
सर्वांना आवडणार ऋतू म्हणजे पावसाळा. हवेत आलेला गारवा, बरसणाऱ्या सरी अन् निसर्गाने चढविलेला हिरवा साज, मातीचा दरवळणार सुगंध सर्वकाही मनाला प्रफुल्लित करणारे असते. या सीझनमध्ये स्टायलिश आणि प्रेझेंटेबल राहण्यासाठी मेकअप करणे आणि तो टिकणे जिकिरीचे असते. पावसाळ्यात चेहऱ्यावरील मेकअप योग्य खबरदारी घेतली, तर अधिक काळासाठी राहू शकतो.
सर्वांना आवडणार ऋतू म्हणजे पावसाळा. हवेत आलेला गारवा, बरसणाऱ्या सरी अन् निसर्गाने चढविलेला हिरवा साज, मातीचा दरवळणार सुगंध सर्वकाही मनाला प्रफुल्लित करणारे असते. या सीझनमध्ये स्टायलिश आणि प्रेझेंटेबल राहण्यासाठी मेकअप करणे आणि तो टिकणे जिकिरीचे असते. पावसाळ्यात चेहऱ्यावरील मेकअप योग्य खबरदारी घेतली, तर अधिक काळासाठी राहू शकतो.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पावसाळ्यात वातावरण उष्ण आणि दमट असते. म्हणूनच मेकअपही त्यानुसारच करायला हवा. इतर ऋतूमध्ये तुम्ही मेकअप केल्यानंतर तो पुसला जाण्याची शक्यता कमी असते. पावसाळी दिवसात तो करताना फारच सावधगिरी पाळावी लागते. कारण, तुम्ही थोडेही भिजलात तरी तुमचा मेकअप खराब होतो. त्यासाठी वॉटरप्रूफ किंवा वॉटररेसिस्टंट कॉस्मेटिक्स वापरले पाहिजे. हे कॉस्मेटिक्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
मेकअपची सुरुवात मॉइश्चराइजरपासून होते. त्यातल्या त्यात वॉटर बेस्ड मॉइश्चराइजर लावणे उत्तम, त्यामुळे घाम येण्याचे प्रमाण कमी होईल. तेलकट त्वचेसाठी अस्ट्रेन्जर आणि कोरड्या त्वचेसाठी टोनर लावा. या ऋतूमध्ये फाउंडेशनला आपल्या मेकअपमधून स्किपच करा, कारण पाण्याने किंवा घामाने चेहरा ओला झाल्यास चेहऱ्यावर पॅचेस येतात. हा पर्याय स्किप करता आलाच नाही, तर तुमच्या चेहऱ्याच्या रंगांशी जुळणाऱ्या वॉटर फाउंडेशनचा वापर करा. कितीही मेकअप केला तरी लिपस्टिक शिवाय लुक पूर्ण होत नाही. पावसाळ्यामध्ये लाइट रंगाची लिपस्टिक वापरणे आवश्यक आहे. डार्क शेड लावू नये. मॅट कलरदेखील झकास दिसतात. ओठ मुलायम करण्यासाठी पारदर्शक लिप ग्लॉस वापरावा.
लिपस्टिक मेकअपचा आत्मा आहे, तर डोळ्यांचा मेकअप रूप खुलविण्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. पावसाळ्यात आयशॅडो, मस्करा, लाइनर लावत असाल, तर पावसाचे काही थेंब पडताच पूर्ण मेकअप खराब होईल. त्यासाठी पावडर आय शॅडोची निवड करा. तुम्ही ब्राउन, ब्ल्यू, ग्रीन आणि पिंक शेड्सची निवड करू शकता. वॉटरप्रूफ मस्काऱ्याचा अथवा आयब्रो पेन्सिलचा तुम्हाला वापर करता येईल. या ऋतूत चेहऱ्याला ब्लशरने नक्कीच गेटअप येतो.
1) मेकअप करण्याच्या आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.
2) मेकअप जास्त वेळ टिकण्यासाठी बर्फाचे तुकडे चेहऱ्यावरून फिरवावे.
3) मेकअपचा बेस लावताना वॉटरप्रुफ फाउंडेशनचा वापर करावा.
4) पावसाळ्यात शक्यतो काजळ वापरू नये.
5) पावसात केस भिजल्यास ते लगेचच ड्राय करावे.
6) केसांचा पोत खराब होऊ नये म्हणून तेल वापरावे.
7) क्रिम बेस सौंदर्यप्रसाधने वापरणे टाळा, कारण आर्द्रता असल्याने चेहरा अधिक तेलकट दिसू लागतो.