फॅशन टशन : स्मार्ट चॉईस व्हाईट ऑन व्हाईट

ऋतुजा कदम
Wednesday, 5 August 2020

स्टाइलच्या दुनियेमध्ये रोज काहीतरी नवीन येत असले, तरी प्रत्येक व्यक्तीचा फॅशनकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्या व्यक्तीची स्वत:ची अशी एक स्वतंत्र फॅशन असते. त्या आरामदायी स्टाइलमधून बाहेर पडून अनेकजण काही प्रयोग किंवा काहीतरी वेगळे करण्याची जोखीम घेतात. पांढरा रंग हा तसे पाहायला गेल्यास अतिशय सामान्य आहे. या रंगासोबत कोणताही दुसरा रंग, स्टाइल किंवा डिझाइन डोळे झाकून आपण करू शकतो. मात्र, कधी व्हाईट ऑन व्हाईट अशी स्टाइल करण्याचा विचार तुम्ही केला आहे का? हे असे एक समीकरण प्रत्येकाने नक्कीच वापरले पाहिजे! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्हाईट ऑन व्हाईट म्हणजे संपूर्ण कपडे हे पांढऱ्या रंगाचे. टॉप आणि पॅंट ही पांढरीच असली पाहिजे. पांढरा हा अतिशय स्वच्छ आणि शुद्ध असा रंग आहे. परंतु, अनेकजण संपूर्ण पांढरे कपडे घालण्यासाठी नकार देतात. चित्रपटांमध्ये, गाण्यांमध्ये, सेलिब्रिटींवर हे समीकरण अनेकदा पाहायला मिळते. राजकारणामधील अनेकजण ही स्टाइल फॉलो करताना दिसतात. मात्र, आपल्या आजूबाजूला अशाप्रकारची स्टाइल क्वचितच बघायला मिळते. कोणतीही जास्त मेहनत न घेता हा लुक मिळवता येतो. एवढेच नाही, तर हे कॉम्बिनेशन क्लासिक आहे. 

  • ही स्टाइल करीत असताना टॉप आणि बॉटम दोन्ही कपड्यांचा पांढरा रंग हा एकाच शेडमधील असावा, याची काळजी घ्यावी. पांढऱ्यामध्येही विविधता पाहायला मिळते. 
  • उन्हाळा आणि हिवाळा या दोन सिझनसाठी ही स्टाइल अतिशय उत्तम आहे. उन्हाळ्यात कॉटन कपड्यांमध्ये आणि हिवाळ्यात व्हाईट विंटर कोट आणि पॅंट अतिशय उठून दिसेल.
  • ही स्टाइल तुम्हाला गर्दीमध्ये वेगळा लुक देण्यास मदत करते. कोणत्याही ठिकाणी हा लुक सर्वांचे लक्ष वेधून घेईल. 
  • व्हाईट ऑन व्हाईट हा फक्त क्लासिक नाही, तर एक स्मार्ट चॉईसदेखील आहे. अॅक्सेसरीज शक्यतो गोल्ड, सिल्व्हर किंवा रोझ गोल्ड असावी. या लुकसोबत इतर कोणतेही रंग वापरणे टाळा. न्यूड मेकअप शोभून दिसेल. चपलेसाठी पिच, ब्राऊन, काळा असे रंग वापरा. 
  • Edited By - Prashant Patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article on Smart Choice white on white

Tags
टॉपिकस
Topic Tags: