गॅजेट्स : यू-ट्यूब VS टिकटॉक

Youtube-and-Tiktok
Youtube-and-Tiktok

सोशल मीडियावर गेल्या आठवड्याभरापासून यू-ट्यूब आणि टिकटॉक यांच्यातील शीतयुद्ध चांगलेच गाजत आहे. दोन्ही माध्यमांवरील युजर्स एकमेकांवर आगपाखड करत आहे. कुठून सुरू झाला हा वाद? काय आहे त्यांच्या वादातील मुद्दे? दोन्ही माध्यमांतील फरक काय आहे? जाणून घेऊया...

नेमका वाद कुठून सुरू झाला?
गेल्या काही दिवसांपासून अनेक नेटिझन्स यू-ट्यूबसह सोशल मीडियावर टिकटॉक स्टार्सची मस्करी करत होते. त्यांच्याविरूद्ध रोस्टिंग केली जात होती. विशेष म्हणजे, प्रख्यात यू-ट्यूबर कॅरी मिनाटी (मूळ नाव अजय नागर) याने टिकटॉक स्टार आमीर सिद्धीकीला रोस्ट करणारा व्हिडिओ यू-ट्यूबवर प्रकाशित केला. काही वेळातच हा व्हिडिओ ट्रेण्डिंगमध्ये आला. तब्बल १ कोटी ७० लाख व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले. यू-ट्यूबवरून होत असलेल्या हा प्रकार टिकटॉक स्टार्सच्या जिव्हारी लागला. त्यांनीही यू-ट्यूबर्स विरोधात रोस्टिंग सुरू केली. दरम्यान, यू-ट्यूबने कॅरी मिनाटीचा ट्रेण्डिंग होत असलेला व्हिडिओ यू-ट्यूबच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे सांगत डिलिट केला. त्यानंतर या वादाला वेगळेच वळण मिळाले. यू-ट्यूबर्स विरुद्ध टिकटॉकर्स असा वाद रंगू लागला. अनेक यू-ट्यूबर्स कॅरी मिनाटीच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागले. त्यांनी त्यांच्या मोबाईलमधील टिकटॉक अॅप अनइन्स्टॉल केले.

वादाची पार्श्वभूमी काय?
मूळ गुगल कंपनीचे असलेले यू-ट्यूब हे व्हिडिओ कन्टेन्ट शेअरींग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाते. जावेद करीम, स्टिव चेन आणि चाड हर्ली यांनी १४ फेब्रुवारी २००५ रोजी यू-ट्यूबची स्थापना केली. गुगल अकाऊंट असलेल्या कोणालाही यू-ट्यूबवर अकाऊंट बनवता येते. हळूहळू यू-ट्यूब लोकप्रिय होऊ लागले. अगदी दोन-तीन वर्षापूर्वीपर्यंत टिकटॉक हे व्हिडिओ शेअरींग अॅप येईपर्यंत यू-ट्यूबला कोणीही मोठा स्पर्धक नव्हता. चीनच्या झांग यिमिंग यांनी २०१२मध्ये तयार केलेले टिकटॉक २०१६मध्ये बाजारात दाखल होताच अनेक नेटीझन्स टिकटॉककडे वळाले. अवघ्या काही सेकंदाच्या कन्टेन्टमुळे अनेक टिकटॉकला अल्पावधीत लोकप्रियता मिळाली. त्यामुळे अनेक नावाजलेल्या यू-ट्यूबर्सला त्याचा फटका बसू लागला. कारण यू-ट्यूबर कोणतीही कन्टेन्ट प्रकाशित करण्यापूर्वी प्रचंड मेहनत लागले. विषयाची तयारी, शूटिंग, एडिटिंग, रेंडरिंग आणि त्यानंतर व्हिडिओ प्रकाशित केला जातो. तुम्हाला दर्जेदार कन्टेन्ट द्यायचा असेल, तर त्यासाठी कॉम्प्युटर, एडिटिंग सॉफ्टवेअरची गरज लागते. त्यातुलनेत टिकटॉकवर काही सेकंदाचा व्हिडिओ प्रकाशित करण्यासाठी तुमच्या हातातील मोबाईल पुरेसा आहे. त्यामुळे यू-ट्यूबवरील कन्टेन्टला फटका बसू लागला. त्यातून हा यु-ट्यूब व्हर्सेस टिकटॉक हा वाद सुरू झाला.

यू-ट्यूब आणि टिकटॉकमधील फरक
यू-ट्यूब -

यू-ट्यूबवर व्हिडिओ कन्टेन्ट प्रकाशित करण्यासाठी सर्वसामान्यांना १५ मिनिटे आणि व्हेरिफाईड अकाऊंटसाठी अमर्यादित वेळ मिळतो. पुरेसा वेळ उपलब्ध होत असल्याने विविध विषयांना हात घालता येतो. अनेक युट्यूबर्सना आपल्या दर्जेदार कन्टेन्टमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. काही युट्यूबर्सने तर एखादा विषय निवडून त्यावर ते सातत्याने कन्टेन्ट प्रकाशित करतात. उदा. टेक्निकल, टुरिझम, ट्रॅव्हलिंग, फूड, व्लॉगिंग आदी. विशेष म्हणजे अनेक युट्यूबर्स या माध्यमातून पैसैही कमावतात.

टिकटॉक
अगदी पंधरा सेकंदाची मर्यादा असलेल्या टिकटॉकवर प्रामुख्याने विनोदी, उपरोधिक व्हिडिओ प्रकाशित केले जाते. कमाल मर्यादेत पंधरा सेंकदाचे चार व्हिडिओ तयार करता येतो. टिकटॉकवरील वेळेची मर्यादेमुळे तेथे दर्जेदार कन्टेन्टचा तेथे अभाव आढळतो. त्यातुलनेत युट्यूबवर कन्टेन्टचा दर्जा हा कमालीचा चांगला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com