नोंद : तुम्ही टार्गेट पूर्ण केले का?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

मित्रांनो, सध्या घरी बसल्या बसल्या तुम्ही अनेकविध प्रयोग करत असाल? कोणी पुस्तके वाचत असतील तर कोणी ऑनलाइन चॅटिंग आणि त्याचा कंटाळा आली की, व्हिडिओ चॅटिंग सुरू असेल. प्राप्त परिस्थितीत कट्ट्यावर प्रतिबंध असला तरी ऑनलाइन मस्तपैकी कट्टा जमविता येऊ शकतो. तुम्ही जमविता की नाही कट्टा? नसाल तर सुरुवात करा. आणि हो त्याबरोबर इन्टाग्रामवर सुरू असलेल्या ‘बिंगो’ स्पर्धेतही भाग घेऊ शकता. काय आहे, बिंगो हे तुम्हाला वेगळे सांगायची आवश्‍यकता नाही. तुम्ही त्यासाठी वेगवेगळे गोल सेट करू शकता.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यासाठी भरपूर चॉईस तुमच्यासमोर आहेत. कोणी पुण्यातील फूड जॉइंट तर कोणी अगदी आपली शाळाही यामध्ये सेट करू शकता. यामध्ये तुम्ही मनातील भावना मांडू शकता आणि आपल्या आवडत्या मित्रालाही सहभागी करून घेता येते. शाळेतील धमाल, पहिल्यांदा मित्रांबरोबर फूड जाईंटला गेल्यावर झालेली धमाल, अगदी पैसे संपल्यावर बिलाचा आकडा पाहून झालेली फजिती तुम्ही यामध्ये मांडू शकता. पुण्यात काही अगदी पहाटे तीन वाजता पोहे मिळतात (आता कोरोनामुळे मिळत नाहीत) ते पहिल्यांदा कधी खाल्ले, तो अनुभव कसा होता, अशा अवर्णनीय अनुभवांची जंत्री आपण करू शकतो आणि आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला खिजवू शकतो. अर्थात टाइमपास करण्यासाठी आणि भूतकाळात रमून चांगल्या आठवणी जागविण्यासाठी बिंगो भलताच भारी आहे. आपण कधी काय गंमत केली, याचीही या निमित्ताने नोंद होते. त्यामुळे काही नोंदी जरा जपूनच करा. कारण पुन्हा भांडणाला कहार नको.... तर कधी करत आहात तुम्ही गोल सेट. बिंगो तुमची वाट पाहत आहे. मस्तपैकी टार्गेट सेट करा आणि पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न करा...सो...तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on target