esakal | फॅशन टशन : ओव्हर साइज T-Shirt
sakal

बोलून बातमी शोधा

T-Shirt

तुम्हाला स्वतःचं एक फॅशन स्टेटमेंट तयार करायचं असल्यास ओव्हर साइज टी-शर्ट, शर्टचा पर्याय फारच कुल आहे. आता बघा ना, उन्हाचा तडाखा वाढलाय आणि या वातावरणात स्कीन टाईट कपडे घालणं थोडं अवघडच जात आहे. त्यामुळं सैल कपडे कर्म्फेरटेबल वाटतात. अशावेळी मी सुचवलेल्या या पर्यायाचा नक्कीच विचार करून बघा! 

फॅशन टशन : ओव्हर साइज T-Shirt

sakal_logo
By
माधुरी सरवणकर-तेलवणे

तुम्हाला स्वतःचं एक फॅशन स्टेटमेंट तयार करायचं असल्यास ओव्हर साइज टी-शर्ट, शर्टचा पर्याय फारच कुल आहे. आता बघा ना, उन्हाचा तडाखा वाढलाय आणि या वातावरणात स्कीन टाईट कपडे घालणं थोडं अवघडच जात आहे. त्यामुळं सैल कपडे कर्म्फेरटेबल वाटतात. अशावेळी मी सुचवलेल्या या पर्यायाचा नक्कीच विचार करून बघा! 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ओव्हर साइज टी-शर्ट किंवा शर्ट तुम्ही विविध प्रकारे घालून स्वतःची हवा करू शकतात. हा टी-शर्ट ब्लेझरसोबत कमाल दिसतो. हा लुक अधिक छान दिसण्यासाठी स्कीनी जीन्स, गळ्यात ॲक्‍सेसरीज आणि फंकी सनग्लासेसही घालायला विसरू नका. ऑफ शोल्डर स्टाइलसुद्धा भारी दिसते. हा प्रकार तुम्ही हॉट पॅन्ट किंवा शॉर्ट डेनिम स्कर्टसोबत ट्राय करा. यावर व्हाइट स्निकर्स घालायला विसरू नका. ओव्हर साइज टी-शर्टच्या स्लिव्हज् मोठ्या असतात. त्या तशाच ठेवल्यात तरी चालतात; पण त्या ‘रोल अप’ केल्यानंतर हटके लुक दिसता. पब किंवा डेटवर जायचं असल्यास याशिवाय ट्रेन्डी आणि कंफर्टेबल पर्याय दुसरा असू शकत नाही. अनेक बॉलिवूड किंवा हॉलिवूडमधल्या हिरोईन्स या स्टाईलला फॉलो करतात. भविष्यात एअरपोर्ट लुकसाठी तुम्हाला हा लुक ट्राय करता येऊ शकतो. 

1) ओव्हरसाइज टी-शर्टची एक चांगली गोष्ट म्हणजे आपण क्रॉप टॉप म्हणूनदेखील वापरू शकतो. फक्त टी-शर्टला गाठ बांधून तुम्ही टी-शर्टचे रूपांतर क्रॉपमध्ये करू शकतो.

2) डंगरीमध्येदेखील हा टी-शर्ट अमेझिंग दिसतो. 

3) हाय हिल्स किंवा स्निकर्स घाला. 

4) टोन जिन्स, डेनिम स्कर्टवर किंवा वन पीस म्हणूनही घालता येईल. 

5) स्निकर्स, स्पोर्ट शूज, हाय हिल्स छान दिसतील.

loading image