टिवटिवाट : सोशल मीडियात काय हवे?

Sakal-Media
Sakal-Media

किम कार्दाशियन अमेरिकन रिऍलिटी टीव्ही स्टार आणि मॉडेल. गेले दशकभर किम तिच्या अदांनी टीव्ही आणि नंतर सोशल मीडियावर आयकॉन बनलीय. ट्विटरवर किमला साडे सहा कोटी चाहते फॉलो करतात. इन्स्टाग्रामवर साडे सतरा कोटी आणि फेसबूकवर अडीच कोटी. गंमत म्हणून ही आकडेवारी एकत्र केली, तर किम किमान साडे सव्वीस कोटी चाहत्यांची धनीण आहे. गॉसिप्स आणि त्या आधारावर मिळणाऱ्या प्रसिद्धीच्या झोतात राहणे हा खरंतर किमचा व्यवसाय. गेली चार वर्षे किमनं रस्ता बदललाय आणि आज ती अमेरिकी तुरुंगात खितपत पडलेल्या कैद्यांसाठी आशेचा किरण बनलीय. गेले दोन आठवडे अमेरिकेत पेटलेल्या गोरे विरुद्ध काळे या वर्णद्वेषी संघर्षात किमनं Stop Killing Black People आंदोलनाची बाजू उचललीय. सेक्‍स टेपपासून ते ७२ तासांत घटस्फोटापर्यंतच्या कारणांनी गाजलेली किम सोशल मीडियातून सोशल वर्ककडं वळलीय. 

सोनू सूद बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता. लॉकडाउनच्या काळात मुंबईतील स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी सोनूनं मदत केली. त्यासाठी ट्विटरचा वापर केला. मजुरांनी ट्विट करायचे आणि सोनूनं त्यांच्या मदतीसाठी धावायचे, असा उपक्रम दोन आठवडे चालला. सोनूच्या कामाची दखल मीडियानं घेतली. त्याचं कौतुक झालं आणि राजकारणही. सोनूपर्यंत पोचणारे मजूर ट्विटर कसे वापरतात, असा प्रश्‍न काहींना पडला. सोनू राजकीय पक्षाचा हस्तक असल्याची टीकाही झाली. ट्विटरवर सोनूवर प्रेम करणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढली; तसंच त्याचे टीकाकारही ट्विटरवर गर्जू लागले. स्थलांतरित मजुरांसाठी बाहुबली, रॉबिनहूड, तारणहार म्हणून इमेज बनत चाललेल्या सोनूला सोशल मीडियातल्या सोशल वर्कमधून येणारा हा अनुभव नवा आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना विषाणूबद्दलच्या ना ना तऱ्हेच्या कंड्या पिकल्या त्या सोशल मीडियावरच. या कंड्यांनी सारे जग बेहाल झाले. आता बेहाल झालेल्या जगाला सावरण्यासाठी मदतीचा हात सोशल मीडियावरच पुढं येतोय. त्या हातांबद्दल शंका घेणं रास्त आहेच; पण झिडकारणं अधिक धोकादायक आहे. पूर्णतः बिनचेहऱ्याच्या सोशल मीडियाला किम किंवा सोनूसारख्या सेलिब्रेटींचं सोशल वर्क मानवी चेहरा मिळवून देतंय. त्या मानवी चेहऱ्याला जपणं आवश्‍यक आहे. मानवी चेहऱ्यानं सोशल मीडियाला जबाबदार बनवता येईल. तो चेहरा नसेल, तर आजचा सोशल मीडियावरचा ‘इन्फोडेमिक’ अवतीभोवती असाच तरंगत राहील. ‘इन्फोडेमिक’ला लगाम लावता येणारही नाही आणि त्यातल्या जबाबदार माहितीचा वापरही करता येणार नाही... 

1) मानवी चेहरा
2) इन्फोडेमिकपासून सुटका
3) जबाबदारीची जाणीव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com