग निवडा. 
6) कोणतेही जॅकेट घालताना नेहमी लाइट रंगाचा टॉप किंवा टी-शर्ट घाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article madhuri sarvankar on fashion

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: