टिवटिवाट : सोशल मीडियातल्या राजकारणाचे तीन ‘पी’

सम्राट फडणीस
Wednesday, 12 February 2020

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल काल लागले. या निवडणुकीचा प्रचार जितका रस्त्यांवर, गल्ली-मोहल्ल्यांमध्ये झाला त्याहीपेक्षा अधिक ट्विटरवर झालेला. आम आदमी पार्टी (आप) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्या कार्यकर्त्यांचं ट्विटरयुद्ध दोन आठवड्यांहून अधिक काळ चाललेलं. दोन्ही पक्षांनी आपापला अजेंडा ट्विटरवरून ठरवलेला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या निवडणुकीनं सोशल मीडियाच्या वापराचे तीन ‘पी’ समोर आणले. पहिला पोलरायझेशन (ध्रुवीकरण), दुसरा पी पर्सेप्शन (समजाची निर्मिती) आणि तिसरा पॉवर (सत्ता).

मतदारांना (म्हणजे पुन्हा पी - पीपल) अजेंड्याकडं रेटत नेणं, त्यासाठी पक्ष नेत्यांची ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा निर्माण करत नेणं आणि त्यातून सत्तेपर्यंत जाणं, असा निवडणुकीचा सोशल मीडियातला सत्तेचा प्रवाह आहे. त्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केलेल्या पक्षांचं अस्तित्वही निवडणुकीत दिसून येत नाही.आम आदमी पक्षात स्थापनेपासून सोशल मीडियाचं महत्त्व आहे. तुलनेनं भाजप अत्याधुनिक आणि शक्तिशाली आहे. तरीही सोशल मीडियाद्वारे प्रचार-प्रसारात ‘आप’ने बाजी मारली.

भाजपनं शाहिन बागचा मुद्दा हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणासाठी सोशल मीडियात वापरायचा निश्‍चितपणे प्रयत्न केला. या ध्रुवीकरणाला ‘आप’नं स्वतःच्या मतदारांच्या ध्रुवीकरणानं उत्तर दिलं. मोदी-शहांच्या उंचच उंच नेलेल्या प्रतिमेला अरविंद केजरीवालांच्या ‘आपला मुख्यमंत्री’ प्रतिमेनं उत्तर दिलं. सर्वशक्तिशाली भाजप फौज विरुद्ध एकटे केजरीवाल, असं सोशल मीडियातलं पर्सेप्शन राहिलं. ‘आप’साठी ट्विट म्हणजे केजरीवालांचे हात बळकट करणं, असं वातावरण सोशल मीडियात गेले दोन आठवडे होतं. त्याची परिणिती कालच्या निकालात दिसली नसती, तरच नवल...!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article samrat phadnis