esakal | फॅशन टशन : ऑफिस गेटअप फॉर्मल ते सेमीफॉर्मल!
sakal

बोलून बातमी शोधा

Fashion

फॅशन बदलण्याची अनेक कारणे आहेत. दैनंदिन आयुष्यातील एक अविभाज्य भाग म्हणजे ऑफिसचे काम, अर्थात ऑफिसमधून किंवा वर्क फ्रॉम होम. कामाचं स्वरूप बदलत आहे, वेळ बदलत आहे आणि त्यामुळं फॅशनही तिची व्याख्या बदलत आहे. ऑफिस कपड्यांच्या पॅटर्नची विभागणी साधारण तीन प्रकारांत होऊ शकते. फॉर्मल, सेमीफॉर्मल आणि पारंपरिक.

फॅशन टशन : ऑफिस गेटअप फॉर्मल ते सेमीफॉर्मल!

sakal_logo
By
ऋतुजा कदम

फॅशन बदलण्याची अनेक कारणे आहेत. दैनंदिन आयुष्यातील एक अविभाज्य भाग म्हणजे ऑफिसचे काम, अर्थात ऑफिसमधून किंवा वर्क फ्रॉम होम. कामाचं स्वरूप बदलत आहे, वेळ बदलत आहे आणि त्यामुळं फॅशनही तिची व्याख्या बदलत आहे. ऑफिस कपड्यांच्या पॅटर्नची विभागणी साधारण तीन प्रकारांत होऊ शकते. फॉर्मल, सेमीफॉर्मल आणि पारंपरिक. भारतात ऑफिसमध्ये परिधान करण्यासाठी हे तीन प्रकार आदर्श मानले जातात. सगळ्याच ऑफिसेसमध्ये फॉर्मल कपड्यांची सक्ती असतेच असे नाही. अशा मिश्र वातावरणामुळं फॉर्मल आणि सेमीफॉर्मल दोन्हींचं समीकरण सांभाळणारी फॅशन सध्या आली आहे. त्यामध्ये नक्की कोणत्या प्रकारची स्टाईल येते, ते जाणून घ्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑफिससाठी आरामदायी आउटफिट कसे असावे?
1) राउंड नेक टी-शर्ट

फॉर्मल शर्ट दररोज घालणं जरा अवघडच आहे. शिवाय प्रत्येक ऑफिसमध्ये तसं घालणं बंधनकारक असतंच असं नाही. सध्या राउंड नेक अर्थात बंद गोल गळ्याच्या टी-शर्टची फॅशन आहे. 

प्लेन आणि सॉलिड अशा प्रकारचे टी-शर्ट घालता येतील. हे टी-शर्ट हाफ किंवा फूल स्लिव्हज असावेत, याची काळजी घ्या. टी-शर्ट प्लेन असणं गरजेचं आहे. ग्राफिक, प्रिंटेड टी-शर्ट घालणं टाळा. ऑफिसच्या वातावरणात अशा प्रकारचे टी-शर्ट 
योग्य दिसत नाहीत.

2) बॉटम्स
फॉर्मलमध्ये पॅन्टचा विचार करता त्यासाठी ट्राऊझर हा पर्याय आहे. ऑफिससाठी असणारे ट्राऊझर हे आता सळसळीत, हलके आणि सैलसर असतात. नेहमीच्या जीन्सला हा चांगला पर्याय आहे. जीन्ससारख्या दिसणाऱ्या परंतु, लेगिंन्ससारखे मऊ कापड असणाऱ्या ‘ट्रेगिन्स’ही सध्या बाजारात आल्या आहेत. ट्राऊझर आणि जीन्सचं मिश्रण असल्यानं त्याला ‘ट्रेगिन्स’ म्हटलं जातं.

या खास करून ऑफिससाठी किंवा रोजच्या वापरासाठी तयार गेल्या आहेत. याशिवाय बॅगी पॅन्ट किंवा कॉटन पॅंटही घालता येतील. राउंड नेक टी-शर्ट आणि अशा बॉटमसह चांगला लुक मिळवता येईल. पॅरेलल पॅंट हा नक्कीच चांगला पर्याय आहे. 

3) जॅकेट
ऑफिसवेअरचे चित्र आता संपूर्णपणे बदलत आहे. राखाडी, काळा, पांढरा अशा रंगांची जागा गडद रंगांनं घेतली आहे. त्यामुळं भरपूर रंगांचे पर्याय सध्या पाहायला मिळतात. ऑफिससाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लेझरपेक्षा जॅकेटला प्राधान्य दिले जाते. ही जॅकेट साधारण नसून ब्लेझरसारखीच असतात. परंतु, कापड आणि पॅटर्नमधील बदलांमुळं ऑफिस व्यतिरिक्तही ती वापरता येऊ शकतात. 

Edited By - Prashant Patil