फॅशन टशन : पावसाळी कलेक्शन

Rainy-Season
Rainy-Season

पावसात देखील स्टायलिश राहणं खूप सोपं आहे. तेही आपल्याकडील उपलब्ध असलेल्या कपड्यांमधून नवीन हटके स्टाइल करणं खरंतर खूप क्रिएटिव्ह गोष्ट आहे. या सीझनमध्ये सर्वाधिक उपयोगी पडतात ते ढगळे, शॉर्ट आणि पटकन वाळणारे कपडे. त्यामुळं पहिल्यांदा या तिन्ही पर्यायात मोडणाऱ्या आणि तुमच्याकडं उपलब्ध असणाऱ्या कपड्यांची लिस्ट तयार करा. तसेच, रंग निघणारे आणि ट्रान्सपरंट कपडे वापरणं टाळाच. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळं अनेकदा अंगावर पाणी उडतं. त्यामुळं पटकन फोल्ड करता येईल अशी जिन्स वापरायला काहीच हरकत नाही. या सीझनमध्ये केप्री पॅन्ट वापरलीत तर उत्तमच. तुमच्याकडं जुनी डेनिम असल्यास ती कापून त्याची केप्री तयार करू शकता.

रंगबिरंगी स्टोल किंवा ओढण्यांच्या सहाय्यानं हटके स्टाइल करता येते. फक्त ती कॅरी करायला कॉन्फिडन्स लागतो. आतमध्ये इनर किंवा ट्यूब टॉप घालून स्टोलच्या मदतीनं जॅकेट, क्रॉप टॉपची फॅशन करता येते. या सीझनमध्ये फ्लेअर स्कर्ट वापरणं टाळाच. कारण पावसाळ्यात ते खराब होण्याची शक्यता असते. हा स्कर्ट तुम्ही ड्रेस म्हणून वापरू शकता. पण हो, त्याला इलास्टिक असणं आवश्यक आहे. स्कर्टची वेस्ट लाईन बट्सपर्यंत घ्या. ट्यूब टॉपसारखा हा टॉप दिसतो. वेस्ट बेल्ट त्यावर बांधून तुम्हाला नवीन स्टाइल क्रिएट करता येऊ शकते. तसेच, जुन्या ओव्हर साईज टी-शर्टचा देखील वापर करता येतो. त्याला समोरून कात्री मारून त्याचा श्रग म्हणून वापर करता येणे शक्य आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ड्रेसिंग टिप्स -
1) ट्रान्सपरंट कपडे परिधान करणे टाळा. शिफॉन, लायक्राचे टॉप भिजल्यावर पारदर्शक होतात.
2) जार्जेट किंवा शिफॉन, नायलॉन, सिन्थेटिक कापड भिजले, तरी लवकर वाळते. 
3) टाईट कपडे नकोत.
4) नी लेन्थचे कपडे निवडा. 
5) या सीझनमध्ये रंगीत कपडे खूप छान दिसतात. भिजलात किंवा कपड्यांवर चिखल उडला तरी फारसा दिसून येत नाही. 
6)  फ्लोरल प्रिंटचे टॉप ही या सीझनमध्ये कडक दिसतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com